# लिटररी नोंदी # पाच
पावसाळी दिवसांची सुरुवात, उन सावलीचा सुरु असलेला खेळ, गाडीच्या साईड विंडो मधून दिसणारे काळेभोर ढग, पूल उतरत असतांना रस्त्याच्या बाजूच्या इलेक्ट्रिक पोलांची एक सरळ रेषेत मागे पळत जाणारी लाईन. मागच्या बाजूच्या रिकाम्या रस्त्यावरून हळूहळू जवळ येत जाणार्या कारसारखी सरळ मनात जागी होत जाणारी तुझी आठवण, आणि वळणावर अजून एक आर्त आलाप घेत स्पंदन वाढवणारा अर्जित सिंग..........बस्स,
नाही जायचंय आता कुठ, नको ते रुटीन , तोच रस्ता, तेच ऑफिस , तेच घर, तीच मानस, तोच तोच ठरलेला वेळ.....आता नकोय.....
... हे सगळ झुगारून कुठल्याही बंधनात बांधून न घेता सैरवैर सुटलेल्या व अफाट वेगाने स्वतःच्याच मनात रमलेल्या बेफान मनाला वाटेल तस व व्वाटेल तिकडे जाव, कुणाचीच अगदी
स्वतःचीही पर्वा न करता ....एकदम बिनधास्त ........पणे ....
इतक्या कि अगदी रस्त्यात तू जरी दिसली तरी तुझ्याकडे न पाहता अत्यंत मुजोरपणे सुसाट निघून जाव.....
तशीही आताची तू मला सोबत असण म्हणजे तेव्हाची तू माझ्यासोबत नसण्याइतकच तीव्र वेदनादायी आहे माझ्यासाठी........
.......त्यामुळे मला आवडलेले तुझ्यासोबतचे सुगंधी क्षण, अंगभर तसाच टिकउन ठेवलेला तुझा स्पर्श, कानात अजूनही गुदगुल्या करणारे तुझे आकार-उकार-हुंकार....तू घेत आलेली काळजी, मला मनापासून आवडणारी तूझ्या वाट पाहण्याचा अंदाज, मध्येच अंदाज चूकउन येणारा तुझे चुकार फोन......अस खूप काही, खूप काही......जे त्या त्या दिवसात आणि हो रात्रीत पण मला जे जे वाटलेले असेल ते सर्व...... सोबत घेऊन जात रहाव....
....मन मानेल तस ...मन म्हणेल तिकडे.....
...पण आता तू नकोय .... अन तुझी अलीकडची आठवण तर बिलकुलच
नकोय......
नाहीतर मग बाकी प्रश्नांचे अवाढव्य डोंगर उभे राहतात माझ्या शहराच्या चोहोबाजूंनी व अंधार करून टाकतात सारीकडे ...मग माझ्या नजरेला बाकी काहीच दिसत नाही.
..... तरी मी उजेडाच्या आशेने धो धो पावसात अंधार वाढतच असतांना ...... ..तुझ्या डोळ्यातली ती चमक शोधत राहतो राणी ....
........वेड्यासारखा.
# समाधान #

No comments:
Post a Comment