तो 2012 चा डिसेंबर महिना होता. मी दिल्लीतच होतो. थंडी तीही दिल्लीची पहिल्यांदाच अनुभवत होतो. आयआरपीएसची सेवा जॉईन करायची किंवा कसे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी अजून काही दिवस मी तिथेच थांबणार होतो. निर्भयाचे प्रकरण त्यावेळेसचे. शाश्री भवन मधील काम झाल्यानंतर दिवस कसा घालायचा हा प्रश्न असतांना इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या मधील उभ्या आडव्या रस्त्यांवर निरुद्देश पणे मी फिरत असे. असेच एक दिवस कानाला इएर फोन लावले व एफएम सुरू केले असता ही भयंकर घटना एकू आली. कोणतेही चॅनेल लावले तेच ऐकु येत होते. लगेचच जिथे मी मुक्कामी होतो त्या साऊथ एव्हेन्यू मधील ब्लॉक वर आलो. टीव्ही सुरूच होता तिथेही तेच दाखवत होते.
यानंतरच्या काही दिवसात या घटनेवरील प्रतिक्रियांनी संपूर्ण देश पेटून उठला. मी जोपर्यंत दिल्लीत होतो तोपर्यंत वातावरणातील आग इतकी जाणवत नव्हती. तसे ते थंडीचे दिवस होते. जनरली साऊथ दिल्ली व इतर भागांमध्ये किवा मेट्रो मध्ये फिरत असतांना सर्व रुटीन नॉर्मल जाणवत होते. टीव्ही किंवा एफ.एम च्या कार्यक्रमात ज्या पद्धतीने यावर चर्चा सुरू होती तसे जाणवत नव्हते, असेलही कदाचित लोकांच्या डोक्यातील संताप व राग हा बाहेरून कधी दिसतो का?
काही दिवसात मी परत दिल्लीत आलो तोपर्यंत आग प्रचंड पेटलेली होती. ज्या राजपथावर मी आरामात हिंडत होतो तिथे निषेध, मोर्चे, धरणे, मेणबत्ती मोर्चा व निर्भयाच्या समर्थानार्थ प्रचंड जनमत जागे होत होते. पोलिसांवर व एकूणच कायदा व सूव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. ते सर्व ऐकल्यावर कोणत्याही माणसाला चीड व संताप येणे साहजिकच होते.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हनजे नुकतीच नेटफ्लिक्स वर त्या बाबत 'दिल्ली क्राइम' ही वेबसिरीज पाहिली. अत्यंत जबरदस्त वाटली. आतापर्यंत इतका रीयल इन्वेस्टिगेशन चा प्रकार पाहिला नव्हता. कायम आपण खिळून राहतो. एकदा पहिला भाग सुरू केला की पूर्ण भाग संपेपर्यंत आपण मोबाइल सोडत नाहीत इतका जबरदस्त performence त्यात आहे.
पोलिसांवर टीका करणे किती सोपे आहे पण त्यांचे काम किती अवघड आहे हे या निमित्ताने लोकांना नक्कीच समजेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तपस पूर्ण होईपर्यंत सलग पाच दिवस डीसीपी साऊथ दिल्ली च्या स्टाफ मधील कोनीही घरी जात नाही ना कोणी पूर्ण झोपत ना कोणी पूर्ण जेवत असे.
यात सर्वात धक्कादायक प्रकार काय होता माहितीय का कि जो वास्तवात पण घडला होता – तो म्हणजे हा अपराध करणाऱ्या क्रिमिनिल्सचा कबुलीजबाब. महत्वाचे म्हणजे तो जवाब देतानाची त्यांची प्रतिक्रिया.... त्यांची देहबोली. त्यात अपराधभाव कमी जाणवतो... उनको मिलता है...तो हमे क्यू नही टाईप बोलणे..... भारतातील अर्धशिक्षित ग्रामीण भागातून एकदम मेट्रो मध्ये पाउल ठेवणाऱ्या अर्ध्या कच्च्या वयातील पोरांच्या हातात असलेला मोबाईल...स्वस्त डेटा...व आजूबाजूच्या रस्त्यांवरून....इमारतींवरून....मॉल्समधून....मार्केट मधून अगदी अंगाला खेटून जाणारे एक वेगळे...वरवर परिचित असणाऱ्या जगाचे जे visiuals त्यांना प्रत्यक्षात दिसतात त्या मागील... अर्थकारण.... बदल...क्षमता... कारणे...या त्यांच्या आवाक्यापल्याडच्या बाबी असतात.
मग ओरबाडून घेणे, हिसकावून घेणे, असे प्रकार वाढतात. एक मोठ्या संक्रमणातून व तेही प्रचंड वेगाने जात असतांना भारतीय सामाजिक आरोग्यापुढे उभे राहिलेले असे प्रश्न कोण्या एक एकट्याचे काम नाही...हा आवाका मोठा आहे.
असो, सिरीज खूपच सुंदर आहे... अशा सिरिज नक्कीच माणसाला प्रचंड मोठे बौद्धिक खाद्य देवून जातात.
- समाधान महाजन
(२३ फेब्रुवारी २०२०)
दिल्ली क्राईम – सिझन 2
दोन तीन दिवसांपूर्वी दिल्ली सिझन 2 बघण्यात आला. यातील वृत्तिका चतुर्वेदीची टीम यावेळी नव्या क्रिमिनिल्सला पकडण्यात व्यस्त आहेत. नेहमी प्रमाणे शेफाली शाह dcp ची भूमिका जगलीय... डिपार्टमेंट चे अंतर्गत राजकारण... प्रमोशन व डायरेक्ट IPS च्या पोस्टिंग ..... हेवे-दावे... अशा बाबींवर प्रकाश टाकत सिरीज पुढे सरकत जाते...
अनेक ठिकाणी क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या चड्डी बनियन gang चा संदर्भ व टी gang पकडण्याची जबाबदारी या टीमवर येते.
हा सिझन देखील ग्रीप व सस्पेन्स ठेवण्यास यशस्वी झाला आहे. डी नोटीफाईड ट्राईब व पोलीस विभाग हा ब्रिटीश काळापासून चालत आलेल्या प्रश्नावर थोडा वेळ सिरीज जाते...
अंतिमतः पहिल्या सिरीज चा धागा पकडून पुन्हा एकदा जगातील सर्व सुखे आपल्याकडे का नाहीत व ती लवकर आपल्याला का भेटत नाहीत... या नादात धावत सुटणारी मानसिकता इथेही दिसते... अर्थात मार्ग मात्र क्रिमिनलचा.
-समाधान महाजन
(२८ ऑगस्ट २०२२)

No comments:
Post a Comment