अंबरनाथ येथील शिवमंदिर ,सिन्नर येथील गोंदेश्र्वर मंदिर,तसेच त्र्यंबकेश्र्वर व औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लंगांची मंदिरे हे याच शैलीतले आहेत. मंदिरावरील शिल्प अत्यंत कोरीव आहेत मंदिराची डावी बाजू काही प्रमाणात ढासळलेली असली तरीही उजवी बाजू अजूनही जशीच्या तशी आहे .भगवान विष्णूच्या १० अवतरांची शिल्प इथे पाहावयास मिळतात .येथील शिवलिंग कोकणातील "मारलेश्वर शिवलिंगाशी साधर्म्य साधणारे आहे. मंदिर पाश्चिमाभिमुख आहे . त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभर्यात प्रवेश करतात . मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की, ज्याला ३ "कीर्तीमुख " आहेत . याच्याशी सलग्न कुठल्याही हेमाडपंथी अथवा इतर शैलीतल्या मंदिरांना १ च कीर्तीमुख आहे. सध्या यातील दोन किर्तिमुख तसेच आहेत तर तिसरे ढासळले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हेमाडपंत शैलीत या मंदिराची रचना आहे. अत्यंत सुबक व सुंदर कलाकृती येथील मंदिराच्या दगडांवर कोरलेल्या आहेत. याच मंदिराच्या समोर अजुन अशाच एका मंदिराची निर्मिती होत होती. पण काही कारणाने ते पूर्ण झाले नाही. त्यामागील परंपरागत कथा मला कमलाकर आबा देसले यांनी सांगितली.झोडगे येथील प्रसिद्ध कवी, गझल कार, लेखक श्री कमलाकर आबा देसले हे आज माझ्यासोबत मंदिर दाखविण्यासाठी आले होते. झोडगे येथे आलो म्हणजे आबांची भेट मी आवर्जून घेतो. खरं तर आबांच्या अनेक लेखात या मंदिरा बद्दल उल्लेख असायचा. काही वर्षांपासून आबांच्या दोन्ही मुलांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने या मंदिरात दिवाळीच्या काळात दीपोत्सव साजरा करण्याची एक अत्यंत चांगली प्रथा पाडली आहे. दिवाळीत एक दिवस ही सर्व तरुण मित्र मंडळी एकत्र येते संध्याकाळी मंदिराच्या एका विशिष्ट उंचीपर्यंत दिवे / पणत्या लावल्या जातात. जसं जसा अंधार पडतो तसे या दिव्यांच्या उजेडात हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते. आबा सांगत होते की अलीकडे प्रसार माध्यमांनी देखील या उपक्रमाची दखल घेऊन या दिपोत्सव ला प्रसिद्धी दिल्यामुळे अनेक पावले या ठिकाणी वळत आहेत.
शिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते, तेव्हा भाविकांची गर्दी मंदिर दर्शनासाठी आवर्जून येते.
आबांसारख्या व्यक्ती व दक्ष झोडगेकर ग्रामस्थांना मूळे हा महाराष्ट्राचा बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा टिकून आहे. पुरातत्व खात्याने करण्यासारख्या अनेक गोष्टी अजुन आहेत. त्या झाल्या तर या सर्व प्रयत्नांना नक्कीच पूर्णत्व होईल.
- समाधान महाजन
(कीर्तीमुख म्हणजे हिंदू धर्मात घरच्या प्रवेश द्वाराला लावले जाणारे मुखवटे. ज्याचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण
महत्व आहे. तसेच अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.)



खूप छान सर
ReplyDelete