इंदिरा गांधी यांच्या मैत्रीण व निकट वर्ती पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींविषयी लिहिलेले याच नावाचे पुस्तक प्रसिध्द आहे. गेल्या काही दिवसांपासून वेळ मिळेल तसे हे पुस्तक वाचत होतो. आज ते पूर्ण झाले आणि आज नेमका इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन आहे.
हे पुस्तक वाचतांना जे जे मला वाटलं ते मी टिपून ठेवले आहे. -
• पंडित नेहरू यांचे पूर्वज काश्मीर खोर्यातील बीज बीहारा गावचे होते. संस्कृत बीज विहार या शब्दाचा हा अपभ्रंश होता 1760 मध्ये मोगल सम्राट फररुखसियार यानी काश्मीरला भेट दिली तेव्हा बिहार येथील पंडित राजकौल यांना त्याने दिल्लीला आमंत्रण दिले. एका कालव्याच्या काठी राहत्या घरासह एक जहागीर राजकौल यांना देण्यात आली. कालव्याला नहर असा शब्द आहे तेव्हा कालव्याच्या काठी राहणारे घराणे नेहरू म्हणून ओळखले जाऊ लागले.
• 1857 च्या उठावाच्या वेळी ब्रिटिश फौज दिल्लीत घुसल्यानंतर गंगाधर कौल व त्यांच्या कुटुंबाने आग्रा येथे आश्रय घेतला. त्यानंतर वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी गंगाधर कौल यांचे निधन झाले,त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच 6 मे1861 मध्ये पत्नी जीव राणी ने एका मुलाला जन्म दिला तेच मोतीलाल नेहरू.
• त्यांचे व स्वरूपा राणी चे लग्न झाल्यानंतर अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर 1889 रोजी जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. त्यांनी 42 खोल्या असलेला आनंद भवन बंगला घेतला त्यावेळी जवाहरलाल 11 वर्षाचे होते.मोतीलाल यांच्या जेवणाच्या टेबलवर नेहमी पाश्चात्य खाद्यपदार्थ व उत्तम मध्यम असे घराच्या या भागात इंग्रजीतूनच बोललो पाहिजे असा मोतीलाल यांचा दंडक होता मोतीलाल यांच्या पत्नी स्वरूपा राणी यांना हुजूर साहेब असे म्हटले जाई.
• 8 फेब्रुवारी 1916 रोजी जवाहरलाल व कमला यांचे लग्न झाले. दोघात अकरा वर्षाचे अंतर होते. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे झाला.मोतीलाल यांच्या आईचे नाव इंदिरा राणी होते ती एक सामर्थ्यशाली धाडसी स्री होती तिच्या वरूनच इंदिरा हे नाव घेण्यात आले होते.
• इंदिरा चा तेरावा वाढदिवस 26 ऑक्टोबर 1930 ला होता त्यादिवशी जवाहरलाल यांनी जे पत्र तिला पाठवले ते ग्लिमसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी या पुस्तकातील पहिले पत्र होते. त्याच वर्षी पुण्याच्या पीपल्स ओन स्कूलमध्ये इंदिरा गांधींना ठेवण्यात आले.
• ब्रिटिशांनी केलेल्या भारताच्या राष्ट्रीय अवमानाला प्रत्युत्तर म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. या शांतिनिकेतन मध्ये शिकत असताना इंदिरा गांधी यांची फ्रॅंक ओबेरडॉर्फ या जर्मन तरुणाशी भेट झाली. तो तिला फ्रेंच शिकवत असे. तेव्हा ती सोळा वर्षाची व तो चौतीस वर्षाचा होता. पण तिच्याकडे आकर्षित झाला होता.
• उपचारासाठी इंदिरा व तिची आई 4 जुन 1936 रोजी व्हिएन्ना पोहोचले तेव्हा स्वागत करण्यासाठी जी मंडळी होती त्यात सुभाष चंद्र बोस होते.
• 28 फेब्रुवारी 1936 रोजी कमला नेहरू यांचे निधन झाले त्यावेळी इंदिरा पस्तीस वर्षाची होती. लोजान येथे कमलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
• इंदिरा फिरोज लग्नाबद्दल महात्मा गांधी यांच्याशी चर्चा झालेली होती त्या वेळी गांधीजींच्या नव जोडप्याच्या ब्रह्मचार्य बद्दलचे मत इंदिराजींना फारसे पटले नाही.लग्न आंतरधर्मीय होतं गांधीजी आणि जवाहरलाल या दोघांना जाहीर रित्या या निर्णयाचे समर्थन करावे लागले.
• 16 मार्च 1942 या दिवशी आनंद भवन आलाबाद येथे दोघांचे लग्न झाले. या लग्नात प्रख्यात शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची मुलगी ईव्ह क्युरी देखील उपस्थित होती. हनीमूनला काश्मीर येथे गेल्यावर शेख अब्दुल्ला यांनी त्यांची व्यवस्था केली.
• फिरोज गांधी 1952 मध्ये रायबरेली हुन लोकसभेवर निवडून आले. संजय चा सर्वात लाडका पाणी मगर होता.न्यूयॉर्क येथील कार्यक्रमात डोरोथी नॉर्मन या लेखिका संपादिका छायाचित्रकार यांच्याशी इंदिरा गांधी ची ओळख झाली.जी मैत्री आयुष्यभर टिकून राहिली.
• 1954 लोकसभेमध्ये केलेल्या विमा कंपनी व उद्योगपती यांच्यावरील टीकेमुळे उद्योगपती दालमिया यांना अटक करण्यात आली. मुंदडा प्रकरण उघड केल्यामुळे कृष्णम्माचारी व त्यांच्या सहकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला. मत्था ई विषयी माहिती वृत्तपत्रात छापून आ नल्यामुळे त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला.
• 2 फेब्रुवारी 1959 रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदी इंदिरेची बिनविरोध निवड झाली तेव्हा ती 41 वर्षांची होती. नेहरू घराण्यातील ती तिसरी अध्यक्ष होती.
• 1959 मध्ये फिरोज गांधी यांचे हृदयविकाराने निधन झाले तेव्हा राजू सोळा वर्षाचा व संजय 14 वर्षाचा होता.
• कामराज योजनेतील डावपेच अंमलबजावणीची वेळ व वेग लक्षात घेता ते काम इंदिरा गांधींनी केलं असावं असं दिसतं. 25 फेब्रुवारी 1968 रोजी राजीव आणि सोनिया यांचा विवाह दिल्ली येथे झाला तेव्हा राजीव गांधी इंडियन एअरलाइन्स मध्ये वैमानिक म्हणून दाखल झाले होते. 1970 मध्ये राहुल व 1971 मध्ये प्रियंका गांधी चा जन्म झा ला.
• पंतप्रधान म्हणून निवड होण्याच्या आदल्या दिवशी इंदिरा गांधींनी आपला मुलगा राजूला पाठवलेल्या पत्रात रॉबर्ट फ्रॉस्ट च्या पुढील ओळी लिहिल्या होत्या... "how hard it is to keep from being King when it is in you and the situation"
• राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांचे वर्णन गुंगी गुडिया अस केल होत.
• अच्युतराव पटवर्धन जयप्रकाश नारायण यांचे मित्र होते राजकारणातून त्यांनी संन्यास घेऊन जे कृष्णमूर्ती पासून प्रेरणा घेऊन वाराणसी जवळ एका खेड्यात काम करत होते.
• घटनेच्या 352 व्या कलमानुसार आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय सिद्धार्थ शंकर रे यांच्या सल्ल्यावरून इंदिरा गांधींनी घेतला. रात्री आठ वाजता रे व इंदिरा राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांना भेटायला गेले. 25 जून रोजी राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू करणारा वटहुकूम काढला.
• वीजपुरवठा बंद झाल्यामुळे अनेक वृत्तपत्र निघाली नाहीत पण अन अवधनाने वीज तोडायची राहून गेल्याने स्टेटस मन व हिंदुस्थान टाइम्स ही दैनिक तेव्हढी प्रसिद्ध झाली. मुळात त्या रात्री इंदिरा गांधी सिद्धार्थ शंकर रे यांना म्हणाल्या होत्या, " वर्तमानपत्रांचा वीजपुरवठा तोडला जाणार नाही आणि उच्च न्यायालय देखील उघडे राहतील".
• इंद्रकुमार गुजराल हे त्यावेळी माहिती व नभोवाणी मंत्री होते. बातम्या प्रक्षेपित करण्यापूर्वी मला त्या पाहायला हव्यात असे संजय गांधी यांनी सांगितल्यावर गुजराल यांनी त्या स स्पष्टपणे नकार दिला. नंतर गुजराल यांचे खाते बदलून, माहिती व नभोवाणी खाते विद्याचरण शुक्ल यांच्याकडे देण्यात आले.
• आणीबाणी लागू केल्यानंतर चार दिवसांनी एक जुलै 1975 रोजी इंदिरा गांधीने वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला.
• या काळात RSS, जमात-ए-इस्लामीया- हिंद, आनंदमार्ग व नक्षलवादी यांच्या वर बंदी घालण्यात आली.
• संजय इंदिरा चे कान व डोळे बनला, "काम करताना प्रथम च ती अडखळू लागली आणि दुसऱ्याला आपले निर्णय घेऊ देऊ लागली थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट गुंडाळा व, तसे तिने संजयला आपल्याभोवती लपेटून घेतल. जणू तिला कापर भरल होत," असं आर. एन. काव म्हणाले.
• आणीबाणी जाहीर झाली तेव्हा संजय 29 वर्षाचा होता.त्याचे प्राथमिक शिक्षण एलिझाबेथ गौबा या शाळेत झाली. डेहराडून येथील डू न स्कूल संजयने मध्येच सोडून दिली तेव्हा रोल्स-रॉयस कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून त्याची इंदिरेने परदेशी रवानगी केली.
• " संजय आणीबाणीचा चेहरा होता. पान जरी पडले तरी लोक म्हणायचे हे संजयानेच केले असणार" असे मनेकान एकदा म्हटल होत.
• आणीबाणीच्या काळात डॉक्टर करण सिंह हे आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री होते
• 1977 मध्ये बाबू जगजीवनराम, हेमवती नंदन बहुगुना व नंदिनी सत्पती या तिघा नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन समाजवादी काँग्रेस अर्थात काँग्रेस फॉर डेमोक्रेसी हा पक्ष स्थापन केला होता. बाबू जगजीवनराम काँग्रेसचे ज्येष्ठ पुढारी व हरिजनांचे एकमेव नेते होते.
• 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव करून निवडून आलेले राजनारायण हे स्वतःची तुलना हनुमानाशी करत चरणसिंग हे राम तर राजनारायान हे त्यांचे हनुमान होते.
• 1947 पासून इंदिरा गांधींचे खाजगी सचिव एन.के. शेषन हे होते श षन यांच्या माहितीनुसार इंदिराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा तिच्या जवळ स्वतःचे फारच थोडे पैसे होते. आपल्या पुढील कठीण दिवसांची तिला कल्पना होती. 22 मार्च 1977 रोजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी तो स्वीकारला.
• जनता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर पंधरा दिवसात 1952 च्या चौकशी आयोग कायद्याच्या तिसऱ्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जे सी शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग नेमण्याची 7 एप्रिल रोजी घोषणा केली. आणीबाणीत झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्याचे काम या आयोगाकडे होते ज्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.शहा आयोगाने आपल्या बैठकांना 30 सप्टेंबर 1977 पासून नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस येथे सुरुवात केली.नऊ जानेवारी 1978 रोजी इंदिरा गांधी शहा आयोगापुढे हजर झाल्या त्यावेळी त्यांचे वकील फ्रॅंक अँथनी हे होते.
• मे 1977मध्ये 1 सफदारजंग रोड हे पंतप्रधान पदाचे अधिकृत निवासस्थान सोडून इंदिरा गांधी 12, विलिंग्डन क्रेसें ट या बंगल्यात राहण्यास गेल्या.
• संजय गांधीच्या विरोधात एखाद्या भयंकर गुन्ह्याशी संबंध जोडण्यासाठी सीबीआयला पुरावा सापडत नव्हता त्या वेळी इंदिराजींच्या राजकीय कारवायांचे विडंबन करणारा "किस्सा कुर्सी का" हा चित्रपट त्याने नष्ट केला असा आरोप संजय व विद्याचरण शुक्ला यांच्यावर ठेवला.
• जुलै 1977 मध्ये बिहार मधील बेलची या एका छोट्याशा खेड्यातील जमीनदारांनी भूमिहीन हरिजन वर हल्ला करून त्यांच्या कुटुंबियांची कत्तल करून पेटत्या आगीत प्रेते फेकून देण्यात आली होती. ठार झालेल्यांमध्ये दोन लहान बालकेही होती. या बेलची खेड्याला इंदिरा गांधी यांनी भेट दिली.
• 3 जानेवारी 1978 रोजी काँग्रेस पक्षात फूट पडली. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसमधील ही दुसरी वेळ होती. इंदिरा गांधी या काँग्रेस अध्यक्ष बंगल्यावर हाताचा पंजा हे पक्षाचे निवडणूक चिन्ह ठरले.
• 78 मध्ये झालेले निवडणूक इंदिरा गांधी यांनी चिकमंगळूर येथून लढवली. चिकमंगळूर हा पश्चिम घाटातील एक छोटा जिल्हा आहे. या भागातील सर्वात उंच शिखराचे नाव बाबा बदून असे होते. सतराव्या शतकाच्या सुमारास बाबा बदून हे मुस्लिम संत मक्के हुन येथे आले होते. त्यांनी बरोबर कॉफी च्या बिया आणल्या होत्या. त्यांनी स्वतःची झोपडी उभारली आणि आवारात कॉफीच्या बिया पेरल्या.भारतातील कॉफीची पिकाची ही सुरुवात होती. चिकमंगळूर येथील कॉफीची जगात सर्वोत्कृष्ट कॉफी म्हणून गणना केली जाते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध उभे करण्यात आले वीरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची धुरा जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे होती.
• इंदिरा गांधींविरुद्ध नेमलेल्या त्रीस्का आयोगाने तिच्यावर असा आरोप ठेवला की, त्याने चार कोंबड्या व दोन आंडी चोरली. त्यासाठी खटला भरण्यात आला व वॉरंट देखील काढण्यात आले. साठ वर्षे वयाच्या इंदिरेला दोन हजार मैलांचा प्रवास करून मणिपूरच्या कोर्टात हजर राहावे लागले. फिर्यादीच्या विनंतीवरुन सुनावणी तहकूब करण्यात आले आणि इंदिरा दिल्लीला परत आली.
• 19 डिसेंबर रोजी लोकसभेने इंदिरा गांधींना सदन संस्थगित होईपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली तसेच सभागृहाचा गंभीर आव्हान व हक्कभंग केल्याबद्दल तिची सदस्यत्व वरून हकालपट्टी केली.
• तिहार तुरुंगात जॉर्ज फर्नांडिस यांना पूर्वी ज्या बरॅक मध्ये ठेवले होते तिथेच इंदिरा ठेवण्यात आले. तेथे झोपण्यासाठी लाकडी पलंग दिला होता पण सतरंजी दिली नव्हती. खिडक्यांना गज होते पण श टर्स नव्हते. ते डिसेंबर चे दिवस होते दिल्लीतील सर्वात कडक थंडीचा मोसम होता. अनेक वर्षांपूर्वी इंदिरेला उदास वाटत असताना जवाहरलाल नी तीला बिथोव्हेन यांचे एक वाक्य कळवलं होतं "मी दैवाचा गळा पकडेल आणि त्याला माझ्यावर पूर्णतया मात करू देणार नाही" हे वाक्य तुरुंगात तिला आठवले.
• फ्रान्स मध्ये प्रसिद्ध झालेले 'इंटरनल इंडिया' हे पुस्तक इंदिरा गांधी नी लिहिलेले होते. 4 एप्रिल 1979 रोजी झुल्फिकार अली भुत्तो यांना रावळपिंडी येथे फाशी देण्यात आ ली.
• 15 जुलै रोजी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवण्याचे आमंत्रण राष्ट्रपतींनी चरणसिंग यांना 27 जुलै रोजी दिले. इंदिरा काँग्रेसचे एकूण 72 खासदार होते. नव्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान म्हणून सामील झाले होते. इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर चरणसिंग सरकार सत्तेवर आलं होतं. 20 ऑगस्टला लोकसभेची बैठक भरणार होती इंदिरा गांधींनी आदल्या दिवशी 19 ऑगस्टला चरण सिंग सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला. तेव्हा विश्वासदर्शक ठराव मंजूर होऊन आपला पराभव लक्षात होणार हे लक्षात आल्याने चरण सिंग यांनी राजीनामा दिला.
• 8 ऑक्टोबर 1979 रोजी जयप्रकाश नारायण यांचे पाटणा इथे निधन झाले. 1980 मध्ये इंदिरेने चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मे 1980 मध्ये नऊ राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.
• फ्रान्सचे नवे अध्यक्ष फ्रान्सव मित्र यांच्या निमंत्रणावरुन नोव्हेंबर1981 मध्ये इंदिरा गांधींनी पॅरिसला भेट दिली. पंतप्रधान झाल्यानंतर तिचा हा पहिलाच परदेश दौरा होता. पॅरिसमधील सोर्बन विद्यापीठ डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी देऊन तिचा सन्मान करणार होते.
- समाधान महाजन.
31 ऑक्टोंबर 2020

छान माहिती
ReplyDelete