माणस माणूस बघून वागतात म्हणजे नेमके काय करतात?....
बऱ्याचदा जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत कस वागायचं किंवा त्याच्याशी कसा संवाद ठेवायचा किंवा एकूणच त्याच्याशी ठेवल्या जाणाऱ्या संबंधाचा बेस काय असेल असा प्रश्न पडतो तेव्हा सामान्यतः लोक स्वतःच्या विचाराऐवजी दुसऱ्यांनी त्या व्यक्तीबद्दल काय सांगितल आहे त्याचा अधिक विचार करतात व त्याप्रमाणे वागतात....
नवीन जागेत राहायला गेले तेव्हा शेजारी म्हणून किंवा नवीन संस्था किंवा ऑफिस जॉईन केले तेव्हा सहकारी म्हणून बॉस म्हणून किंवा हाताखालची व्यक्ती म्हणून एकूणच माणसांनी भरलेल्या त्या आपापल्या जगात प्रत्येकाचे दुसऱ्याबद्दल मत असतात. काही व्यक्तींचा स्वभाव सर्वांना माहिती असल्याकारणाने त्याच्याबद्दलचे मते जगजाहीर असतात. मग लोक अशा माणसांशी ठरवून वागतात....
मला दरवेळी वाटत राहत कि हे अस नसावे ......ज्याप्रमाने एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या नकारात्मक बाजूने बोलले जाते तर नक्की ते तसे का बोलले जात असावे या मागे काही कारण असल्याशिवाय ती व्यक्ती तसे वागणार नाही....पूर्वी मी अशा व्यक्तींशी नैसर्गिकपणे बोलायचो माझा जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे बोलायचो व मला जाणून घ्यायचे असयाचे कि ती व्यक्ती लोक म्हणतात तशी आहे का नक्की......
व ती तशी नाही वाटली मला कि मग प्रश्न पडायचा कि एखाद्या व्यक्तीला पारखतांना लोक स्वतःच्या डोक्याचा का वापर करत नाहीत? का दुसऱ्यांनी सांगितलेल्या मताला बेस बनवून तिसर्याशी कसे वागायचे ते ठरवतात....कदाचित एखादी व्यक्ती सर्वांनी सांगितल्यापेक्षा आपल्याशी वेगळे वागू शकते...जर आपण आपल्या नैसर्गिकपद्धतीने त्या व्यक्तीशी संवाद साधू शकलो व आपली काही मते जरी जुळली तरी हे सबंध इतरांपेक्षा वेगळे व चांगले असू शकतात......पण बरेच जन असे स्वतःच्या हिकमतीवर सबंध ठेवण्याचे धाडस करत नाहीत.....
एकदा एक साहित्यिक कार्यक्रम होता....महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संस्थेचे संचालक जे माझे मित्र होते तेही या कार्यक्रमास एक रसिक म्हणून उपस्थित होते...कार्यक्रमात वेगवेगळ्या साहित्यिकांनी आपापली मते मांडली ...मी माझ्या या मित्राच्या प्रतिक्रियांचे नकळत निरीक्षण करत होतो....जे साहित्यिक महाराष्ट्रात प्रसिद्द आहेत किंवा ज्याची नावे या ना त्या कारणाने वृत्तपत्रात किंवा इतर माध्यमात झळकत असतात ती लोक बोलायला आली कि याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत असे. त्यांच्या टाळ्याखाउ वाक्यांना हा जोरदार प्रतिसाद देत असे अगदी मन व मान लावून तो ऐकत असे....पण मध्येच एक साहित्यिक ज्यांचे फार पुस्तके नव्हती एक-दोन कवितासंग्रह व एखाद दोन कथासंग्रह त्यांच्या नावावर होते...ते बोलण्यासाठी उभे राहिले........ या व्यक्तीचे जे काही लिखाण मी वाचले होते ते मला खूप आवडले होते..त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो ....त्यांनी पण आपली मते छान मांडली ....फक्त त्यांना टाळ्याखावू वाक्य फेकता आले नाही किंवा लोकांना हसवता आले नाही साहजिकच त्यांचे भाषण फार सपक वाटले लोकांना.....
कार्यक्रमानंतरच्या चर्चेत माझा मित्र म्हटला कि या सर्व कार्यक्रमात कमजोर कडी कोण मला वाटल असेल तर ते साहित्यिक..म्हटल का रे बाबा ...तर म्हणे ते काही खास बोलले नाही .....म्हटल तुला ते तस वाटल नाही कारण तू त्यांचे नाव ऐकले नाही पण ते लिहितात दर्जेदार ....पुढे जाणारा माणूस आहे हा .....
झाल काही दिवसात त्या साहित्यिकाच्या पुस्तकाला लागोपाठ चार-पाच पुरस्कार मिळाले ...वृत्तपत्रात नाव आले ....आणि अपेक्षितपणे माझ्या त्या मित्राचा मला फोन आला कि, तू म्हटला होता ते बरोबर होते. हे अस का झाल असावं याचा मी विचार केला ...माझ्या त्या मित्राच्या संस्थेचा पसारा इतका मोठा होता कि त्याला एकूणच वाचनाकडे लक्ष देण्यास वेळच नव्हता...त्यामुळे लहानपणी त्याने वाचलेले साहित्यिक ....सतत माध्यमातून झळकणारे साहित्यिक ....मोठ्या संमेलनांचे अध्यक्ष ......भाषणात तरबेज असणारे साहित्यिक हाच मापदंड तो लावत होता ...अन तस पाहिलं तर ते त्याच्या बाजूनेही मला बरोबर वाटत होत....एकूणच आयुष्यात इतकी धावपळ असतांना, स्वतः वाचून मग दर्जेदार साहित्य व साहित्यिक ठरवण्याचा वेळ त्याच्याकडे नसतांना तो अजून काय करू शकत होता पण मला सोबत वाईट या गोष्टीचे वाटत होते कि मग असे अनेक चांगली लोक या क्षेत्रातील त्याला कधी कळतील कारण त्याच्या संस्थेच्या मोठमोठ्या कार्यक्रमात तो फक्त अशा आधीच प्रसिद्द असलेल्या लोकांना बोलवत असेल तर या अशा लोकांपर्यंत तो कधीच पोहचू शकणार नाही .....व ती लोक पण जास्त लोकांपर्यंत पोहचू शकणार नाही....
हा विचार माणसांसोबतच मला पुस्तकांबाबत येतो....जगात वेगवेगळ्या भाषांमध्ये इतकी दर्जेदार पुस्तके आहेत निव्वळ नोबेल विजेत्या लेखकांची पुस्तके जरी घेतली किंवा निव्वळ भारतातील चांगली चांगली पुस्तके जरी घेतली फार फार काय तर मराठीतील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके जरी घेतली तरी ती वाचण्यासाठी लागणारा वेळ खूप असेल .......श्री.ना.पेंडसे., नेमाडे, माडगुळकर, शिरवळकर, पाध्ये, आणि अजून अनेक जन असे वाचण्यासच खूप वेळ लागेल तेव्हा माणूस नक्कीच selective होत असेल का? आणि जर तो असा होत असेल तर एक-दोन दर्जेदार पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांवर तो अन्याय नवे का ?
म्हणजे मग एकूणच जगण्यातील धावपळ व वेळेचे गणित लक्षात घेता एखाद्या माहित नसलेल्या व्यक्तीशी स्वतःहून अंदाज करून सबंध न वाढवता ऐकीव माहितीवर आधारित त्याच्याशी बोलणे म्हणजे त्याच्या एकूणच असण्याकडे व त्याच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करण्यासारखे नव्हे काय किंवा मुळातच वेळ कमी असल्याने प्रसिद्ध तितकीच पुस्तके वाचणे व इतर काही माहित नसलेल्या पण दर्जेदार पुस्तकांकडे दुर्लक्ष करण्यासारखे नव्हे काय?
- समाधान महाजन
No comments:
Post a Comment