1) ' सिर्फ एकही बंदा काफी हैं ...'
बघण्यासारखा आहे. यातील अनेक बाबी सुंदर आहेत. असारामचा खटला सर्वांना माहिती आहे व शेवट देखील. त्यातील कोर्टरूम ड्रामा आतील व बाहेरील अशा दोन्ही बाबींवर हा बेस्ड आहे.
यातील एक बाब उल्लेखनीय आहे...त्या मनोज वाजपेयी बनलेल्या ओरिजीनल पी.सी.सोलंकी या वकिलाचा पोस्को कायद्याचा अभ्यास सखोल आहे. ..तितका अभ्यास कुणाचाच नसतो...भारतातील दिग्गज वकील त्याच्या या अभ्यासाच्या कमांडमुळे हरतांना दिसतात. त्यात रामजेठमलानी,सुब्रह्मण्यम स्वामी, सलमान खुर्शीद आदि दिग्गज वकिलांचा समावेश होता. पण आरोपीला जामीन मिळवू दिला नाही. यातील मनोज वाजपेयीचे काम नेहमीप्रमाणे उत्तमच.
जे करायचे ते जीव लावून व इतकं पक्क करायचे की कोणतीच पळवाट त्यात राहिली नाही पाहिजे. मग अख्खं जग विरोधात असेल तरी बेहत्तर अभ्यासावरची पकड विजयश्री खेचून आणण्यात समर्थ असते. म्हणून तर सिर्फ एकही बंदा काफी असतो.
2)अजमेर 92
चित्रपट.
मुलींनी घरात बोलायला हवं.
मुलींनी घरात मनमोकळ बोलावं असं वातावरण व हेल्दी रिलेशन घरात असायला हवं.....
नसेल तर किमान जाणीवपूर्वक तयार करायला हवं....
घरात न बोलल्यामुळे व तितका विश्वास वाटत नसल्याने बाहेरील छोटीशी घटना नंतर आयुष्य उद्ध्वस्त करते...
हा चित्रपट जळगाव स्कँडलची आठवण करून देणारा आहे. अजमेर ची घटना 1992 ला उघडकीस आली तर जळगाव भुसावळ ची घटना 1994 च्या आसपास उघडकीस आली होती. या दोन्ही घटनेत जितक्या केसेस रेकॉर्ड वर आल्या त्यापेक्षा जास्त रेकॉर्ड झाल्याच नाहीत...अनेक घर व आयुष्य उध्वस्त झालीत..
हेल्दी संवाद आयुष्य वाचवू शकतो.....
- समाधान महाजन

No comments:
Post a Comment