बबन चा शेवट हा एखाद्या इंडियन किंवा हॉलीवूड आर्ट फिल्म मध्ये फार फार तर शॉर्ट फिल्म मध्ये शोभेसा आहे....पण एकूणच वास्तव ढंगाचा ग्रामीण पार्श्वभूमीवर कमर्शियल चित्रपट बनवला जात असतांना असा शेवट टाकणं हे दिग्दर्शकाच्या धाडसाचे कौतुकास्पद काम आहे, अशी भावना काही काळ निर्माण होते. पण काही काळच...
बबन पाहतांना काही जागी सैराट ची आठवण येते अर्थात एखादा कल्ट बनल्यानंतर तशा तुलना होतातच...इतकेच नाही तर भाऊ साहेब कऱ्हाडेंच्या या आधीच्या ख्वाडा चीही आठवण येते...
नागराज मंजूळेंचा फॅन्ड्री व सैराट व भाऊसाहेब कऱ्हाडेंचा ख्वाडा व हा आता बबन या साऱ्या चित्रपटात अस काही आहे कि यातील एक बघतांना इतरांची आठवण नक्कीच येते ...या साऱ्या चित्रपटांमध्ये काही मूळ बाबी सारख्याच आहेत .....ग्रामीण भागातील अर्थात खेड्यातील आजच्या वास्तव सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे आकलन आपल्या चित्रपटातून मांडणारे जे काही थोडे दिग्दर्शक आहेत त्यातील भाऊराव कऱ्हाडे.
पण बबन पाहतांना व त्यातही शेवट पाहतांना जाणवत राहते कि वास्तव अस्सल दाखवण्याच्या प्रयत्नात मुद्दामच भडक पणा तर निर्माण केला जात नाहीय ना ? कि हि आंतरिक स्पर्धा आहे कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्याची....
फॅन्ड्री तील दगड प्रतिकात्मक आहे त्या अंधारात चित्रपट संपतो, ख्वाडातील हातात शस्र आहे जे शोषण करणारयाच्या हाताला मुळापासून उखडू इच्छितात.....सैराट मध्ये शेवटी लहान मुलाची रक्ताने भरलेली पावले व मूक किंकाळी दिसते पण बबनचा शेवट अंगावर येतो ...इतक्या अंत्यतिकतेची खरच गरज होती का अस वाटत राहतं. कि हि पण स्पर्धा आहे अधिक वास्तव व प्रेक्षकांना जास्तीत जास्त सुन्न करून टाकण्याची....
एक सत्य हेही आहे कि जर या चित्रपटात हा भडक पण गंभीर प्रसंग नसता तर बबन वरील हल्ल्याचे व त्याच्या संघर्षाचे निवडक प्रसंग वगळता हा चित्रपट एक ग्रामीण वास्तव व विनोदी चित्रपट बनून राहिला असता...पण एकूणच सर्व वेगवेगळ्या घटनांचे एकत्रीकरण म्हणून तो सलग चित्रपट पहावा वाटतो व तो त्याची पकड बनवून ठेवतो.
बऱ्याच ठिकाणी पटकथा विस्कळीत आहे, काही बाबी अधाराविना सोडून दिल्याने प्रश्न अनुतर्रीत राहतात.नायिकेचे कुटुंब एकदाही दाखवलं गेलं नाही त्यामुळे सुरुवातिला पडलेला प्रभाव शेवटी निघून जातो.
Upsc च्या तयारीच्या वेळी चित्रपटाचा समाजावर पडणारा प्रभाव
अशा अर्थाचा एक निबंध लिहिला होता त्यावेळी दोन्ही बाजू लिहिल्याचे आठवते....
चित्रपटावर समाजाचा प्रभाव असतो कि समाजावर चित्रपटांचा प्रभाव असतो या विषयात एक बाजू घेऊन चालणारच नाही कारण दोन्ही विषय एकात एक मिसळलेले आहेत .....कधी कोणता घटक प्रभावी ठरेल सांगता येत नाही.
सैराट च्या वेळीही हि चर्चा रंगली होतीच, किंबहुना शाळा, टाईमपास, सैराट व आता बबन ....शाळकरी व वयात येणारी मुलं अशा चित्रपटांनी बिघडतात हा आरोप एकीकडे होतो तर समाजात जे दिसत ते आम्ही मांडतो असे या संदर्भातील लोक म्हणत असतात .....
मुळात चित्रपट हि स्वतंत्र कलाकृती आहे व तिचा आस्वाद कला म्हणून घेण्याची समज समाजात असली कि मग चित्रपटाकडे निखळ दृष्टीने बघता येते.
- समाधान महाजन

No comments:
Post a Comment