कोणीतरी आपल्याला काही सांगेल मग आपण करू. कोणीतरी सांगेल तू बोल मग आपण बोलू. कोणीतरी म्हणेल हे तूच करू शकतो मग आपण आनंदाने करू. कोणीतरी म्हणेल हे तुझ्यात स्पेशल आहे मग आपल्याला वाटेल कि ते स्पेशल आहे. हा सिंड्रोम अनेक जणांमध्ये असतो. आपल्याला माहित असते पण आपण करत नाही. कोणाचीतरी सांगण्याची, म्हणण्याची, बोलण्याची आपण वाट पाहत असतो. बऱ्याचदा समजून वाट पाहतो. बऱ्याचदा समजत नाही कि नक्की या कोणाचीतरी आपण वाट पाहत होतो.
विशेषतः टीनएज मध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो. यांना(मोठ्यांना) हे कळत कसे नाही... हा प्रश्न या वयातील मुले मुली अनेकदा मनातल्या मनात विचारत असतात. त्यांना वाटते हे समजून घ्यावे. हे यांनी मला सांगावे. किंवा हे मला सांगण्याची गरज आहे का? इतक पण यांना समजत नाही का? मी का असा मुलगा आहे? अशी मुलगी आहे? यांनी असा विचार केलाच कसा. मी तर हे चांगले करू शकतो मग माझा विचार का नाही केला?
या प्रश्नांच्या साखळीत बराच वेळ जातो. मोठेपणी देखील अनेकांना असे प्रश्न भेडसावतात. लोक म्हणतात कि आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे. आपल्याला काय येते, काय समजते ते दाखवता आले पाहिजे. तसे नाही केले कि तुम्ही या जगाच्या स्पर्धेत मागे पडाल... पण सत्य आहे कि अशी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत. थोडे लक्ष दिले व त्यांच्या एखाद्या गुणाला संधी मिळवून दिली तर ते त्या क्षणात आयुष्य जगून घेतात. कारण अशी संधी त्यांना कोणी देत नाही व स्वतःपुढे जाऊन संधी ओढून घेणे त्यांना अनेक कारणांनी जमत नाही.... हे वास्तव आहे.....
No comments:
Post a Comment