राकेश
वानखेडे यांच्या तीन कादंबऱ्या टप्याटप्प्याने वाचून पूर्ण झाल्या. गिनी पिग कोरोना
काळात वाचनात आली होती तर आधी प्रकाशित झालेली पुरोगामी व आताची एक दोन चार अ या दोन्ही
कादंबऱ्या अलीकडे वाचून पूर्ण झाल्या. गिनी पिग मधील नवोद्दत्तरी बदललेल्या एकूणच
पार्श्वभूमीवर मांडलेला कादंबरीचा पैस माझ्यासारख्या समकालीन असलेल्याला जास्त
जवळचा वाटतो. ते सर्व सूक्ष्म बदल वानखेडे यांनी ज्या नजाकतीने टिपले आहेत त्याला
तोड नाही. उगाचच मध्यमवर्गीय घरातील केबल व टीव्ही पुरत्या बदलाची हि नांदी नाही
तर पार आतून विस्कटून टाकणाऱ्या क्षणांच्या नोंदी आहेत.
पुरोगामी व १२४ अ या दोन्ही कादंबऱ्या वाचतांना सतत जाणवत राहते कि महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय सामजिक व विशेषतः चळवळीतील बदलांचा आढावा किंवा त्यांच्याबाबतचे चितन कारणमीमांसा हि पहिल्यांदाच इतक्या विस्तृतपणे वाचायला
मिळत आहे. पुरोगामी मधील सामाजिक चळवळी बद्दलचे व त्यातील व्यक्तिंबद्दलचे वर्णन व विश्लेषण वाचतांना सतत जाणवत होते कि महाराष्ट्रातील इतक्या व्यापक घडामोडींचा धागा आजच्या पिढीपासून सुटतोय कि काय?
दलित
चळवळ, बाबासाहेबांची, त्यानंतरची, त्यातील अनेक फाटाफूट, गट तट, समाजवादी, कम्युनिस्ट, कॉंग्रेस, प्रजा
समाजवादी, शेकाप, आणि एकूणच महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ त्यातील व्यक्ती व
त्यांचे अंतःस्तर हे सर्व किमान माहिती
होण्यासाठी या कादंबऱ्या वाचणे गरजेचे
आहे.
- समाधान महाजन


आपले मनःपूर्वक धन्यवाद. व्यस्त दिनक्रमात निरस होण्याची सर्वच शक्यता असतानाही कला, साहित्य, संस्कृती, भाषा ,लिपी, इतिहास यात गती ठेवणे आपले व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा अधिकाधिक विस्तार आणि वाढ होईल असे म्हणतात पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा धन्यवाद
ReplyDelete