अलीकडे सर्व फॅमिली सोबत बघावे असे चित्रपट किंवा वेब सिरीज कमीच असतात. त्यातला त्यात अशात पाहिलेली हाफ पँट फुल पँट अगदी मस्त हलकी फुलकी वेब सिरीज. गुल्लक, पंचायत सारखी किंबहुना त्याहून निर्मळ. कारण यातील मध्यवर्ती भूमिकेतील नायक आहे चौथीत शिकणारा मुलगा. डब्बा. हा डब्बा अगदी पहिल्या भागापासून आपले लक्ष वेधून घेतो. त्याची वेगवेगळी विविधरंगी स्वप्न जी वयातल्या मुलांमध्ये असतात. त्याचे व त्याच्या आई- वडिलांसोबत असलेले बोलणे. त्यांच्यातील बंध. दक्षिण भारतातील एका लहान खेड्यातील हि छोटी मुले त्यांच्या छोट्या छोट्या कहाण्या.... मस्त आहेत.
No comments:
Post a Comment