या पुस्तकाची सहावी अद्यावत आवृत्ती  प्रकाशित होत आहे. अल्पवाधितच इतका विक्रमी प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचक व विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक आभार.  पहिली आवृत्ती  प्रकाशित झाली तेव्हापासून तर आजतागायत अनेक विद्यार्थी मित्रांशी मी कळत नकळत जोडलो गेलोय, असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मला कोणी हे पुस्तक वाचल्यानंतर संपर्क केला नसेल. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून मुलांचे फोन येत असतात, मेल येत असतात. या सर्व प्रतिक्रियांमुळे व अपेक्षांमुळे  दरवेळी पुस्तकाचा एकूणच कंटेंट व क्वालिटी सर्वोत्तम ठेवण्याची माझी जबाबदारी अधिकच वाढते.  पहिल्यांदा पुस्तक  आले तेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यापुढे ठेवून त्याची रचना करण्यात आली होती कारण त्या परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकच असे एकही  पुस्तक नव्हते , आजही नाही ( त्यामुळे आजही पुस्तकाचा मुख्य गाभा तोच आहे). सुरुवातीच्या एक दोन आवृत्या फक्त खूपच ओब्जेक्टीव नोट्स सारख्या काढल्या होत्या खर तर ज्यांचा बेस इतिहासाचा पक्का आहे व ज्यांना सर्व घटना व अभ्यासक्रम एकाच पुस्तकात हव्या आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानी होती.
पण जसजसे पुस्तकाच्या आवृत्या वाढायला लागल्या व संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तक पोचायला लागले तसे विविध ठीकांनाहून व विविध जणांकडून पुस्तकातील  नोट्स च्या स्वरूपातील मुद्दे सविस्तर करण्याविषयी व अधिकाधिक मजकूर add करण्याविषयी  विद्यार्थ्यांच्या मागण्या वाढू लागल्या तोपर्यंत राज्यसेवा व इतर परीक्षा यांच्यातील इतिहास या विषयावर आयोगाने जे प्रश्न विचारले होते त्यांच्यात फारसा फरक नव्हता.  म्हणून मग या पुस्तकाच्या तिसऱ्या  आवृत्तीपासून बरेच बदल करण्यात आले. अधिकाधिक परीक्षाभिमुख, अद्यावत व तरीही बोजड नसणारे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देणे हे मिळनाऱ्या कमी वेळात खूपच  कष्टदायक व कस लागणारे काम  असते पण दरवेळी विद्यार्थी मित्रांनी माझ्यावर टाकलेला विश्वास व प्रेमापोटी हे करता येणे मला शक्य झाले आहे.
हे काम सुरु असतांना मला काही जनांनी विचारले पण कि, इतिहास विषयात काहीच बदल होत नाहीत तर मग नवीन आवृत्ती काढायाची काही गरज नसेल.
खर तर या प्रश्नांचे खूप सविस्तर उत्तर आहे, थोडक्यात सांगायचे झाले तर आजचा दिवस उद्यासाठी इतिहास असेल. आजच्या प्रश्नाची पाळेमुळे इतिहासात रुजलेली असतात ती समजून घेतली कि, मग प्रश्नांचा वटवृक्ष  सहज समजून घेणे सोपे असते.
म्हणून मग आसाम प्रश्न असो, पंजाब प्रश्न असो, नक्षलवाद असो कि नेहरू परराष्ट्र धोरणाला नव्याने समजून घेणे असो. हे इतिहासात असले तरी त्याचे परिणाम आज आपण पाहत असतो. हे सर्व परत एकदा चर्चेला आले किंवा मिडियामध्ये येवू लागले कि त्यातील परीक्षेला गरजेपुरत्या व महत्वाच्या अशा दोन ओळी का असेना पण त्या आपल्या पुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे मला महत्वाचे वाटते. वृत्तपत्रातून सातत्याने त्यातील तज्ञ व्यक्तींकडून इतिहास व अनुषंगिक लिखाण येत असते  वा माझ्या वाचनाच्या सवयीमुळे बरीच संदर्भ मला सापडत असतात ती त्या त्या वेळी टिपून ठेवून जेव्हा पुस्तकाची नवीन आवृत्ती येते ती मी त्यात समाविष्ट करत असतो, यामुळे अनेक बाबी नव्याने माहिती झाल्याचे विद्यार्थी मला सांगत असतात. उदाहरण सांगायचे झाल्यास - या मे-जून २०१८ मध्ये जेव्हा हे पुस्तकाचे अद्यावतीकरन सुरु होते तेव्हा मला वृत्तपत्रात एक बातमी वाचायला मिळाली  'प्रख्यात वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाले' मला लागलीच आठवले कि फक्त जिव्या म्हसे यांच्या नावावर एक प्रश्न राज्यसेवेत विचारला गेलाय (तो पण महाराष्ट्राच्या इतिहासातील कला व सांस्कृतिक घटकावर) त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवत ती या नव्याने येणाऱ्या पुस्तकात समाविष्ट केली आहे. असे अनेक बारीक सारीक संदर्भांसह भरपूर माहिती समाविष्ट केलेले , महाराष्ट्राच्या इतिहासावर परीक्षभिमुख माहितीचे एक प्रकरणच  समाविष्ट केलेले, मुलांना सतत त्रास देणारे विविध वृतपत्र, आयोग, पुस्तके या विषयी नव्याने अजून माहिती समाविष्ट केलेले  व महत्वाचे म्हणजे एम.पी.एस.सी ने ऑगस्ट-२०१८ पर्यंत घेतलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षेत इतिहास या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण करून तसे बदल केलेले  "आधुनिक भारताचा इतिहास-महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात" या माझ्या पुस्तकाची नवीन सहावी आवृत्ती आपल्याला देण्यास मला विशेष आनंद होत आहे. आता सर्व परीक्षेतील इतिहासाच्या अभ्यासाला हे पुस्तक उपयुक्त आहे.  सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा सूचना व प्रतिक्रियांचे कायमच स्वागत आहे.
                                                                                                               - समाधान महाजन

1 comment:

  1. या पुस्तकाची नविन आवृत्ती कधी प्रकाशित होणार आहे?

    ReplyDelete