आजकाल मुलामुलींना सगळ लगेच instant पाहिजे. पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी .....(मी शाळा कॉलेजात होतो तेव्हा..’ आमच्या लहानपणी’.. असे वाक्य वाचले कि तो लेख किंवा कथा जे काही असेल ते कधीच वाचायचो नाही, आयला जो उठतो तो आम्हाला डोसच देतो, उठता लाथ व बसता बुक्की असं काहीसा प्रकार वाटायचा. आमच्या लहानपणी असे लिहिणारा एखादी म्हातारा असेल व त्याचे outdated विचार आपण कशाला वाचायचा वा ऐकायचा असा पोक्तपणा त्या अननुभवी वयात ठासून भरलेला होता.😉 तर असो, पण आता अनुभवांती व वयांती या निष्कर्षाला मी आलोय कि या वाक्याशिवाय जे काही सांगायचे त्याला पूर्तता येत नाही. तर आता पर्यंत जे टिकून आहेत त्यांनी पुढे वाचण्यास हरकत नाही😂)
आजकाल मुलामुलींना सगळ लगेच पाहिजे. पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी साधारण मध्यमवर्गीय घरातून काही बाबी समान असायच्या जशा कि, आई वडिलांचे मुख्य ध्येय असायचे मुलांचे शिक्षण, नोकरी लग्न, स्वतःची नोकरी किंवा उद्योग सांभाळून जे करता येईल ते. आणि आयुष्याच्या शेवटी शेवटी निवृत्तीच्या काळात किमान स्वतःच घर असावं. इतपत ते मर्यादित होते.
तेव्हा लहान असणारी ती पिढी आता आई बाप बनली पण त्यांच्या मुलांचा हा जो काळ सुरु आहे. तो त्यांच्या इतकाच वेगवान आहे. आयुष्यभर वैगेरे शब्द पण नको वाटतात त्यांना ऐकायला. लग्नापूर्वी स्वतःचा अलिशान flat. कार, भरभक्कम पगार अस सगळ पाहिजे. मुलीकडच्यांना मुलाकडे हे सर्व पाहिजेच पण मुलाचे आई बाप भाऊ बहिणी घरात चालणार नाही. त्यांनी दुसरीकडे राहणे आवश्यक आहे. पसंती अशा स्थळांना जास्त असते. हे एक दुर्दैवी सत्य आहे.
आता पती पत्नीच्या नात्यात पण सहनशीलता संपत चाललीय. लग्नानंतर काही महिन्यातच घटस्फोटाचे प्रमाण कधी नव्हे इतके वाढले आहे. प्रत्येकाला स्वतःची स्पेस पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य आनंदात व आपल्या मर्जीने जगायचे आहे पण दुसऱ्याने ते आपल्यासाठी adjust केले पाहिजे. मी adjust करणार नाही. अशी मनोवृत्ती आहे.
चंगळवादी व ऐषोआरामी जगण्याची क्रेझ वाढत आहे. branded वस्तू लागतात. विकेंड outing, पार्टी, शॉपिंग, कार, फ्रेंड्स, ....आणि चिक्कार आनंद पाहिजे. या सर्व बाबींसाठी पैसा लागतो. तो कुठून येईल किंवा कसा याचा विचार आजच्या पिढीला नाही. फक्त पैसा पाहिजे. तुम्ही कुठूनही आणा असे बापाला सांगणारी पोर आजूबाजूला आहेत.
काही गोष्टी हळूहळू होतात व त्यांच्या प्रवासातच आनंद असतो. लहानपणी रामायण पाहत असतांना टीव्ही चांगला दिसावा म्हणून antenna ची सेटिंग करायला तीन चार जण लागायचे व अर्ध्या एक तासाच्या अथक परिश्रमानंतर चित्र दिसायला लागले कि स्वर्गीय सुख मिळायचे.
मानवी इतिहासातील सगळ्यात वेगवान प्रगतीच्या टप्प्यात आपण आहोत. शोध लागला कि त्याचे परिणाम तत्काळ लोकांना पोहचवले जातात. गेस्टेशन कालावधी संपत आलाय. technology हातात आहे. पुरावे मागितले व दिले जातात. नात्यातील ओलावा संपून गेलाय कि काय असे चित्र आहे.
प्रश्न पडत नाहीत. प्रश्न विचारले जात नाहीत.
मुळात प्रश्न विचारलेले
आवडत नाही. स्वतःला प्रश्न पडले कि स्वतःच्या मानसिक प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते,
कारण भोवताल उत्तरे मागत नाही. अशा केओस वातावरणातून जात असलेल्या आजच्या पिढीला जीवन
सुसह्य होण्यासाठी किमान थोड्या तरी वैचारिक बेसची गरज आहे.
otherwise थोड्या
काळासाठी मोबाईल व माणसे आजूबाजूला नसतील तर मानसिक शांततेचे सुख घेण्याऐवजी अस्वस्थ
होणाऱ्या माणसांची संख्या वाढत आहे.
-
समाधान
महाजन
२३ जून २०२३

.jpeg)
