या शहरात आलं कि, काळ पळत पळत येऊन बोट पकडून भूतकाळात घेऊन जातो....अंगावर येणारा चौक... केव्हाही जोराने कोसळू लागेल इतपत तुडुंब भरून आलेले आभाळ...कोणीच नाही घरी वाट पाहणारे तरी घरी जायची फुका लागलेली ओढ ...साल हे बुळे मध्यमवर्गीय संस्कार व रिवाज...परत घरी जाण्याचे ....का जायचं घरी परत...या संपूर्ण अंगावर येणाऱ्या कोलाहालाचा भाग बनून यातच विरघळून जायचय मला....
ते बस स्टँड च्या कोपऱ्यातील बाकाखाली संपूर्ण भिजून कुडकुडणाऱ्या बारीक कुत्र्यात व व त्याच बाकावर निवांत आपला सर्वांग गलिच्छ पणा पांघरून पडलेल्या भिकाऱ्यात असलेला फक्त आजचा दिवस जिवन्त दिसतोय .... बाकी सारी बस स्टँड वर जमलेली जनता एक तर गेलेल्या गाडीचा शोक मनवतेय किंवा एक तर अजून न आलेल्या गाडीचे स्वप्न पाहतेय....
- समाधान महाजन

No comments:
Post a Comment