AN ERA OF DARKNESS - SHASHI THAROOR

शशी थरूर यांचे AN ERA OF DARKNESS हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. काही पुस्तके इतकी प्रसिद्ध व चांगली असतात कि त्या पुस्तकांच्या आधारावर लोक भाषण करतात...स्पीच देतात...डिबेट करतात. इथे परिस्थिती नेमकी उलट झाली. थरूर यांनी आधी मे २०१५ मध्ये ऑक्सफोर्ड मध्ये १५ मिनिटांचे भाषण दिले. ते इतके प्रसिद्ध झाले  कि त्यांना अनेकांनी यावर पुस्तक लिहिण्यास सांगितले व त्याच्या परिणामी या चांगल्या पुस्तकाची रचना झाली. (त्यांचे ते प्रसिद्ध भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे, त्याची लिंक -https://youtu.be/f7CW7S0zxv4अर्थात पुस्तक वाचत असतांना हे सहज लक्षात येते कि, ते भाषण म्हणजे हिमनगाचे टोक होते. इतके डिटेलिंग त्यांनी पुस्तकात दिले आहेत. त्यातील काही मी टिपलेल्या नोंदी-  

पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते पुराव्यानिशी अनेक बाबिंमधून स्पष्ट करतात की इंग्लिशमन आपल्यासाठी आदर्श नव्हते तर त्यांच्यासाठी भारत आदर्श होता....विलियम dalरिम्पल चे लास्ट मुघल किंवा anarchy वाचतांना पण हे लक्षात येते की सुरुवातीचे अनेक ब्रिटिश लोक भारतीय वेशभूषा करत. यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करत. किंबहुना 1857 च्या उठावापूर्वी जी लोक लाल किल्ला परिसरात नोकरीसाठी राहायची. त्यांनी येथील बायांशी लग्न केले. इथल्या प्रथा अंगिकरण्याचा प्रयत्न केला.

इथून लुटून नेलेली लूट इतकी होती की ऑक्सफर्ड डिक्शनरीत लूट शब्द समाविष्ट करण्यात आला. इथल्या पैशांवर तिथे मोठी घरे बांधली महलासारखी. त्यांच्या शैली भारतीय महलासारख्या ठेवण्यात त्यांना भूषण वाटायचे. किंबहुना काहींनी त्या घरांना भारतीय नावे दिली. ही दोन्ही पुस्तके वाचताना कुठेतरी अधोरेखित होते की इंडिया was great at that time....they looted it for their personal use.

आधुनिक काळात ब्रिटनने अनेक देशात युद्ध लढले तेथील जमीन ताब्यात घेतली. चायना, बर्मा, सिलोन ते आफ्रिका त्याकाळात भारतातील लोकांची आर्मी वापरली व त्यांचा खर्च भारतातील करामधून दिला जायचा. दोन्ही महायुद्धात हा प्रकार झाला. ब्रिटन साठी भारतीय सैनिक जगभर लढले अगदी विदेशी युद्धभूमीवर देखील. पहिल्या महायुद्धात 74187 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले जे ब्रिटनसाठी लढत होते...असंख्य जखमी झाले. ओटोमन एम्पायरच्या विरोधात 7 लाख भारतीय सैन्य लढत होते मेसोपोटेमिया भूमीवर.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ....ब्रिटिश स्टील शिप समुद्रात बुडल्यामुळे भारतातून सात हजार टणाची स्टील शीट रोल युकेला पाठविण्यात आली. जो भारताच्या स्टील इंडस्ट्री साठी एक मोठ्ठा सेट back होता...

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, 'British understood the price of everything they found in India but the value of nothing....'

आपलेच सैन्य वापरले...आपलेच येथील राज्य जिंकण्यासाठी...त्या सैन्यावर खर्च आपलाच पण त्या राज्यातून मिळणारे महसूल मात्र ब्रिटनला जात होते. तैनाती फौज याचे उदाहरण आहे. आयडिया ऑफ इंडिया, unity आधी देखील होती अशी रामायण महाभारत, मौर्य गुप्त मुघल मराठा अशा साम्राज्याची उदाहरणे दिली आहेत.

आतापर्यंतची जी साधारण समज आहे...की ब्रिटिशांमुळे आधुनिकता आली, बदल झाले, नवीन विचार सरणी आली,  सुधारणा झाल्या...पण शशी थरूर यांनी या पुस्तकात परखडपने हे सर्व मते खोडले आहेत. इतक्या collectively व स्पष्टपने कोणीतरी असे मांडले आहे तेही पुराव्यानुसार...हे माझ्या वाचण्यात पहिल्यांदाच आले  (अर्थात तुटक स्वरुपात अनेक ठिकाणी हि माहिती आहे. पण एकत्रित व एक दृष्टीकोन ठेऊन लिहिलेले असे)  चॅप्टरची नावे पण तशीच आहेत... did the british give india political unity?

बऱ्याच ठिकाणी विलियम डंलरिंपल च्या विधानांचा आधार घेतला आहे...ते म्हणतात pre colonial era चांगला होता असे नाही पण ब्रिटिश चांगले होते हे सेट झालेले नोशन पूर्ण पने खरे नाही.we are ruling you for your own good... हे 1858 मध्ये राणीच्या जाहीरनाम्यात सूचित होणारे अर्थ खरे नव्हते...

 1903 कर्झनच्या दरबारात राजे महाराजे उंची पोशाख घालून आले होते.बादशाह ला खुश करण्यासाठी...गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात देखील याचा उल्लेख केला आहे. थरूर म्हणतात ब्रिटिश ड्रेस कोडचा त्रास तेव्हाच्या राजा महाराजांना होताच असे नाही..भारतातल्या उन्हात आजही असंख्य शाळांमध्ये मुलांना टाय बांधावा लागतो...हा तो impact आहे. 

 Un Indian civil service... नेहरु म्हणतात, त्या काळातील  Indian civil service was neither Indian nor civil, nor a service.. जस्टिस सय्यद मुहम्मद कोर्ट जज म्हणून लागतो ..तेथील भेदभाव व दुय्यम वागणूक ला नाराज होऊन 1892 मध्ये राजीनामा देतो तेव्हा तो फ्रस्ट्रेट झालेला असतो..वयाच्या 53 व्या वर्षी मृत्यू होतो तो सर सय्यद अहमद खान यांचा मुलगा असतो...ICS सर्विस या भारतीय ICS लोकांबद्दल भेदभाव पूर्ण वागायच्या. त्यांना पगार देखील कमी, महत्वाची पदे दिली जात नसत.

प्रसिद्ध कवी रुडयार्ड किपलिंग देखील कशा पद्धतीने रेसिस्ट दृष्टिकोन बाळगून होता ते यात दिसते. तसेच ई.एम.फॉस्टर चे प्रसिद्ध पुस्तक ए पॅसेज टू इंडिया मध्ये देखील आहे.

फ्री प्रेस किंवा ब्रिटिशांनी भारतात वृत्तपत्र आणले , लोकांना मत मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पण पाहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी आणली 1550 मध्ये. ब्रिटिशांचे पाहिले वृत्तपत्र आले 1780 मध्ये ज्यावर 1782 मध्ये बंदी घातली. नंतर अनेक बंदीचे कायदे आणले, जप्ती आणली.

भारतीय कायद्यांमध्ये oppressive legacy आहे. कायद्यात स्री पुरुष भेद आहेत. स्रीला अधिक दोषी ठरवणारे व त्यांच्या colonial needs पुर्ण करणारे आहेत. ब्रिटिश interfered with social customs only when it suited them to do so ....

sedition act ज्यात स्वातंत्र्य पूर्वी महात्मा गांधिंसारख्या अनेकांना अटक झाली. त्याच ॲक्ट खाली 2016 ला jnu विद्यार्थ्याला अटक झाली.

इंडियन सोसायटी मिक्स होती. ब्रिटिशांनी कॉमन लॉ तयार करण्याच्या वेळी भारतीय समाजातील समिश्रता न समजल्याने येतील ब्रम्हणाच्या मदतीने सुरुवातीला जे कोड बनवले त्यावर ब्राम्हणांचा impact राहिला. पूर्वीच्या समाजातील नियम जाती जातीय होते आता ते एकच नियमाने तयार झाले. वरवर पाहता हे न्यायाचे वाटेल पण ज्या घटकांच्या मदतीने हे नवीन नियम तयार करण्यात आले त्यांचे प्रभुत्व त्यातून दिसते. किंबहुना जुने शास्त्र स्मृती शोधून त्यांचे अर्थ लावून एकत्रित केले.

The census joined the map and the museum as a tools of British imperial dominance in 19th century.. जनगणना, map व म्युझियम  to control and governed it... ICS अधिकारी हर्बर्ट रिस्ले 1901 च्या जनगणनेचा कमिशनर होता..त्याने ती जनगणना ethnographic census म्हणून घोषित केली...skull व नाकाचे माप घेण्यात आले facial फीचर्स चे  photograph काढण्यात आले. ... रिस्लेच्या या सर्व कामामुळे British affirm their own convictions about European biological superiority over Indians...

the myth of enlightened depotism या प्रकरणात ब्रिटिशांच्या धोरणाबद्दल बोलतांना थरूर यांनी विलियम डिगबी यांचे स्टेटमेंट सांगितले आहे की, 1793 ते 1900 या 107 वर्षात जगातील सर्व युद्धांमुळे 5 मिलियन लोक मेले. पण भारतातील दहा वर्षात 1891ते 1900 19 मिलियन लोक दुष्काळात मेले.

the messy afterlife ... यात ते म्हणतात, गेलेली संपत्ती तर परत देणार नाहीत.but just apology करू शकतात. taxes परत देऊ शकत नाही पण personal वस्तू परत देऊ शकतात ज्या लुटून नेल्या. जसे की once world largest diamond 793 कॅरेट चां कोहिनूर. या प्रकरणात कोहिनूर चां प्रवास देखील आहे.

Railway was a big British colonial scam...रेल्वेतील गुंतवणुकीवर वार्षिक 5 टक्के रिटर्न देण्याचे कबूल केले....जे त्या काळातील जास्त होते. ज्या काळात अमेरिकन डॉलरची किंमत दोन हजार पौंड होती.तेव्हा 1850-60 च्या काळात रेल्वेवरील खर्च 18000 पौंड होता. रेल्वेचा शेअर ब्रिटन मध्ये जोरात विकला गेला. पैसा तंत्रज्ञान साहित्य नफा हे सर्व  ब्रिटनचे व  लॉस झाला तर भारतीयांचा अशी परिस्थिती होती. भारतीय  कर्मचारी व प्रवासी दोघांना दुय्यम वागणूक दिली जात असे. भारतीय locomotive बनवण्याची सुरुवात भारतात 1878 ला झाली. जे ब्रिटन पेक्षा स्वस्त होते. म्हणून 1912 मध्ये पार्लमेंट ॲक्ट पास करण्यात आला ज्यातून भारतीय कंपन्यांना locomotive बनवण्यास बंदी घालण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या काळात several Indian rail lines were dismantled and shipped out of the country to aid the allied war effort in Mesopotamia.

 ..गांधी सक्सेस झाले कारण त्यांचे विरोधी ब्रिटिशांनी ते होऊ दिले असा अर्थ ध्वनित होतो. अर्थात ब्रिटीश नाजी किंवा फेसिस्ट असते तर कदाचित नसते पण यश मिळाले या मार्गाला. अहिंसत्मक लढा प्रेरणादायी होता पण सगळीकडे यशस्वी नव्हता. नेल्सन मंडेलाने एकावेळी कबूल केले होते की, अहिंसा कामात आली नाही. भारतात शेवटी शेवटी सैन्याने विद्रोह केला तेव्हा त्यांनी एकवेळ गांधींना तुरुंगात उपवास करायला टाकले पण त्या विद्रोहाला ते डावलू शकले नाही. and when the right and wrong are less clear cut gandhisam flounders. जसे त्यांना फाळणी चुकीची वाटत होती पण ते थांबवू शकले नाही.

ब्रिटिश सोडून गेल्याचा परिणाम दीर्घकाळ राष्ट्रांना भोगावा लागला. आफ्रिकेतील अनेक देशात त्यांनी आखलेल्या बॉर्डर देशादेशात युद्ध घेऊन गेले. युगांडा रवांडा सेनेगल... आदी.

अशा अनेक गोष्टींचा मागोवा घेत व त्याला पुराव्यांची साथ जोडत आपल्या ओघवत्या शैलीत शशी थरूर यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय आहे. 

- समाधान महाजन 

१२/०१/२०२३ 


No comments:

Post a Comment