मूडस् व कॅफे

 

दुपारचे तीन चाळीस झालेत..... एका कॅफेत आताच येऊन बसलोय... मंद लाईट व तितक्याच मंद आवाजात गाणे सुरू आहे. दिल मेरी ना सूने ....दिल की मैं ना सूनु.. असे. काहीतरी.....

चहा तसा खूप आवडतो.. पण अलीकडे मूडनुसार चहा  पिण्याची ठिकाणे उपलब्ध झाल्यामुळे चहाला न्याय मिळाल्यासारखे वाटते... एका  मित्रप्राण्याने कॅफेचा नवीन शोध मला दिला.. अशा ठिकाणी तुम्ही चहा कॉफी घेत  एकटे  बसू शकता...मित्रासोबत गप्पा मारू शकता  लॅपटॉप किंवा पॉड टॅब वर कितीही वेळ टाईप करू शकता...कागदावर चित्र काढू शकता.... गाणी ऐकू शकता...किंवा फक्त बसू शकता...स्वतःच्या एकांताचा आनंद घेत....आपल्याला भावेल तसे किंवा मूड असेल तसे कॅफे निवडू शकता....गाणी जोरात गोंगाट व गर्दी असलेली ठिकाणी किंवा निवांत लाईट म्युजिक असलेली किंवा काहीच नाही असे काहीही.....

ccd हे फारच टिपिकल झाले....अलीकडे अनेक प्रकार उपलब्ध आहेत....

नव्या पिढीच्या गरजांच्या निर्मितीची स्थळे सगळीच टाकाऊ नसतात हो....हा अत्यंत उपयुक्त शोध आहे ... तुम्ही गर्दीत असूनही एकटे असतात व एकटे असूनही गर्दीत असतात..तुम्ही सर्वांमध्ये असून कोणाचेच नसतात... नोटेबल असता किंवा नसता ..काहीही....मानवी मनाला अशा काही निवांत क्षणांची गरज असते.....सोबत कोणी असो नसो....

# लिटररी नोंदी-२०

No comments:

Post a Comment