रणांगण - विश्राम बेडेकर

रणांगण विश्राम बेडेकरांची छोटी कादंबरी. त्यांच्या अनेक कादंबऱ्या फेमस आहेत. लहानपणी अगदी शाळेत असताना त्यांचे ' एक झाड दोन पक्षी ' हे आत्मचरित्र वाचले होते. तेव्हा कितपत कळाल सांगता येणार नाही पण त्यानंतर त्यांच्याबद्दल जेव्हा केव्हा काही वाचले ते चांगलेच समजत गेले. 

त्यातली त्यांची रणांगनचे नाव अनेक ठिकाणी वाचण्यात आलेले. मध्यंतरी कादंबरी वाचणेच बंद केल्याने कोणत्याही कादंबरीचा तसा संबंध आला नाही. अचानक हे पुस्तक भेटले. 

....१९३९ ला रणांगणची पहिली आवृत्ती आली. २०२३ ला देखील ती फार जुनी वाटत नाहीय. काळाच्या मानाने बरीच बोल्ड व बोलकी आहे. थोडी एम टी आयवा मारूची आठवण येते पण जॉनर वेगवेगळे आहेत.

मला वाटतं काही वर्षांपूर्वी रणांगण upsc च्या अभ्यासक्रमात होती. मराठी साहित्य या वैकल्पिक विषयात. वाचल्याचे आठवते. 

असो, तर कादंबरीतील वर्ष 1939 आहे, साहजिकच दोन महायुद्धामधला हा काळ होता. यात यहुदी(ज्यू) हर्टा तिचा जर्मन प्रियकर यांची ताटातूट. बोटीवर तिच्या त्याच्या संदर्भातील आठवणी. चक्रधर विध्वंस हा नायक तिला बोटीवर भेटतो. त्याचे एकूण आकलन. प्रेम, शरीर व स्री या या बाबत त्याचे त्याने व्यक्त केलेली मते. त्या काळातील हिटलर, जर्मनी इटली यांचे येणारे संदर्भ तरी आदिम मानवी स्वभावा चां विचार करता व कादंबरीत वापरली गेलेली भाषा बघता ही कादंबरी काल परवा लिहिली गेलीय की काय इतकी ती relevent आहे. 

- समाधान महाजन 

No comments:

Post a Comment