भेटेन नऊ महिन्यांनी ..........कविता व देशभक्त 
सोलापूरचे मलाप्पा धनशेट्टी, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिशन सारडा यांना ६ जून १९३० रोजी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. हा खटला भुलाभाई देसाई यांनी चालविला होता.
रामकृष्ण जाजू, रामभाऊ राजवाडे, छन्णुसिंग चंदेले, कवी कुंजविहारी, तुळशीदास जाधव आदींना देखील शिक्षा देण्यात आल्या. १२ जानेवारी १९३१ रोजी येरवडा येथे चौघांना फाशी दिली. हा दिवस सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
या चौघांना फाशी देण्याआधी विजापूरच्या तुरुंगात असतांना कुर्बान हुसेन कवी कुंजविहारींना म्हणत असत, ‘मनी धीर धरी शोक आवरी जननी, भेटेन नउ महिन्यांनी’ हि कुंजविहारीची कविता गात मी फासावर जाईन.
१९२२ साली चौरीचौरा प्रकरणात फाशी गेलेल्या एकाला ‘आता केव्हा भेटणार?’ असे विचारताच, ‘नऊ महिन्यांनी भेटेन’ असे उत्तर त्याने दिले होते. त्यावर १९२३ मध्ये कुंजविहारीनी लिहिलेली कविता त्या काळात खुप प्रसिद्ध झाली.
सोलापूरचे चार हुतात्मा, लाहोर कट खटल्यातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीन अशा सात हुतात्म्यांवर नागपूरचे नारायण केशव बेहेरे यांनी ‘सप्तर्षी’ कविता लिहिल्यामुळे त्यांना सरकारी नोकरीस मुकावे लागले होतेसंदर्भ -
य.दि.फडके, विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड चौथा, पेज ६६)
No comments:
Post a Comment