गांधींचे गारूड


गांधींचे गारूड हे संजीवनी खेर यांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गांधींच्या सहवासातील स्रीया या विषयावर हे पुस्तक आहे. साधनाकडून 2ऑक्टोबर 2021 रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आलेली आहे. जवळपास 145 पानांचे हे पुस्तक लगेच वाचून संपते. सुदीप गुजराथी यांच्याकडून मागवलले हे पुस्तक त्याच दिवशी रात्री अकरा पर्यंत वाचून संपवले. त्यातील जनरल इतिहासाची माहिती होती. काही स्रीयांची माहिती होती पण काही नावे पहिल्यांदाच वाचण्यात आली. एकूणच इतिहासातील महत्वाच्या कालखंडात व महत्वाच्या व्यक्तीच्या सान्निध्यात  असणाऱ्या महिलांविषयी ज्यांनी गांधींच्या प्रभावात देशासाठी काही ना काही योगदान दिले त्याची माहिती या पुस्तकात आहे. 

No comments:

Post a Comment