मित्र शब्द बऱ्याचदा फसवा वाटतो, त्यातही हे असं व्यवहारी जीवनात रोजचच फिरणं असतांना त्यातील फोलपणा लगेच जाणवतो, पण असतात अशी काही नाती हृदयाशी जोडलेली त्यात कसलीच अपेक्षा नसते, देणं-घेणं नसत, मागणी काहीच नसते पण तरी मन ओलं झालेलं असतं, डोळ्यात काहीतरी दाटून येते व काही क्षण गच्च डोळे बंद करून त्याच्या आठवणींचा गारवा तप्त देहावर फुंकर घालून जातो.
आज एकदम नवीनच नम्बर वरून तुझा फोन आला,प्रवासात बऱ्याच उशिरा लक्षात आलं मग मीच फोन केला परत व तुझा आवाज खूप वर्षांनी ऐकला... तेव्हा खर तर काय बोलाव मला सुचत नव्हतं व तू आपलं सारख्या ह्याच इंप्रेशन मध्ये कि मी काहीतरी ऑफिसच्या कामात,मीटिंग मध्ये वैगेरे असेल तू सारखा विचारत होतास नंतर करू का ? कामात आहेस का? अन मला नेमकं काय बोलावं शब्द सुचत नव्हते. खरं तर मला ओरडून सांगावं वाटत होतं मित्रा बोल तू, बोलत रहा, मला मोकळं बोलायच खूप बोलायचय तुझ्याशी .......पण यापैकी एकही शब्द फुटला नाही तोंडातून ......मग तूच म्हट्लास करतो नंतर म्हणून तरी मी तुला आडवू शकलो नाही.
मग माझा तो सम्पूर्ण दिवस असाच ओसाड गेला ......
अन त्या ओसाड माळरानावर सोसाट्याने वाहणाऱ्या तुझ्या आठवणींनी मला पार सैरभैर करून टाकलं.......
खर तर तू त्या दिवसात का बोलावं माझ्याशी, अन का आवडावा तुला माझा सहवास?? अस काही वेळा वाटून जायचं ....माझ्या फटकळ स्वभावाने अनेकदा उचल खाल्ली पण कि तुला विचारावे पण तेव्हा नाही विचारलं आता वाटत विचारलं असत तरी तू खूप शांत पणे छान उत्तर दिले असते ........ पण तेव्हा वाटायचे मला कि अस काही बोलण्याने तू माझ्या पासून दूर गेलास तर?? असंही व्यक्त होऊ शकणारी तेव्हा माझी खूप कमी ठिकाण होती त्या पैकी तू एक ....तुला दुखावून कस चाललं असत .....
तुझे डोळे कमालीचे निरागस होते लहान बालकासारखे ... तो nascent innocence मला खूप आवडायचा.... दुसर तू माझ्यासारखाच बंडखोर होतास...... तू काही क्षणापूरती सर्व बंधने झुगारून प्रसंगी घरी खोटे बोलून ड्युटीच्या ठिकाणी काही दुसरे कारण सांगून फक्त माझ्यासाठी जेव्हा वेळ काढयाचास तेव्हा खर सांगू तेव्हाही उर भरून यायचं व आताही येतंच...
बर वेळ काढून काय करायचो आपण तर तुझ्या बाईक वर जिल्ह्याला जाऊन माझी पुस्तक आणायचो, कधी कसली कागदपत्र जमा करायचो , एखाद्या lecture ला जायचो किंवा फार फार तर लांब शहराच्या बाहेर कुठतरी ..एखाद्या पुलावर वा रिकाम्या जागेवर जाऊन बसायचो बऱ्याचदा निःशब्द .....निसर्गाचा आस्वाद घेत ............तेव्हाचा तो गवताचा वास, पक्षांचा आवाज व मध्येच येऊन जाणाऱ्या एस टी बसचा आवाज आजही मला तसाच ऐकू येतो अनेकदा..
माझ्या आयुष्यातील पहिली चार चाकी गाडी जी मला आपली वाटली ती तुझीच व पहिल्यानंदा मोठ्या गाडीत बसलो ते तुझ्याच....तू हि इतका माझ्या सारखाच गुलछबू कि एखाद्या रिक्षाला बोलवावे तस मी तुला कॉल करून बोलवत असे तुही गाडी घेऊन यायचास व आपण जायचो कुठं तर चहा प्यायला ....
हे अस फार दुर्मिळ झालेय रे आजकाल ...लोक अंतराचा हिशेब करायाला लागतात लगेच ....अशावेळी मित्रासाठी बहिशोबी होणाऱ्या तुझी खूप आठवण येते.
आणि सर्वात महत्वाचे माझ्या आयुष्यातील त्या अनेक अपयशी संध्याकाळ जेव्हा खुल्या अवकाशाखाली पसरलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यात मी तोंड खुपसून झोपलेलो असतांना तू मला समजवत रहायचा व माझ्या भविष्यातील यशाची खात्री मलाच देत रहायचा... तू मला कठोर, व्यवहारी , विचारी मानायचास पण खर सांगू तेव्हा माझ्या इतका कमजोर कोणी नसायचं पण तुझ्या त्या अश्वासक शब्दांनी मला खूप बर वाटायचं...तुझे ते निरागस डोळे मला आशादायी करायचे....
कुठून आणायचा रे तू माझ्यावर इतका विश्वास?
मिस यू डिअर.
-समाधान महाजन

सर कोण आहे हा तुमचा मित्र
ReplyDelete