वन साईड

मध्यमवर्गीय घरातील मुली एका सुरक्षित वातावरणात वाढतात. आई, वडील, बहिण, भाऊ इतकं चौकोनी जग, अध्ये मध्ये काका, मामा, आजोबा आजी इत्यादी पण सगळ कस विश्वसनीय व खात्रीशीर....

कोणी शरीर म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही. त्या एक सेपरेट आयडेंटी असतात.

बाहेरच्या जगाशी संपर्क थेट येत नाही, आलाच तर फार कमी...

इकडे फक्त शरीरावर पोसलेले व  अफाट फोफावलेले parallel जग त्यांना माहिती नसते....

आणि एखाद्या क्षणी त्या जगाशी त्यांचा सबंध आलाच तर त्या गोंधळतात, भांबवतात. नेमक्या या वेळी परत त्यांना घराच्या सशक्त आधाराची गरज असते. तो या वेळी मिळायला हवा....

आम्ही लहान असताना उल्हासनगरच्या रिंकू पटेलची घटना झाली होती. दहावीच्या विद्यार्थिनीला वर्गात जाळण्यात आले होते. आयुष्यात समजलेले व वाचलेले ते प्रथम निर्घृण कृत्य होते....  त्या काळी सर्व वृत्तपत्रातून, चित्रलेखा, लोकप्रभा आदी साप्ताहिकातून त्यावर अनेक दिवस लिहून येत होते....रिंकूचा रेफ्ररंस देऊन पुढील महिला अत्याचाराच्या घटनांबाबत लिहून येत होते....

नंतर हे सर्व हळूहळू बंद होत गेले... एक वेगळ्याच काळात आता आपण जगत आहोत. मानवी संवेदना बोथट च नाही झाल्यात. संपल्यात अगदी. स्क्रीन वर दिसणारे हिंसक प्रकार व प्रत्यक्षात होणारे यात लोकांना काहीं फरक वाटतोय की..नाही.. असा प्रश्न उभा राहतोय...

फ्रीज, मिक्सर, कुकर...

राग, किळस, भीती...

मुलींनी स्वतः ला पण जपायला हवं..

व्यापक सामाजिक, मानसिक समस्या समोर उभ्या आहेत. आयुष्य एकच आहे. जगायला हवं.

# वन साईड

No comments:

Post a Comment