जूबली

 'Acting is just a matter of editing…Editing can create a different character.'


'देखो ये दुनिया के मेले, सारे के सारे अकेले. लाखो दिलो के ये रेले सारे के सारे अकेले.


विक्रमादित्य मोटवाने याची नवीन सिरीज ' जूबली चांगली आहे. ४०-५० च्या काळातील फिल्म इंडस्ट्री संदर्भातील हि स्टोरी आहे. चित्रपट निर्मिती मागील अनेक घटना यातून कळतात. आपल्याला पडद्यावरचा चित्रपट दिसतो. तो आपल्यापर्यंत पोहोचण्या आधी खूप काही झालेले असते. हे खूप काही म्हणजे जुबली. यात रॉय टॉकिजवर दाखवण्यात आलेले आहे. असे म्हणतात की, तेव्हाच्या बॉम्बे टॉकीज वर ते बेतलेले आहे. ज्यांना चित्रपटात व त्याच्या विविध काळातील घटनांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ही सिरीज नक्की आवडेल.

यातील मला आवडलेली गोष्ट म्हणजे तो काळ दिग्दर्शकाने जिवंत उभा केला आहे. गाड्या, कपडे, इमारती, फोन अगदी ५० च्या काळातील वाटतात. ड्रेस डिझायनर व आर्ट परफेक्ट उभे केले आहे. गाणी अप्रतिम आहेत. त्या काळातीलच वाटतात.

यात आतील संघर्ष, स्पर्धा, डावपेच, अंतर्गत राजकारण दाखवल्यामुळे जेव्हा खान स्वतःचा चित्रपट पाहायला थिएटर मध्ये जातो तेव्हा त्याच्या प्रती लोकांचे प्रचंड कौतुक त्याच्या वाट्याला येते ते बघतांना त्याची gravity कळते. 

रॉय टॉकीज एकेकाळी जी सिने निर्मितीत टॉप असते ते एम्पायर काही निर्णयांमुळे जमीनदोस्त होते. त्याचा प्रवास यात आहे असे म्हणणे सरधोपटपणाचे होईल. यातून आपल्याला खूप काही मिळते. जीवनाचे चढउतार कळतात. निष्फळपणा, शून्यता कळते आणि विशेष म्हणजे असे खूप काही जे शब्दात सांगता येणार नाही. 

मदनकुमार, निलोफर, रॉय बाबू, सुमित्रा सर्वांनी जबरदस्त अभिनय केला आहे. स्पीड स्लो आहे. पण त्या काळाशी सुसंगत आहे. 


No comments:

Post a Comment