बोल न हल्के हल्के

आतापर्यंतच्या ज्ञात भूगोल व इतिहासावरून किमान इतक माहिती झालेय कि या ब्रम्हांडात मनुष्य प्राणी हा एकमेव असा प्राणी आहे त्याला आपल्या भावनांची अभिव्यक्ती बोलून करता येते...थोडक्यात मनुष्याला बोलता येते..हे फार मोठ वैशिष्ट्य आहे..अर्थात श्वास घेणे ....बघता येणे... ऐकू येणे  याला आपण जस underestimate करतो ...सहज घेतो तस आपल्याला बोलता येत ...अभिव्यक्त होता येते याला पण आपण सहज घेतो...

पण  कधी कधी याची तीव्र जाणीव होती ....आपलं बोलन समोरच्याच्या कानावर जाईपर्यंत ते आपल असत पण एकदा का ते त्याच्यात पोहचले कि  आपल्याला नक्की काय म्हणायच आहे नेमके तेच त्याला समजल  का हे समजत नाही...आपल्याला अभिव्यक्त असलेला अर्थ त्याला आकलन झाला का हे कळत नाही....

मी लहानपनापासून कमी बोलायचो ( हे आता कळतंय....तेव्हा वाटायचे मी बोलतो तसच जगात इतर लोक पण बोलत असतात असा माझा गोड गैरसमज होता)..upsc/mpsc च्या अभ्यासाच्या प्रोसेस मध्ये बरीच वर्ष काढल्यामुळे हा अभिव्यक्तीचा फरक व विविध प्रकार कळत गेले ......
काहीजन फक्त अभ्यासच करत असतात ..काही जन बोलतात जास्त...काही जन दोन्ही करतात... आपण ज्या प्रकारात मोडतो त्या प्रकारातील लोक आपल्याला दिसतात ...उदाहरणार्थ आपण जर फार बोलणारे असू तर फार बोलणारे व सोबत अभ्यास करणारे व सिलेक्ट होणारे पण आपल्याला दिसतील....
त्यातही upsc करणारे व mpsc करणारे  असे दोन घटक पूर्ण वेगळे आहेत , ते तसे नसतात पण ते स्वतः ला तस समजतात...
mpsc करणारे म्हणजे बडबड बडबड...upsc करणारे म्हणजे एकदम keep quite..उडत्या पक्षाचे पंख क्षणात मोजून काढू असा आत्मविश्वास अंगी बानवून फक्त चहा वाल्याजवळ 'एक कटिंग' असं एकच अपूर्ण वाक्य संबंध दिवसात बोलणारे जांबाज खिलाडी....

अस्मादिक या दोन्ही प्रक्रियेतून गेल्यामुळे असा सार्वकालिक  सर्व अनुभव घेतलेला...

खर तर मुळात अभ्यास करण्याच्या  काळात बोलण्याचा जाम कंटाळा...कधी कधी लोकांना  सर्व समजत असतांना पण लोक का बोलत असावेत असा प्रश्न पडायचा. म्हणजे जरा कुठं उभं राहिले का एकदम भारत-पाक किंवा भारत-अमेरिका प्रश्नावर लोक गहन चर्चा सुरु करतात जणू विदेश मंत्रालयाने यांना सल्लागार समिती वर नेमले आहे....बर त्यातही आमचा political science & international relations  हा विषय परीक्षेसाठी असायचा व आवडीचा पण त्यामुळे एकूणच या विषयातील व देशदेशातील संबंधातील गुंतागुंत चांगलीच माहिती असल्याने....कुठं अशी मुक्त चर्चा सुरु असली कि बोलण्या व ऐकण्या पेक्षा त्रासच जास्त व्हायचा.. अगाध ज्ञान ऐकून.

अभ्यास प्रक्रियेत काही वर्ष गेल्यामुळे (याला मी प्रक्रिया म्हणतोय कारण गिरणीत आपण गहू टाकल्यानंतर त्याचे पीठ बाहेर येण्यापर्यंतचा कालावधी हा या ठिकाणी आठवावा) एकूणच कमी संवादाची सवय लागलेली सो मला अस वाटायचं कि आपण एक वाक्य बोललो तर लोकांना ते समजत असेल वा किमान त्याचा अर्थ तरी त्यांच्या पर्यंत पोहचला असेल पण Alas!! असं काही नसत याचा अनुभव या बोलणाऱ्या जगात येऊन पडल्यानंतर मला आला ....मला असं आवडत नाही किंवा मला असं आवडत पैकी तुम्ही काहीही बोललात तरी बऱ्याच लोकांना ते समजतच नाही आपलं म्हणणं समजण्यासाठी आपल्या साध्या वाक्यांना अजून illustrate करावं लागतं थोडक्यात समोरच्याच्या मानगुटीवर बसून त्याच्या गळ्यात आपलं वाक्य पक्षी म्हणणे उतरतांना बघेपर्यंत त्याला कळलं अस समजू नये अस धोरण बरेच जण वापरतात.....


खूप बडबड करणारी लोक बघून आपल्याला अस सहजच वाटत कि यांच काहीच लक्ष नाही ...हे भरभर बोलत असतात आपण चुकून माकून कुठ तरी जागा मिळाली बोलायला कि एखाद शब्द किंवा वाक्य बोलतो...ती कधी प्रतिक्रिया असते कधी वेळ निभवायची असते...कधी का बुवा आपण चूप राहायचे चला जरा बोलू काहीतरी म्हणून बोललेले एखाद वाक्य असत....फार फार तर बोलणाऱ्याला  थांबवायचं असते...पण सावध असा ...हि फार बडबड करणारी लोक्स अत्यन्त चाणाक्ष व टीप कागदासारखी असतात .... तुमच्या कपाळावर जमलेला घामाचा बिंदू चटकन टिपून त्याचे बारकाईने व सखोल विश्लेषण करून यांनी स्वतः जवळ साठवलेले असते व नुसते साठवतच नाही तर पुढच्या भेटीवेळी आपला स्कॅन केलेला एक शब्द किंवा वाक्य लक्षात ठेवून ते सावध बडबड करत असतात ....एकूणच कमी बोलणाऱ्या व लौकिकार्थाने आतल्या गाठीचे समजल्या जाणाऱ्या लोकांपेक्षाही हे बडबड व्यक्तिमत्व धोकादायक असतात....

व्हाट्सअप च्या एकूणच टायपिंग प्रकारांमुळे अनेक समज गैरसमज निर्माण होतात ......(अपूर्ण)
       - समाधान महाजन 

No comments:

Post a Comment