body of lies सारखे मूवी पाहिल्यानंतर लक्षात येते की आपल्याकडे असलेली लोकशाही किती प्रगल्भ आहे. जॉर्डन इराक इराण सीरिया मिडल इस्टच्या पार्ट मध्ये लोकांना जगावं लागत असलेला जीवन हे आपल्याकडच्या नॉर्मल रुटीने लाइफ पेक्षा किती प्रकारे भिन्न असू शकते हे असे चित्रपट पाहून कळते...
चित्रपटाचा दर्जा व त्याच्यासाठी केलेला अभ्यास हा ज्या ताकदीचा आहे तो विषय हा एक वेगळा विषय आहे व त्यात दाखवलेला समाज देश व त्यांचे परस्पर संबंध हा एक वेगळा विषय आहे.
तिकडच्या लोकांचे जीवन त्यांना मिळत असलेल्या सुविधा किती भेदभाव पूर्ण व विचित्र असू शकतात.....तिथे मुळ गवर्नमेंट किती कमजोर असते व त्याला समांतर असणारे government किती स्ट्रॉंग असते हे कळते.आणि आपल्याकडे अगदी लहान लहान निर्णय देखील गव्हर्मेंट ने घ्यावा यासाठी लोकांचा किती अट्टाहास असतो आणि सरकार देखील ते पूर्ण करण्याचा किती हिरीरीने प्रयत्न करते हे खरंतर प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. पण येथील लोकांना मुळातच त्याची जाणीव नसल्यामुळे आपण किती सुखी समाजात जीवन जगत आहोत याचं महत्त्व /इम्पॉर्टन्स येथील लोकांना नाही. असच आज वाटत आहे.
त्यानंतर आज रात्री Shawshank redemption हा चित्रपट पाहत होतो. हा जागतिक रेटिंग मध्ये टॉप
चा चित्रपट आहे. आपल्या बायकोचे कोनातरी सोबत अफेयर आहे हे सजल्यावर तिला व तिच्या प्रियकराला मारल्यामुळे शिक्षा झालेला एक कैदी तुरुंगात येतो व तेथून सुरू होतो या चित्रपटाचा प्रवास....एक से एक संवाद व to the ground दृश्य असल्यामुळे चित्रपट अप्रतिम वाटतो. यातील विचार ज्या पद्धतीने दिग्दर्शकाने प्रेक्षकापर्यन्त पोहचवले आहेत ना ते बघत असतांना एखादी कविता कोणीतरी सादर करत आहे इतकी पकड हा चित्रपट घेतो.

- समाधान महाजन

No comments:
Post a Comment