श्याम मनोहर-प्रेम आणि खूप खूप नंतर

श्याम मनोहर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले व मित्रवर्य नामदेव कोळी याच्यामुळे लगेचच वाचायला उपलब्ध झालेले 'प्रेम आणि खूप खूप नंतर' हे पुस्तक दोन दिवसात वाचून संपवलं,
मुळातच खूप दिवसांपासून काही तरी जबरदस्त आशय असलेली मोठी कादंबरी वाचावी अस मनात होतं, योगायोगाने जळगावात नामदेव ने हि कादंबरी उपलब्ध करून दिली अन अक्षरशः बैठकीत वाचून संपवली.

अन खूप निराश झालो, या ऐवजी अजून काही दुसर वाचलं असत तर बर झालं असत अस वाटायला लागलं. कादंबरीची सुरुवात करायला गेलो अन वाचतांना अस वाटायला लागलं कि, जणू शंकर महादेवन चा ब्रीथलेस अलबम चे कडवे वाचतोय कि काय . वाचतांना दम न घेता वाचलं कि तो अलबम च होईल ब्रीथ लेस गाण्याचा. उगाचच फुल स्टॉप दिलेयेत.

बदाम पसंदा ची रेसिपी छान आहे, तेव्हडी तीन चार पाने व त्याच्या रेसीपीचे चित्र पाहतांना काही वेळ वाटले कि मी खाना खजानाचे पुस्तक वाचतोय कि काय,

बर हे सर्व वेगवेगळ्ळे प्रयोग करून हि खिन्नता, विषन्नता, satire nes , आनंद, दुःख, आवड, पात्रांमध्ये गुंतन, फिल करणं या पैकी चक्क काहीही वाटत नाही.

गणित तज्ज्ञ रामनुजांचे आतून बाहेरून एकाच विषयाने भरलेले विचार, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, यांच्या विषयीचे मते, विचार श्रीमंत लोकांच्या जीवनातील चढउतार अस काहीस अत्यन्त विस्कळित पणे मांडलेल्या पटात वाचक involved होत नाही.

आधुनिक जीवन पद्धती,  NGO त काम करणारे लोक व भांडलवाद यांच्यातील विविध पैलू रवींद्र रुक्मिनाथ यांच्या कादंबरीत अधिक सकस वाटत राहते.

- समाधान महाजन

No comments:

Post a Comment