नक्कीच पाहायला हवा.
ज्या तत्वाने Raja Gaikwad राजाभाऊ यांचे गढीवरून विकत घेऊन रसातळाला जाणारी मराठी संस्कृती आपण वाचवली. त्याच तत्वाने मराठी चित्रपट सृष्टी तग धरून राहण्यासाठी तेंडल्या नक्कीच पाहायला हवा.
त्यांच्या अत्यंत दिलखेचक पक्षी भणान पोस्टी वाचून याची हाती आपण उदार होत हजारच्या पुढच्या लाईकी ठोकून देतो त्याच उधारपणे तेंडल्या पाहणे मश्ट्...
बालाजी सुतार भाऊ यांनी तर अंबेजोगाई, आष्टी , औरंगाबाद आदी भाग सोडून तेंडल्या नागपूरला एका वटवाघळे असलेल्या थियटरात जाऊन इमाने इतबारे पाहिला त्याच निष्ठेने आपण अगदी नागपूरला त्याच थियट्रात जाऊन न पाहता आपापल्या शहरातील जिथे असेल तिथे तेंडल्या पाहणे मश्ट... वटवाघुळांची शपथ.
वाटल्यास वटवाघळे सोबत घेऊन जाऊन तिथे सोडले तरी चालतील.
आमच्या अधिकारी भगिनी रा. रा. Rajashree Shivajirao Jadhav यांनी देखील सारखे पळत पळत राहून स्वतःच स्थापन केलेले विक्रम स्वतःच मोडीत काढण्याचे अनोखे उपक्रम थांबवून एक दिवस खास ठेट्रात जाऊन तेंडल्या पाहिला... शिवाय त्यांनी ते प्रोडक्ट आमच्या इस्लामपूर भागातील असल्याचे सांगून ....थोडक्यात आता कसे जात नाही बघतेच... असा दम दिलेला असल्याने तेंडल्या पाहणे मश्ट.
शिवाय अनेक जाणत्या अजांत्या...लहानथोर...तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मंडळींनी तेंडल्या पाहण्याचे आवाहन केलेले आहे ते बिलकुलच टाळता येण्याजोगे नाही. पक्षी मराठी संस्कृती ... ..पुढचे सुज्ञास सांगणे न लागे..
माझ्या सहित 90 ज (इथे वर्ष असा अर्थ घ्यावा) मध्ये रमणाऱ्या तमाम नॉस्टलजिक मंडळींनी वारंवार धमकी सदृश्य भाषेत सांगितले आहे की तेंडल्या पाहून लहान पणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळेल सो त्यांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी तुम्ही ठेत्रात जाऊन तेंडल्या पाहणे मश्ट....
आज या ठिकाणी मराठी भाषा, चित्रपट व संस्कृती वरील प्रेम इतकेच व्यक्त करून थांबतो. सर्वांना तेंडल्या मय शुभेच्छा...
(लक्षात ठेवा तेंडल्या थेट्रात जाऊन फॅमिली व मित्र परिवारासोबत जाऊन पाहणे मश्ट. अन्यथा या पोष्टित उल्लेख केलेली मंडळी माझ्यासकट तुम्हाला स्वप्नात येऊन येऊन तेंडल्या पाहायला उठवतील.....)
- समाधान महाजन

❤️❤️❤️❤️❤️
ReplyDelete