नदी

तुकड्या तुकड्यातील जगण्यासारखीच
अनेक तुकड्यात भेटत राहिली नदी.

डूम्बलो कोवळया वयात अनेकदा
गुडुप निळ्या अंधारात, ते डोह धूसर झाले.

मग पेलले नाहित केव्हा तिचे अवखळ जोरकस प्रवाह
मग गच्च डोळ्यातुन उतरत गेली.

नंतरच्या  प्रवासात वाहत जायची आजुबाजुने अनेकदा
पण जिथे माझ्याच अस्तित्वाचे प्रश्न अंगावर चालून यायचे
तिथे तिच्या कोणत्या प्रवाहांच्या नोंदी ठेवायच्या?

गाव बदलत गेलीत, तशीच नावही
पन वाहत राहिली माझ्यात कायमच.

खर तर नदी आहेच माझ्यात,
आरपार - माझ विश्व व्यापून
मला सतत वाहत ठेवून
नाहीतर अडखळउन थांबलो असतो केव्हाच.

             - समाधान महाजन
               


No comments:

Post a Comment