90 s च्या दशकात जगायला भेटणे हा आपल्यातच एक आनंद आहे. नवीन शतकाच्या उंबरठ्यावर ऐन तारुण्यात प्रवेश करतांना आपल्यासोबत देश देखील मोठ्या संक्रमण अवस्थेतून जात होता हे या पिढीने अनुभवले आहे. नवीनच आलेले संगणकाचे मोठे खोके उत्सुकतेने न्याहाळत असताना नुकत्याच श्रीमंत घरात केबल टिव्ही बघणारे रिमोट ने चॅनल बदलण्याचे सुख अनुभवत होते तर असंख्य घरात दूरदर्शनचा antenna व्यवस्थित फिरवून विना व्यत्यय ची पाटी येता करमचंद, महाभारत, चंद्रकांता बघण्याचा असीम आनंद घेणारे पण होते.
1992 ला आम्ही आठवीत असू.....पेपर वाचणे सुरू केले तेव्हा रथ यात्रा - राम मंदिर च्या, सिंग चंद्रशेखर हे पंतप्रधान म्हणून राहून गेल्याच्या, राजीव गांधींची हत्या झाल्याच्या बातम्या ठळक आठवतात......
या सोबतच अजुन एक बातमी विविध वृत्तपत्र व मासिकातून सातत्याने प्रसिद्ध होत होती....बिग बुल ..हर्षद मेहता...शेअर बाजार हा शब्द पहिल्यांदा वाचला होता तो या माणसामुळे...यामुळे दलाल, ब्रोकर, बुल, बिअर, सेन्सेक्स अशा शब्द संपत्तीची भर कारण व गरज नसतांना शालेय वयात झाली......अजूनही वृत्तपत्राची ती हेडिंग आठवते जेव्हा..." हर्षद मेहता ने PM ला एक कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता"...... मेहताचा तोच फोटो पेपरला पाहून काही वर्गमित्रांना मेहता व दाऊद सारखे दिसतात ते दोघे भाऊ असून त्यांनी भारताला बुडवायचा कट केला आहे असा प्रचंड मोठा गौप्य स्फोट एक दिवस प्रार्थनेच्या आधी आमच्या कंपूत केला.....सुदैवाने आमच्या पैकी ही बातमी कोणीही न फोडल्यामुळे .....त्याचे पुढे काही झाले नाही.....असो तर मुळ मुद्दा असा की त्याचं हर्षद मेहतावर नुकतीच आलेली "scam 1992 द हर्षद मेहता स्टोरी" नावाची वेब सिरीज पाहिली आणि हे सर्व आठवलं इतकंच......कोणतेही मर्डर, सेक्स सीन, हॉरार नसतांना देखील एखादी सिरीज इतकी छान ग्रीप घेऊ शकते.... economic, finance, taxation वाल्यांनी पाहायला हवी....अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आहे.... सिरीज पाहताना मध्येच एकदा गुरु चित्रपटाची आठवण आली.....साम.. दाम...दंड ...भेद... पण crises mode आल्यावर मात्र भिन्न टार्गेट नुसार रस्ते बदलतात..
बर्याच प्रसंगात संधी असतांना देखील दिग्दर्शकाने राखलेला संयम विशेष आहे. बरेच संवाद कॅची आहेत. अगदी वास्तविक असणारे सीन दाखवले आहेत. विशेषतः जेव्हा राम जेटमलानी व हर्षद मेहता पत्रकार परिषद घेत असता तेव्हा मुळची पत्रकार परिषद व सिरिज मधील यांचे मिक्सिंग छान आहे. अजून एक महत्वाच म्हणजे यातील पात्र निवड उत्कृष्ट आहे.
अर्थात हर्षद म्हणजे त्या काळातील सर्व कायद्यांतील पळवाटांचा आधार घेऊन जन्मलेल scam चे अपत्य होते. ज्यातून Sbi, RBI, SEBI कुणालाही न जुमानता राजरोस हा प्रकार सुरू राहतो. ...एकेकाळी मुंबईतील चाळीत राहणारा हा इसम वयाच्या चाळीशीत वरळी सी फेस 15000 sq.ft च्या पेंटहाऊस मध्ये राहतो.आपल्या चेक वरील सहीची एक रेषा जरी बदलली तरी जागतिक भूकंप झाल्यासारखे आपल्याला भेदक व खुनशी नजरेने अपदमस्तक न्याहळणारे व अत्यंत " विनम्रपने सदोदित आपल्याला मदत करणारे", sbi च्या अख्या व्यवस्थेला हा मेहता दरदरून घाम फोडतो.... तब्बल 500 कोटी रुपये विना original BR व security मेहताभाईंच्या अकाऊंटला टाकले जातात, ही बातमी लिक होते व सुरू होतो पुढचा सर्व खेळ. नंतर हर्षदवर 70 च्या आसपास क्रिमिनल व 500 च्या आसपास सिविल केसेस टाकल्या जातात. या सगळ्यांना तोंड देत वयाच्या 47 व्या वर्षी हार्ट अटॅक ने त्याचा मृत्यू होतो. हे सर्व त्याच्या वयाच्या 38 ते 44 या टप्प्यात होते.
हा सर्व scam झाल्यानंतर आलेली नरसिंह कमिटी, सेबी व rbi चे कडक झालेले नियम..... हे सर्व आपल्या भारतातील प्रथेनुसार नंतरचे disaster management होते.
गुन्हेगारपट आपल्याकडील म्हटले तर शूटआऊट अॅट वडाला अँड लोखंडवाला वाले मन्या सुर्वे, माया डोळस यांच्यावर असलेल्या फिल्म पासून डी, वन्स अपोन टाइम ही दाऊद वर असलेली फिल्म पर्यन्त तसेच दगडी चाळ व कित्येक सत्या सारख्या बेस्ड ऑन चा लेबल लाऊन आलेल्या फिल्म्स होत्या...... अनुराग ची ब्लॅक फ्रायडे अल्टिमेट फिल्म होती....पण या सर्वांमधील एक बाब कॉमन होती ती म्हणजे या सर्व गॅंगस्टर मूवीज होत्या.... खून, फायरिंग....हफ्ते...हे सर्व कॉमन होते....scam 1992 ही बॉलीवूड मधील व्हाइट क्रिमीनल मागील सायकोलोजी दाखवणारी पहिली अभ्यासपूर्ण सिरिज आहे... वास्तवता व रंजकता यातील बॅलेन्स बेमालूम पणे सांभाळण्याचे कौशल्य दिग्दर्शकाने दाखवले आहे. दिग्दर्शक अर्थात मेहता च आहे........ हे विशेष 😊
(courtsy- अर्थातच सर्वश्री सुशीलकुमार अहिरराव)
- समाधान महाजन



No comments:
Post a Comment