2008-09 चे वर्ष असेल. माझ्या upsc च्या तयारीचा peak-point होता. आता इतक्या करेक्ट डेट्स आठवत नाही पण कदाचित तेव्हा यूपीएससीची मेन्स दिलेली होती व मुलाखतीच्या तयारीसाठी सर्व आकाश खुले होते. समोर येणारा व प्रसिद्ध झालेला कुठलाही विषय अभ्यासाचा विषय बनून जात होता. महाराष्ट्रातील मुलांचा व त्यातही मराठी माध्यमावर डिपेंड असलेल्या मुलांचा मुलाखतीविषयी जो भाषेचा तळ्यात-मळ्यात प्रॉब्लेम असतो: मी पण त्यातूनच जात होतो. तरी अखेर यूपीएससी ची अंतिम लढाई इंग्रजीमधूनच लढावी असे ठरवले. द हिंदू ची बनवलेली डिक्शनरी(हे द हिंदू वाचनार्यांनी सुरूवातीचे दिवस आठवून पहावे☺) बाहेर काढून तिच्या वापरासह इतर अनेक इंग्रजीचे विविध प्रयोग सुरू होते. बोलण्यापासून, लिहिण्यापासून ते अगदी ऐकण्यापासून व पाहण्यापासून इंग्रजीत काय करता येईल ते करायचे असे ठरवलेले( अर्थात या सर्व अचाट प्रयोगावर नंतर पुन्हा कधी तरी लिहू).
तर आज या सर्व बाबींची आठवण यायचे कारण म्हणजे त्या काळातच एक चित्रपट भारतात एकदमच प्रकाशझोतात आला होता, त्यावर सर्व वृत्तपत्रात बातम्या, editiorials, हिंदू चे संडे मॅग्झिन तर सर्व रीलेटेड मासिकांमध्ये देखील त्यावरच लेख येऊ लागले. तो चित्रपट होता "द दा विंची कोड". डण ब्राऊन या प्रसिद्ध कादंबरीकाराच्या याच नावाच्या प्रसिद्ध पुस्तकावर तो चित्रपट आधारित होता. आजही तेव्हाचे ते वृत्तपत्र व पुरवणीतील मोनालीसाचे चित्र व विंची कोड बद्दलचे लिखाण डोळ्यापुढे येते. ते सर्व वातावरण व हाताशी असलेला थोडा वेळ काढून मी व माझा एक मित्र पुण्याच्या इ-स्क्वेअर ला हा चित्रपट अति-उत्सुकतेने पाहण्यास आम्ही गेलो. तोपर्यंत अगदी टायतनिक व जुरसिक पार्क सोडले तर हॉलीवूडचे चित्रपट मी पाहिलेले नव्हते(त्या विषयी अजून नंतर कधीतरी). चित्रपट सुरू झाला आणि तो सुरू राहिला... क्वचितच काही कळत होते. त्याच्या खाली ट्रान्सलेशनची स्ट्रिप येणे पण शक्य नव्हते कारण क्ंप्लिट इंग्रजीत होता. डोक्यावरून ओढून घेतलेले काळे जरकिन घातलेला माणूस मध्येच गायब होत होता, पोलिस सारखे कोणाचातरी पाठलाग करत होते. लूव्र संग्रहालयातील 'मोनालिसा' व 'द लास्ट सफर' या लिओनार्दो च्या चित्रांचे अनेकदा दर्शन होत होते. डिसाफायर व कोड असले काही शब्द कळत होते. मध्येच कुठल्यातरी झालेल्या जोकवर चित्रपट गृहात हास्य उमटले मग बाकी भयंकर कससच होत मी बाजूला बसलेल्या मित्राकडे नजर टाकली तर तो कदाचित भारतात इंग्रजी आणनार्या लॉर्ड मेकोलेंच्या सतरा पिढ्यांचा उद्धार करत असलेला चेहरा घेऊन बसलेला. मग बाकी पूर्ण चित्रपट गुपचुप आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे जे दिसेल ते व जे समजेल ते या प्रमाणे पाहत बसलो.
आता पुन्हा हे आठवण्याचे कारण म्हणजे आजच ब्राऊन यांची ती प्रसिद्ध 'द दा विंची कोड' कादंबरी वाचून संपवली आणि तो चित्रपट, ते लेख सर्व आठवले. एखादी कादंबरी जगप्रसिद्ध होण्यासाठीचा सर्व ऐवज या कादंबरीत अगदी ठासून भरला आहे. निवडलेला विषय अगदी ख्रिश्चन धर्माच्या मुळाशी जाण्याचा असल्याने वादग्रस्त जरी झाला तरी एकूणच कादंबरीचा प्लॉट, त्यातील वेग, पकड, रहस्य टिकवून ठेवण्याची कला असे अनेक वैशिष्ठ्य या कादंबरीत एकसे बढकर एक आहेत.
यानिमित्ताने दान ब्राऊन ने किती संशोधन केले असेल तेही लक्षात येते. कॅथॉलिक चर्चची डार्क साईड एकदम वाचकांच्या समोर येते. ती तशी या पुस्तकातून व चित्रपटातून सामोरी आल्याने जगभर त्या काळात खळबळ माजली होती. येशू ख्रिस्त हा मूळ ज्यू होता व मेरी मॅगडालीन त्याची पत्नी होती, तो एक कुटुंबवत्सल मनुष्य होता हे रहस्य व्हाटिकनने दडपून ठेवले. तो एक सर्व सामान्य पुरुष आहे असे मान्य केले तर त्याला दिलेल देवपण व त्या सोबतच चर्चचे अस्तित्व पण धोक्यात येईल ही भीती त्यामागे होती.
पण तरीही हे सर्व रहस्य वर्षानुवर्ष टिकवून ठेवण्याचे काम प्रायरी ऑफ सायन ही संस्था करत असते. त्यासाठी अनेक सांकेतिक कोड, भाषा, चित्र यांचा वापर या संघटनेचे सदस्य करत असतात. या संघटनेत न्यूटन, लिओनार्दो द विंची असे अनेक प्रतिष्ठित लोक असतात. लिओनार्दो त्याच्या चित्रांमध्ये असे अनेक संकेत पेरून ठेवायचा असे उल्लेख यात येतात. विशेषतः मोनालिसा व द लास्ट सफर ही चित्रे. सोफी ही नायिका व लाँगडण हा नायक यांच्या माध्यमातून हा सर्व मोठया विषयाचा आपल्याला लेखक एक थरारक व रोमांचकारी कथेतून परिचय करून देतो.
कवीमित्र नितिन वाघ यांची मोनालिसा वरील कविता आजच वाचण्यात आली, त्यांच्यामुळेच कळलं की आज लिओनार्दो द विंची चा वाढदिवस आहे. त्यांच्या कवितेतील ओळी,
"काय रे खरंच काही गुपित आहे का तिच्याकडे?
कुठवर पोहोचत होती तुझी नजर
तू कोरलेली स्मशानं
उचकरलेली प्रेतं
छेद गरतींच्या गर्भाशयांचे
कुवाऱ्यांचे कारेपण
काहीच नव्हतं सामान्य तू केलेलं
सगळं इतकं अनैसर्गिक असूनही
तू वाटतो नैसर्गिक फार"
कुठवर पोहोचत होती तुझी नजर
तू कोरलेली स्मशानं
उचकरलेली प्रेतं
छेद गरतींच्या गर्भाशयांचे
कुवाऱ्यांचे कारेपण
काहीच नव्हतं सामान्य तू केलेलं
सगळं इतकं अनैसर्गिक असूनही
तू वाटतो नैसर्गिक फार"
संपूर्ण कादंबरी वाचतांना या ओळी अत्यंत चपखल बसतात हे कोणालाही जाणवेल.
या सर्व प्रवासातून जातांना वाटत होत की, हे असल काही अचाट ताकदीचे आपल्याकडे देखील झाले पाहिजे. हाडा माणसाच्या व्यक्तिला देवत्व देऊन त्यातून आपला स्वतःचा, एखाद्या धार्मिक संस्थेचा किंवा पुजास्थळाचा वापर स्वार्थासाठी करणारी मानवी जमात सर्व्या जगात व जगातील सर्व धर्मात आहे. त्याशिवाय का माणसाच्या जन्मानंतर सर्व धर्मातील ईश्वराने जन्म घेतला आहे.
- समाधान महाजन

फ्लॅशबॅक छान उतरवला आहेस. सगळ्या नवोदयनच्या मनातलं लिहिलंय.
ReplyDeletethanx dear
ReplyDelete