राजेश पाटील (IAS) यांचे 'मोर ओडिशा डायरी' हे पुस्तक अलीकडेच डिसेंबर २०२१ मध्ये समकालीन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. राजेश सरांना आम्ही मोठ्या भावासारखे दादा म्हणतो. दादांनी खानदेशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा प्रवास त्यांचे आधीचे पुस्तक "ताई मी कलेक्टर व्हयणु" यात आलेला आहे. अभ्यास करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात कायमच प्रेरणा देत आलेले आहे.
परीक्षांची तयारी करत असताना सर्वांच्या स्वप्नात कलेक्टरची पोस्ट असते. लाल दिवा, बंगला, नोकर चाकर असा लवाजमा त्यांच्या स्वप्नांना खुणावत असतो. पण प्रत्येक्षात काम करत असतांना कदाचित असे लक्षात येत जाते कि सरकारने या सर्व सुविधा लोकांचे कामे करण्यास सोपे जावे यासाठी बनवलेल्या असतात. मोर ओडिशा डायरी या पुस्तकात मांडलेले राजेश दादांचे अनुभव हे फिल्डवरचे आहेत म्हणून अस्सल आहेत. हिरोगिरी नाही की प्रसिद्धीचा सोस नाही अगदी आपल्या स्वभावानुसार राजेश दादांनी प्रशासन सांभाळले व ते जसे सांभाळले तसे लिहिले. पुस्तक वाचतांना सहज जाणवत राहते कि अनेकदा प्रामाणिकपणे ते स्वतः च्याच मर्यादा, चुका कबूल करतात तेव्हा अजूनही त्यांच्यातील जमिनीवर पाय असणाऱ्या माणसांचा अभिमान वाटतो.
संपूर्ण पुस्तकात कुठेही चमकोगिरी दिसत नाही. जिल्हाधिकारी पदावर जेव्हा
बाहेरच्या एखाद्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात काम करावे लागते तेव्हा तो जिल्हाधिकारी असलेला व्यक्ती अनेकदा सर्वार्थाने एकटा असतो. याउलट काही निगेटिव्ह शक्ती असणारे स्थानिक लोक हे ऑरगॅनिक घटक असतात. ते त्याच मातीतील असतात व त्यांचे हितसंबंध देखील त्याच मातीशी असतात त्यामुळे त्यांचा समूह किंवा गट किंवा समाज एकत्र येण्याची प्रक्रिया naturally fast असते.अशा वेळी आपल्याला वाटते की कलेक्टर असल्यावर कायद्याने काम केले की संपले. दर वेळी असे तंतोतंत करता येतेच असे नाही. अशा वेळी अनेक असहाय वाटणारे एकटे वाटणारे प्रसंग येत असतात. तेव्हा पुन्हा एकदा स्वतःला सावरत लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे हे बाहेरून बघण्याइतके सोपे नाही. तसे प्रसंग या पुस्तकात आहेत मग ते नक्षलवादी भागातील अनुभव असो कि बाहुबली नेत्यांच्या मतदारसंघातील अनुभव असो.
बाहेरच्या एखाद्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात काम करावे लागते तेव्हा तो जिल्हाधिकारी असलेला व्यक्ती अनेकदा सर्वार्थाने एकटा असतो. याउलट काही निगेटिव्ह शक्ती असणारे स्थानिक लोक हे ऑरगॅनिक घटक असतात. ते त्याच मातीतील असतात व त्यांचे हितसंबंध देखील त्याच मातीशी असतात त्यामुळे त्यांचा समूह किंवा गट किंवा समाज एकत्र येण्याची प्रक्रिया naturally fast असते.अशा वेळी आपल्याला वाटते की कलेक्टर असल्यावर कायद्याने काम केले की संपले. दर वेळी असे तंतोतंत करता येतेच असे नाही. अशा वेळी अनेक असहाय वाटणारे एकटे वाटणारे प्रसंग येत असतात. तेव्हा पुन्हा एकदा स्वतःला सावरत लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे हे बाहेरून बघण्याइतके सोपे नाही. तसे प्रसंग या पुस्तकात आहेत मग ते नक्षलवादी भागातील अनुभव असो कि बाहुबली नेत्यांच्या मतदारसंघातील अनुभव असो. प्रशासन व राजकारण यावर अगदी प्रॅक्टिकल भाष्य आहे. अनुभवाचे बोल आहेत. उगाचच मी आमदार खासदारांना कसा धडा शिकवला अशी फिल्मी भाषा यात येत नाही. भारतीय प्रशासनात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील सबंध चांगले असतील तर विकासकामे कसे होतात हे सोदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे. आणि विशेषतः आपली मूल्य न सोडता.
जाणत्या अधिकाऱ्याला स्वतः मध्ये एक शिस्त असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो प्रशासनाला शिस्त लावू शकत नाही. हे अनुभवाचे बोल सरांनी यात मांडले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतांना ५० टक्के हून अधिक आदिवासी भाग कार्यक्षेत्र म्हणून त्यांच्यापुढे पसरलेला असतांना त्यांनी शेती, फळबागा, सिंचन, शिक्षण आरोग्य, अवैध्य वाहतूक, मादक पदार्थांची विक्री, भूजल प्रश्न, चारा, जनावरे, बॉक्साईटच्या खाणी, आदिवासी-जंगल-जमीन एकीकडे तर बहुराष्ट्रीय कंपन्या दुसरीकडे अशा प्रचंड वैविध्यपूर्ण प्रश्नावर मुळापासून काम केले. प्रश्न समजून घेण्यासाठी ते त्या स्थानिक भागात फिरले. स्थानिक बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद साधला. प्रश्नांच्या दोन्ही बाजू अत्यंत सहजपणे ते मांडतात.
नक्षलवाद असो कि आदिवासींचे जमीन जंगलाचे अधिकाराबाबताचा प्रश्न असो त्यांचा त्यावरचा अभ्यास लगेच जाणवतो. ते मांडतांना देखील अगदी हळुवारपणे ते त्या प्रश्नात घुसून सर्व बाजू आपल्या पुढे मांडतात. त्यामुळे एकांगी पणा नसतो. उगाचच आरोप- प्रत्यारोप नाही. आक्रस्ताळेपणा नाही. शोमेनशिप नाही. स्वतःचा उदो उदो नाही त्यामुळे एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रत्यक्ष फिल्डवरचे अस्सल अनुभव आपल्याला वाचायला मिळतात.
नव्याने प्रशासनात येणाऱ्या, आधीच सेवेत असणाऱ्या व ज्यांना आतून प्रशासन काय आहे हे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या व प्रशासनावर उठसुठ टीका करणाऱ्या अशा साऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.
- समाधान महाजन


अतिशय सुयोग्य शब्दांचे मांडणी करून आपण एका कर्तुत्ववान अधिकाऱ्याचे व लेखकाचे चित्रण रेखाटले आहे
ReplyDelete