घटत्त्कोच लेणी व जंजाळा किल्ला


जंजाळा किल्ल्याचा बुरूज
जरंडी मार्गे गेल्यास जंजाळा  किल्ल्याचा दिसणारा बुरूज 
या वेळी आम्ही ट्रेक व भ्रमंती साठी निवडलेला मार्ग होता जंजाळा किल्ला व घटत्कोच लेण्या....जळगाव पाचोरा व जरंडी मार्गे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी लागलो. जरंडी हे सोयगाव तालुक्यात येते. जळगाव-सिल्लोड-गोळेगाव मार्गे देखील या किल्ल्यावर जाता येते. सिल्लोड तालुक्यातील अंभई गावापासून हे १० किलोमीटरवर येते. अंभई गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या किल्ल्याला वैशागड किंवा तालतम असेही म्हणतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जंजाळा गावाच्या दिशेने हा भूदुर्ग आहे तर इतर तीन बाजूने हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. हा ट्रेक तसा छानआहे. उजव्या बाजूच्या छोट्या डोंगरावरून चालत वर चढून गेले की किल्ल्याचा जो 
डोंगर आहे त्याला जोडणारा एक उंचवटा 

लागतो. त्या उंच भागावर उभे राहिल्यास जंजाळा किल्ल्याचा विस्तार जाणवतो.  आपण जिथे उभे  राहतो त्याच्या समोरच किल्ल्याच्या   तटबंदीच्या  काही खुणा दिसतात. पण किल्ल्याचा डोंगर व आपल्यामध्य एक भलीमोठी दरी सते. त्या दरीच्या वरच्या बाजूला आपल्या उजव्या हाताला आपले डोळे पोहचतील इतक्या लांब किल्ल्याच्या डोंगराचा विस्तार आहे. हळूहळू आम्ही डाव्या बाजूने वर चढायला सुरुवात केली. हा शेवटचा चढ तसा आतापर्यंत चालून आलेल्या भागपेक्षा थोडा कठीण होता. कारण छोटी सरळ वर जाणारी पायवाट खाली दरी व पायाखाली सरकणारे छोटे खडे ... मध्ये एका ठिकाणी झाडी दिसली. सावलीतील मोठ मोठ्या दगडांवर बसून सोबत आणलेल्या sanck वर ताव मारला व पानी पिऊन परत चढाईस आरंभ केला. 

हे नोव्हेंबर महिन्याचे दिवस होते. दिवाळी नंतर लागलीच आलेला हा रविवार होता. साग व इतर झाडांमध्ये अजून पूर्ण पानगळ झालेली नव्हती. काही ठिकाणी अजूनही गवत हिरवेगार होते तर काही ठिकाणी ते पिवळे पडले होते. पण अजून पूर्ण सुकलेल नव्हते. संपूर्ण डोंगर व परिसर हिरव्या पिवळ्या रंगाच्या छटांमध्ये रंगून गेला होता. ऊनही फारसे नव्हते व थंडी देखील नव्हती. अशा टोपोग्राफी मध्ये फिरण्याची व  ट्रेक करण्याची वेळ आल्यास पाण्याचा साठा सोबत असलेले केव्हाही चांगले. 

आता ती छोटी पायवाट ज्या ठिकाणी पोहचली ते किल्ल्याचे एक द्वार होते. नक्कीच ते प्रवेशद्वार नसावे. हा दरवाजा इकडील गावाकडे जाण्यासाठी असलेला असावा. त्यावरही बरेच वेली व झाडे झुडपे उगवलेले होते. तो ज्या ठिकाणी किल्ल्यावर उघडतो तो प्रवेश देखील छोटा आहे. तेथून डाव्या हाताला थोड्या अंतरावर बरेच पडझड झालेल्या भिंती व बुरूज दिसत होते. त्यांच्या आजूबाजूला देखील बरीच झाडे झुडपे उगवली होती. हा भाग कदाचित समोरून सोयगाव गावावरुन जो जंजाळा किल्ल्याचा भाग दिसतो तो असावा. 

जंजाळा किल्ल्याचा इतिहास -  अजंठा  डोंगर रांगातील हा आमचा सहावा ट्रेक होता. (अजंठा लेण्यांजवळील डोंगर, अंतुर किल्ला, वेताळगड, पाटनादेवी  मार्गे पितळखोरा लेणी, फत्तेपूर जवळील गोद्रीच्या धबधब्याचा डोंगर ) पैकी त्यात दोन किल्ले होते. एकूण माहिती घेतली असता असे लक्षात येते की हे सर्व किल्ले टेहळणी किल्ले असावेत. उत्तरेकडून येणार्‍या शत्रूवर लक्ष ठेवणे व आपल्या सैन्याला शिदोरी पुरवणे व इतर व्यवस्था करणे अशा पद्धतींची कामांसाठी यांचा वापर होत असावा. त्यामुळे  विविध राजवटीतील अनेक राजे व  सरदारांनी यांचा उपयोग करून घेतला असावा. 


हा किल्‍ला कधी आणि कुणी बांधला, या बाबत वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे संशोधन आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्‍या घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. तसेच ही लेणी राजे वाकटाकचा मंत्री वराहदेव याने इसवी सन पाचव्‍या शतकात खोदल्‍या माहिती आहे. त्‍यामुळे त्‍याच दरम्‍यान हा किल्‍ला बांधला असावा, असा काही इतिहासकारांचा अंदाज आहे. सोळाव्या शतकात ह्या किल्ल्याचा ताबा अहमदनगरच्या निजामाकडे होता तर सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहजहानाने मराठवाड्यातील इतर अनेक किल्ल्यांबरोबरच इथेही कब्जा मिळवला असे म्हटले जाते. नंतर या किल्ल्यावर व प्रदेशावर स्वातंत्र मिळेपर्यन्त हैदराबादच्या निजामाचा अंमल होता. 

मागच्या  वेळी आम्ही ज्या वेताळगडावर गेलो होतो तेथून या जंजाळा किल्ल्याचे दर्शन झाले होते. दुरून देखील हा किल्ला विस्तीर्ण पसरलेला दिसत होता. काही ठिकाणी अजूनही शिल्लक असलेली तटबंदी व काही जुनाट पडलेले  बांधकाम बघता या किल्ल्याची कोणतीही देखभाल व दुरूस्ती झालेली दिसत नाही. किल्ल्यावर एका ठिकानी बरेच मोठे तळे आहे. काही जन त्यात मासे पकडत असतांना दिसले.  तळ्याच्या एका बाजूची भिंत देखील गडा इतकीच जुनी होती... या सारखे अजून दोन तळे किल्ल्यावर आहेत. किल्ल्याची एकंदरीत दुरावस्था आणि  माहितीफलकांचा अभाव पाहता पुरातत्त्व खात्याचे अजूनतरी किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.

घटत्कोच लेणी कडे - हळूहळू आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या तटबंदीकडे पोहचलो. इथे देखील बरोबर तटबंदी कदाचित फोडून वर येण्यासाठी रस्ता बनवलेला दिसत होता. कारण किल्ल्याच्या या शेवटच्या भागापासून जंजाळा गाव जवळच आहे. जवळ म्हणण्यापेक्षा किल्ल्याचा तटबंदीच्या बाजूलाच जणू किल्ल्याचाच एक भाग असल्यासारखे आहे. त्या रस्त्यावरून आम्ही थोडे  पुढे गेलो तर थेट गावातील . नुकतेच काढलेल्या पिकांच्या धसांमधून जाणार्‍या   छोट्या पाऊल वाटेने आम्ही  एक पाठोपाठ चालत होतो. आमच्या  सोबत जरंडी गावातील एक स्थानिक होते. त्यांनी  सांगितल्या   नुसार   

जंजाळा गाव मुस्लिम बहुल आहे आहे व हे मेवाती समाजाचे लोक आहेत. गावातील मोठी मजीद दुरूनच लक्ष वेधून घेत होती. आसपासच्या शेतातून चालत आम्ही आत्ता एका ओढ्याच्या काठी उभे होते.. त्याला वळसा घालून पुढे गेल्यास शेताच्या किनार्‍यावरून दुरूनच लेण्यांच्या प्रवेशद्वाराचे दर्शन होते. 

घटत्कोच लेणी -   जंजाळा किल्ल्याच्या अगदी उलट अनुभव या लेणी जवळ येतो. कारण पुरातत्व खात्याने लेंनींपर्यंत जाण्यासाठी अगदी सुंदर दगडी पायर्‍या केल्या आहेत. किंबहुना या पायर्‍यांवर उभे राहून मागील जंजाळा किल्ला आपल्या फोटोत घेण्याचा मोह आवरत नाही. लेणी जवळ असतांना मध्येच एक  पाण्याचा प्रवाह आपली वाट आडवतो. आम्ही गेलो तेव्हा त्याला फारच कामी पानी होते पण कदाचित पावसाळ्यात काळजी घेऊनच गेलेले बरे. कारण याच पाण्याच्या प्रवाहाचा खाली दगडांमध्ये धबधबा बनतो. पलीकडून आझून एक ओढा वेगाने येऊन त्याच्याही पाण्याचा  धबधबा पावसाळ्यात नक्कीच सुंदर दिसत असेल. अजंठा लेणीची आठवण या ठिकाणी नक्की येते. 

ही घटत्कोच लेणी अजंठा लेणीपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी लहान असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायान पंथीय लेण्यातील ही पहिली व अत्यंत महत्वाची लेणी आहे. पूर्वी येथे असणार्‍या घटत्कोच गावमुळे या लेण्यांना तेच नाव पडले आहे. या लेंनींमध्ये एक विहार आहे. हे विहार चौकोनी असून याला तीन आयताकृती प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वाराच्या समोरच्या भागात सहा अष्टकोणी स्तंभ असून त्यासमोर मोकळा व्हरांडा आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी शेवटी दोन खोल्या कोरलेल्या असून त्यांना आयताकृती प्रवेशद्वार आहेत. डाव्या बाजूस वाकाटक नरेश हरिशेण याचा प्रधान वराहदेव याचा 22 ओळींचा ब्राम्ही लिपीत कोरलेला शिलालेख आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या दोन्ही बाजूस दोन स्रि प्रतिमा कोरलेल्या आहेत. 

या चौकोनी विहारात 20 अष्टकोणी स्तंभ आहेत. पैकी उजव्या बाजूच्या एका स्तंभशीर्षावर मन्नत स्तूप कोरलेला आहे. विहाराच्या अगदी पाठीमागील बाजूस तीन गर्भगृहे आहेत. यातील मधल्या गर्भगृहात बुदधांची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील भव्य मूर्ति आहे. दोन्ही बाजूस उपगर्भगृहे आकाराने लहान असून यामध्ये कोणत्याही मुर्त्या नाहीत. डाव्या बाजूस उपगाभार्‍याला जोडून एक लहान आयताकृती खोली असून याचा उपयोग उपगर्भगृहाशी निगडीत असावा. 

विहाराच्या उजव्या व डाव्या बाजूस ओळीने आयताकृती लहान खोल्या कोरल्या आहेत. डाव्या बाजूस सात लहान खोल्या असून मधली खोली ही दोन भागात विभागली आही ती सर्वात मोठी आहे. उजव्या बाजूस पाच छोट्या खोल्या आहेत. दोन्ही बाजूंच्या मधल्या खोल्यांच्या प्रवेशद्वारांजवळ स्तंभ कोरलेले आहेत. 

आत मध्ये बर्‍यापैकी अंधार आहे. आम्ही पोहचलो तेव्हा मावळतीच्या सूर्याची तिरपी किरणे लेण्यांवर पडल्यामुळे आत थोडाफार उजेड होता पण तरी तो पुरेसा नव्हता. आत कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने सोबत असलेल्या मोबाइलच्या टॉर्च मध्ये बघावे लागत होते. 

या लेणीच्या अगदी विरुद्ध बाजूला व समोरच असलेल्या डोंगरात अजून एका ठिकाणी लेणी कोरलेल्या दिसतात पण तिथे जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळा संपल्यानतर कदाचित खालील दरीत उतरून मग पुन्हा समोरच्या डोंगरावर चदून तिथे जाता येत असावे. पुरातत्व खात्याने त्याही लेण्यांकडे लक्ष पुरविणे आवश्यक वाटते. कदाचित जर एखादा दुर्मिळ शिलालेख सापडला तर प्राचीन भारतातल्या संस्कृतीवर व कलेवर उपयुक्त माहिती मिळू शकते. ते असेच पडू दिले तर कदाचित हा अमूल्य ठेवा नष्ट होऊ शकतो. 

परतीचा रस्ता- सूर्य मावळतीला आलेला होता. डोंगरावरील बाजरी व मकक्याच्या रिकाम्या झालेल्या शेतातून आम्ही मार्ग काढत चालत होतो. जरंडी गावाच्या एका टोकावरुन आम्ही किल्ला चढलो होतो पण आता उतरतांना आम्ही दुसर्‍या टोकाने उतरण्याचा निर्णय घेतला. हा उतार उतरत असतांना पितळखोरा ट्रेक ची आठवण येत होती. तिथे तरी पायर्‍या दिसत होत्या इथे उंच व पिवळसर गवतामधून मार्ग काढत असतांना निसरड्या वाटेची भीती होती.  

उंचावरून अत्यंत विलोभनीय दृश्य दिसत होते. या अजंठा डोंगर रांगातील कोणत्याही उंच ठिकाणावरून पाहिले असता एक बाब लक्षात येते की अनेक पाण्याची तळे, धरणे खाली दिसतात. त्यांच्या बाजूची हिरवीगार शेती. मावळतीचा तांबूस रंग आकाशाच्या निळ्या रंगात मिसळून अनेक रंगाची उधळण झालेली दिसत होती. खाली उतरेपर्यंत चक्क अंधार पडला होता. आजचा दिवस अगदीच दुर्मिळ आनंद देऊन जाणारा होता. 

-  समाधान महाजन 

भुजंगराव बोबडे सर- एक चालता बोलता इतिहास

 आज श्री.भुजंगराव बोबडे या इतिहासाने झपाटलेल्या एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. जे फक्त इतिहास लिहीत नाहीत तर इतिहास जगतात. इतिहास त्यांचा श्वास आहे. ते ज्या वेळी ऐन-ए अकबरीच्या पेज नंबर अमुक अमुक च्या तमक्या पॅरेग्राफ वर काय आहे हे सांगत असतांनाच्या दुसर्‍या मिनिटाला गांधी किंवा हडप्पन साईटस वर अचूक बोलू शकतात. आपले गाव विचारून झाले की लगेचच त्याच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या आर्किओलोजिकल साईटची किंवा एखाद्या ऐतिहासिक पण दुर्लक्षित स्थळाची माहिती ते लागलीच आपल्याला देतात  तेव्हा आवाक होण्याची पाळी आपली असते. 

फोनवरच्या पाहिल्याच बोलण्याच्या वेळी माझा जिल्हा व तालुका धुळे आहे असे ऐकताच,  "तुम्ही भारतातील  एकाच जिल्ह्यात सर्वाधिक आर्किओलोजिकल साइट्स असलेल्या जिल्ह्यातील आहात असे सांगून मला जो पराकोटीचा मोठा धक्का दिलाय त्यातून मी अजूनही सावरलो नाहीय..... " 
भुजंगराव माझ्यापेक्षा वयाने एक-दोन वर्ष लहान असले तरी त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी पाहता त्यांना इतिहासातील माझे गुरु म्हणून घेण्यास मी विनाअट तयार आहे. (याठिकाणी एका पायावर असेही लिहिता आले असते पण दोन्ही पाय घेऊन सरांसोबत आता भरपूर भटकंती करायची असल्याने त्यांना त्रास देत नाही.☺)

भुजंगराव  सध्या डेक्कन आर्किओलॉजीकल अँड कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट,हैदराबाद येथे संचालक आहेत. पण याआधी जळगावच्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. शिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांनी आधी काम पाहीले आहे.देशातील अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांच्या वेगवेगळ्या समितीत त्यांच्या समावेश आहे.अनेक नवी संग्रहालये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतायेत. इतिहास विषयात त्यांनी केलेले संशोधन बहुश्रुत आहे.

इतिहास मुळातून समजून घेण्यासाठी सरांनी सात लिप्या शिकून घेतल्या जसे की,   देवनागरी, मोडी, ब्रम्ही, नंदीनागरी, ग्रंथा इत्यादि. त्यांच्याकडे आज 40 हजार संशोधन ग्रंथ, 15 हजार हस्तलिखित ग्रंथ, 4 हजाराहून अधिक पुरातात्वीक वस्तू, मौर्य काळापासूनची साडेचार हजार नाणी, 15व्या -16 व्या शतकातील पेंटिंग्ज, ताजमहलबद्दलचे जगातील एकमेव हस्तलिखित 'तारीख-ए-ताज', 1577 मध्ये अबूल फझलने लिहिलेला 'अकबरनामा', छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल माहिती देणारे जगातील पहिले हस्तलिखित, ज्याच्या जगात चारच प्रती आहेत अशा सुवर्ण अक्षरात लिहीलेल्या कुरानाची प्रत,  असा मोठा खजिना त्यांच्याकडे आहे. आजच्या कॉपी पेस्ट पीएचडीची तुलना केली असता सर अनेकार्थी डॉक्टरेट आहेत. 

एक ट्रक क्लिनर ते आज देशातील महत्वाचे इतिहास संशोधक हा त्यांचा संघर्षमय व जिद्दी प्रवास अनेकांना प्रेरणा देऊन जातो. सर मूळचे मराठवाड्यातील उदगीरचे असले तरी देखील आता त्यांची कर्मभूमी जळगाव व खांदेश अशी आपण म्हणू शकतो. पण सरांचा प्रवास भारतभर काय विदेशात देखील  सुरू असतो. 

किंचितही अभ्यास न करता जगभर इतिहासाला मतभेद व विद्वेषाचे एक विद्रूप रूप देणारी विषवल्ली सारीकडे वाढत असण्याच्या काळात भुजंगराव सारख्या सच्च्या इतिहासप्रेमी माणसांची गरज आधिकच जाणवते.  हे सांस्कृतिक संचित जोपासले पाहिजे. वाढले पाहिजे.

- समाधान महाजन 

हॉलीवूड

body of lies सारखे मूवी पाहिल्यानंतर लक्षात येते की आपल्याकडे असलेली लोकशाही किती प्रगल्भ आहे. जॉर्डन इराक इराण सीरिया मिडल इस्टच्या पार्ट मध्ये लोकांना जगावं लागत असलेला जीवन हे आपल्याकडच्या नॉर्मल रुटीने लाइफ पेक्षा किती प्रकारे भिन्न असू शकते हे असे चित्रपट पाहून कळते...

चित्रपटाचा दर्जा व त्याच्यासाठी केलेला अभ्यास हा ज्या ताकदीचा आहे तो विषय हा एक वेगळा विषय आहे व त्यात दाखवलेला समाज देश व  त्यांचे परस्पर संबंध हा एक वेगळा विषय आहे. 
तिकडच्या लोकांचे जीवन त्यांना मिळत असलेल्या सुविधा किती भेदभाव पूर्ण व विचित्र असू शकतात.....तिथे मुळ गवर्नमेंट किती कमजोर असते व त्याला समांतर असणारे government किती स्ट्रॉंग असते हे कळते.आणि आपल्याकडे अगदी लहान लहान निर्णय देखील गव्हर्मेंट ने  घ्यावा यासाठी लोकांचा किती अट्टाहास असतो आणि सरकार देखील ते पूर्ण करण्याचा किती हिरीरीने  प्रयत्न करते हे खरंतर प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. पण येथील लोकांना मुळातच त्याची जाणीव नसल्यामुळे आपण किती सुखी समाजात जीवन जगत आहोत याचं महत्त्व /इम्पॉर्टन्स येथील लोकांना नाही. असच आज वाटत आहे. 
त्यानंतर आज रात्री Shawshank redemption हा चित्रपट पाहत होतो. हा जागतिक रेटिंग मध्ये टॉप

चा चित्रपट आहे. आपल्या बायकोचे कोनातरी सोबत अफेयर आहे हे सजल्यावर तिला व तिच्या प्रियकराला मारल्यामुळे शिक्षा झालेला एक कैदी तुरुंगात येतो व तेथून सुरू होतो या चित्रपटाचा प्रवास....एक से एक संवाद व to the ground दृश्य असल्यामुळे चित्रपट अप्रतिम वाटतो. यातील विचार ज्या पद्धतीने दिग्दर्शकाने प्रेक्षकापर्यन्त पोहचवले आहेत ना ते बघत असतांना एखादी कविता कोणीतरी सादर करत आहे इतकी पकड हा चित्रपट घेतो. 
- समाधान महाजन 

इंदिरा गांधी

 


इंदिरा गांधी यांच्या मैत्रीण व निकट वर्ती पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींविषयी लिहिलेले याच नावाचे पुस्तक प्रसिध्द आहे. गेल्या काही दिवसांपासून वेळ मिळेल तसे हे पुस्तक वाचत होतो. आज ते पूर्ण झाले आणि  आज नेमका इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन आहे. 

हे पुस्तक वाचतांना जे जे मला वाटलं ते मी टिपून ठेवले आहे. - 


 • पंडित नेहरू यांचे पूर्वज काश्मीर खोर्‍यातील  बीज बीहारा गावचे होते. संस्कृत बीज विहार या शब्दाचा हा  अपभ्रंश होता 1760 मध्ये मोगल सम्राट फररुखसियार यानी काश्मीरला भेट दिली तेव्हा बिहार येथील पंडित राजकौल यांना त्याने दिल्लीला आमंत्रण दिले. एका कालव्याच्या काठी राहत्या घरासह एक जहागीर राजकौल यांना देण्यात आली. कालव्याला नहर असा शब्द आहे तेव्हा कालव्याच्या काठी राहणारे घराणे नेहरू म्हणून ओळखले जाऊ लागले.

 • 1857 च्या उठावाच्या वेळी ब्रिटिश फौज दिल्लीत घुसल्यानंतर गंगाधर कौल व त्यांच्या कुटुंबाने आग्रा येथे आश्रय घेतला. त्यानंतर वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी गंगाधर कौल यांचे निधन झाले,त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच 6 मे1861 मध्ये पत्नी जीव राणी ने एका मुलाला जन्म दिला तेच मोतीलाल नेहरू.

 • त्यांचे व स्वरूपा राणी चे लग्न झाल्यानंतर अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर 1889 रोजी जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. त्यांनी 42 खोल्या असलेला आनंद भवन बंगला घेतला त्यावेळी जवाहरलाल 11 वर्षाचे होते.मोतीलाल यांच्या जेवणाच्या टेबलवर नेहमी पाश्चात्य खाद्यपदार्थ व उत्तम मध्यम असे घराच्या या भागात इंग्रजीतूनच बोललो पाहिजे असा मोतीलाल यांचा दंडक होता मोतीलाल यांच्या पत्नी स्वरूपा राणी यांना हुजूर साहेब असे म्हटले जाई.

 • 8 फेब्रुवारी 1916 रोजी जवाहरलाल व  कमला यांचे लग्न झाले. दोघात अकरा वर्षाचे अंतर होते. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी  अलाहाबाद येथे झाला.मोतीलाल यांच्या आईचे नाव इंदिरा राणी होते ती एक सामर्थ्यशाली धाडसी स्री होती तिच्या वरूनच इंदिरा हे नाव घेण्यात आले होते. 

 • इंदिरा चा तेरावा वाढदिवस 26 ऑक्टोबर 1930 ला होता त्यादिवशी जवाहरलाल यांनी जे पत्र तिला पाठवले ते ग्लिमसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी या पुस्तकातील पहिले पत्र होते. त्याच वर्षी पुण्याच्या पीपल्स ओन स्कूलमध्ये इंदिरा गांधींना ठेवण्यात आले.

 • ब्रिटिशांनी केलेल्या भारताच्या राष्ट्रीय अवमानाला प्रत्युत्तर म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. या शांतिनिकेतन मध्ये शिकत असताना इंदिरा गांधी यांची फ्रॅंक ओबेरडॉर्फ या  जर्मन तरुणाशी भेट झाली.  तो तिला फ्रेंच शिकवत असे. तेव्हा ती सोळा वर्षाची व तो चौतीस वर्षाचा होता. पण तिच्याकडे आकर्षित झाला होता. 

 • उपचारासाठी इंदिरा व तिची आई 4 जुन 1936 रोजी व्हिएन्ना पोहोचले तेव्हा स्वागत करण्यासाठी जी मंडळी होती त्यात सुभाष चंद्र बोस होते. 

 • 28 फेब्रुवारी 1936 रोजी कमला नेहरू यांचे निधन झाले त्यावेळी इंदिरा पस्तीस वर्षाची होती. लोजान येथे कमलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 • इंदिरा फिरोज लग्नाबद्दल महात्मा गांधी यांच्याशी चर्चा झालेली होती त्या वेळी गांधीजींच्या  नव जोडप्याच्या ब्रह्मचार्य बद्दलचे मत इंदिराजींना फारसे पटले नाही.लग्न आंतरधर्मीय होतं गांधीजी आणि जवाहरलाल या दोघांना जाहीर रित्या या निर्णयाचे समर्थन करावे लागले.

 • 16 मार्च 1942 या दिवशी आनंद भवन आलाबाद येथे दोघांचे लग्न झाले. या लग्नात प्रख्यात शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची मुलगी ईव्ह क्युरी देखील उपस्थित होती. हनीमूनला काश्मीर येथे गेल्यावर शेख अब्दुल्ला यांनी त्यांची व्यवस्था केली.

 • फिरोज गांधी 1952 मध्ये रायबरेली हुन  लोकसभेवर निवडून आले. संजय चा सर्वात लाडका पाणी मगर होता.न्यूयॉर्क येथील कार्यक्रमात डोरोथी नॉर्मन या लेखिका संपादिका छायाचित्रकार यांच्याशी इंदिरा गांधी ची ओळख झाली.जी मैत्री आयुष्यभर टिकून राहिली.

 • 1954 लोकसभेमध्ये केलेल्या विमा कंपनी व उद्योगपती यांच्यावरील टीकेमुळे उद्योगपती दालमिया यांना अटक करण्यात आली. मुंदडा प्रकरण उघड केल्यामुळे कृष्णम्माचारी व त्यांच्या सहकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला. मत्था ई विषयी माहिती वृत्तपत्रात छापून आ नल्यामुळे त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला.

 • 2 फेब्रुवारी 1959 रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदी इंदिरेची बिनविरोध निवड झाली तेव्हा ती 41 वर्षांची होती. नेहरू घराण्यातील ती तिसरी अध्यक्ष होती.

 • 1959 मध्ये फिरोज गांधी यांचे हृदयविकाराने निधन झाले तेव्हा राजू सोळा वर्षाचा व संजय 14 वर्षाचा होता.

 • कामराज योजनेतील डावपेच अंमलबजावणीची वेळ व वेग लक्षात घेता ते काम इंदिरा गांधींनी केलं असावं असं दिसतं. 25 फेब्रुवारी 1968 रोजी राजीव आणि सोनिया यांचा विवाह दिल्ली येथे झाला तेव्हा राजीव गांधी इंडियन एअरलाइन्स मध्ये वैमानिक म्हणून दाखल झाले होते. 1970 मध्ये राहुल व 1971 मध्ये प्रियंका गांधी चा जन्म झा ला. 

 • पंतप्रधान म्हणून निवड होण्याच्या आदल्या दिवशी इंदिरा गांधींनी आपला मुलगा राजूला पाठवलेल्या पत्रात रॉबर्ट फ्रॉस्ट च्या पुढील ओळी लिहिल्या होत्या... "how hard it is to keep from being King when it is in you and the situation"

 •  राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांचे  वर्णन गुंगी गुडिया अस  केल होत.

 • अच्युतराव पटवर्धन जयप्रकाश नारायण यांचे मित्र होते राजकारणातून त्यांनी संन्यास घेऊन जे कृष्णमूर्ती पासून प्रेरणा घेऊन वाराणसी जवळ एका खेड्यात काम करत होते.

 • घटनेच्या 352 व्या कलमानुसार आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय सिद्धार्थ शंकर रे यांच्या सल्ल्यावरून इंदिरा गांधींनी घेतला. रात्री आठ वाजता रे व इंदिरा राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांना भेटायला गेले. 25 जून रोजी राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू करणारा वटहुकूम काढला.

 • वीजपुरवठा बंद झाल्यामुळे अनेक वृत्तपत्र निघाली नाहीत पण अन अवधनाने वीज तोडायची राहून गेल्याने स्टेटस मन व हिंदुस्थान टाइम्स ही दैनिक तेव्हढी प्रसिद्ध झाली. मुळात त्या रात्री इंदिरा गांधी सिद्धार्थ शंकर रे यांना म्हणाल्या होत्या, " वर्तमानपत्रांचा वीजपुरवठा तोडला जाणार नाही आणि उच्च न्यायालय देखील उघडे राहतील".

 • इंद्रकुमार गुजराल हे त्यावेळी माहिती व नभोवाणी मंत्री होते. बातम्या प्रक्षेपित करण्यापूर्वी मला त्या पाहायला हव्यात असे संजय गांधी यांनी सांगितल्यावर गुजराल यांनी त्या स स्पष्टपणे नकार दिला. नंतर गुजराल यांचे खाते बदलून,  माहिती व नभोवाणी खाते विद्याचरण शुक्ल यांच्याकडे देण्यात आले. 

 • आणीबाणी लागू केल्यानंतर चार दिवसांनी एक जुलै 1975 रोजी इंदिरा गांधीने वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. 

 • या काळात RSS,  जमात-ए-इस्लामीया-  हिंद,  आनंदमार्ग व नक्षलवादी यांच्या वर बंदी घालण्यात आली. 

 • संजय इंदिरा चे कान व डोळे बनला,  "काम करताना प्रथम च  ती अडखळू लागली आणि दुसऱ्याला आपले निर्णय घेऊ देऊ लागली थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट गुंडाळा व, तसे तिने संजयला  आपल्याभोवती लपेटून घेतल. जणू तिला कापर भरल होत,"  असं  आर. एन. काव म्हणाले. 

 • आणीबाणी जाहीर झाली तेव्हा संजय 29 वर्षाचा होता.त्याचे प्राथमिक शिक्षण एलिझाबेथ गौबा या शाळेत झाली.  डेहराडून येथील डू न  स्कूल संजयने मध्येच सोडून दिली तेव्हा रोल्स-रॉयस कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून त्याची इंदिरेने परदेशी रवानगी केली. 

 • " संजय आणीबाणीचा चेहरा होता. पान जरी पडले तरी लोक म्हणायचे हे संजयानेच केले असणार" असे मनेकान एकदा म्हटल होत. 

 • आणीबाणीच्या काळात डॉक्टर करण सिंह हे आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री होते

 • 1977 मध्ये बाबू जगजीवनराम, हेमवती नंदन बहुगुना व नंदिनी सत्पती या तिघा नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन समाजवादी काँग्रेस अर्थात काँग्रेस फॉर डेमोक्रेसी हा पक्ष स्थापन केला होता. बाबू जगजीवनराम काँग्रेसचे ज्येष्ठ पुढारी व हरिजनांचे एकमेव नेते होते.

 • 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव करून निवडून आलेले राजनारायण हे स्वतःची तुलना हनुमानाशी करत चरणसिंग हे राम तर राजनारायान हे त्यांचे हनुमान होते. 

 • 1947 पासून इंदिरा गांधींचे खाजगी सचिव एन.के. शेषन हे होते श षन यांच्या माहितीनुसार इंदिराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा तिच्या जवळ स्वतःचे फारच थोडे पैसे होते. आपल्या पुढील कठीण दिवसांची तिला कल्पना होती. 22 मार्च 1977 रोजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी तो स्वीकारला.

 • जनता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर पंधरा दिवसात 1952 च्या चौकशी आयोग कायद्याच्या तिसऱ्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जे सी शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग नेमण्याची 7 एप्रिल रोजी घोषणा केली. आणीबाणीत झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्याचे काम या आयोगाकडे होते ज्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.शहा आयोगाने आपल्या बैठकांना 30 सप्टेंबर 1977 पासून नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस येथे सुरुवात केली.नऊ जानेवारी 1978 रोजी इंदिरा गांधी शहा आयोगापुढे हजर झाल्या त्यावेळी त्यांचे वकील फ्रॅंक अँथनी हे होते.

 • मे 1977मध्ये 1 सफदारजंग रोड हे पंतप्रधान पदाचे अधिकृत निवासस्थान सोडून इंदिरा गांधी 12, विलिंग्डन क्रेसें ट या बंगल्यात राहण्यास गेल्या.

 • संजय गांधीच्या विरोधात एखाद्या भयंकर गुन्ह्याशी संबंध जोडण्यासाठी सीबीआयला पुरावा सापडत नव्हता त्या वेळी इंदिराजींच्या राजकीय कारवायांचे विडंबन करणारा "किस्सा कुर्सी का" हा चित्रपट त्याने नष्ट केला असा आरोप संजय व विद्याचरण शुक्ला यांच्यावर ठेवला.

 • जुलै 1977 मध्ये बिहार मधील बेलची या एका छोट्याशा खेड्यातील जमीनदारांनी भूमिहीन हरिजन वर हल्ला करून त्यांच्या कुटुंबियांची कत्तल करून पेटत्या आगीत प्रेते फेकून देण्यात आली होती. ठार झालेल्यांमध्ये दोन लहान बालकेही होती. या बेलची खेड्याला इंदिरा गांधी यांनी भेट दिली.

 • 3 जानेवारी 1978 रोजी काँग्रेस पक्षात फूट पडली. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसमधील ही दुसरी वेळ होती. इंदिरा गांधी या काँग्रेस अध्यक्ष बंगल्यावर हाताचा पंजा हे पक्षाचे निवडणूक चिन्ह ठरले.

 • 78 मध्ये झालेले निवडणूक इंदिरा गांधी यांनी चिकमंगळूर येथून लढवली. चिकमंगळूर हा पश्चिम घाटातील एक छोटा जिल्हा आहे. या भागातील सर्वात उंच शिखराचे नाव बाबा बदून असे होते. सतराव्या शतकाच्या सुमारास बाबा बदून हे मुस्लिम संत मक्के हुन  येथे आले होते. त्यांनी बरोबर कॉफी च्या बिया आणल्या होत्या. त्यांनी स्वतःची झोपडी उभारली आणि आवारात कॉफीच्या बिया पेरल्या.भारतातील कॉफीची पिकाची ही सुरुवात होती. चिकमंगळूर येथील कॉफीची जगात सर्वोत्कृष्ट कॉफी म्हणून गणना केली जाते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध उभे करण्यात आले वीरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची धुरा जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे होती. 

 • इंदिरा गांधींविरुद्ध नेमलेल्या त्रीस्का आयोगाने तिच्यावर असा आरोप ठेवला की, त्याने चार कोंबड्या व दोन आंडी चोरली. त्यासाठी खटला भरण्यात आला व वॉरंट देखील काढण्यात आले. साठ वर्षे वयाच्या इंदिरेला दोन हजार मैलांचा प्रवास करून मणिपूरच्या कोर्टात हजर राहावे लागले. फिर्यादीच्या विनंतीवरुन सुनावणी तहकूब करण्यात आले आणि इंदिरा दिल्लीला परत आली.

 • 19 डिसेंबर रोजी लोकसभेने इंदिरा गांधींना  सदन संस्थगित होईपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली तसेच सभागृहाचा गंभीर आव्हान व हक्कभंग केल्याबद्दल तिची सदस्यत्व वरून हकालपट्टी केली.

 • तिहार तुरुंगात जॉर्ज फर्नांडिस यांना पूर्वी ज्या बरॅक मध्ये ठेवले होते तिथेच इंदिरा ठेवण्यात आले. तेथे झोपण्यासाठी लाकडी पलंग दिला होता पण सतरंजी दिली नव्हती. खिडक्यांना गज होते पण श टर्स नव्हते. ते डिसेंबर चे दिवस होते दिल्लीतील सर्वात कडक थंडीचा मोसम होता. अनेक वर्षांपूर्वी इंदिरेला उदास वाटत असताना जवाहरलाल नी तीला बिथोव्हेन  यांचे एक वाक्य कळवलं होतं "मी दैवाचा गळा पकडेल आणि त्याला माझ्यावर पूर्णतया मात करू देणार नाही" हे वाक्य तुरुंगात तिला आठवले. 

 • फ्रान्स मध्ये प्रसिद्ध झालेले 'इंटरनल इंडिया' हे पुस्तक इंदिरा गांधी नी लिहिलेले होते. 4 एप्रिल 1979 रोजी  झुल्फिकार अली भुत्तो यांना रावळपिंडी येथे फाशी देण्यात आ ली.

 • 15 जुलै रोजी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवण्याचे आमंत्रण राष्ट्रपतींनी चरणसिंग यांना 27 जुलै रोजी दिले. इंदिरा काँग्रेसचे एकूण 72 खासदार होते. नव्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान म्हणून सामील झाले होते. इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर चरणसिंग सरकार सत्तेवर आलं होतं.  20 ऑगस्टला लोकसभेची बैठक भरणार होती इंदिरा गांधींनी आदल्या दिवशी 19 ऑगस्टला चरण सिंग सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला. तेव्हा विश्वासदर्शक ठराव मंजूर होऊन आपला पराभव लक्षात होणार हे लक्षात आल्याने चरण सिंग यांनी राजीनामा दिला.

 • 8 ऑक्टोबर 1979 रोजी जयप्रकाश नारायण यांचे पाटणा इथे निधन झाले.  1980 मध्ये इंदिरेने चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मे 1980 मध्ये नऊ राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. 

 • फ्रान्सचे नवे अध्यक्ष फ्रान्सव मित्र यांच्या निमंत्रणावरुन नोव्हेंबर1981 मध्ये इंदिरा गांधींनी पॅरिसला भेट दिली. पंतप्रधान झाल्यानंतर तिचा हा पहिलाच परदेश दौरा होता. पॅरिसमधील सोर्बन विद्यापीठ डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी देऊन तिचा सन्मान करणार होते. 

- समाधान महाजन.

31 ऑक्टोंबर 2020


Scam 1992


 90 s च्या दशकात जगायला भेटणे हा आपल्यातच एक आनंद आहे. नवीन शतकाच्या उंबरठ्यावर ऐन तारुण्यात प्रवेश करतांना  आपल्यासोबत देश देखील मोठ्या संक्रमण अवस्थेतून जात होता हे या पिढीने अनुभवले आहे. नवीनच आलेले संगणकाचे मोठे खोके उत्सुकतेने न्याहाळत असताना नुकत्याच श्रीमंत घरात केबल टिव्ही बघणारे रिमोट ने चॅनल बदलण्याचे सुख अनुभवत होते तर  असंख्य घरात दूरदर्शनचा antenna व्यवस्थित फिरवून विना व्यत्यय ची पाटी येता करमचंद, महाभारत, चंद्रकांता बघण्याचा असीम आनंद घेणारे पण होते. 

1992 ला आम्ही आठवीत असू.....पेपर वाचणे सुरू केले तेव्हा रथ यात्रा - राम मंदिर च्या, सिंग चंद्रशेखर हे पंतप्रधान म्हणून राहून गेल्याच्या, राजीव गांधींची हत्या झाल्याच्या  बातम्या ठळक आठवतात......

या सोबतच अजुन एक बातमी विविध वृत्तपत्र व मासिकातून सातत्याने प्रसिद्ध होत होती....बिग बुल ..हर्षद मेहता...शेअर बाजार हा शब्द पहिल्यांदा  वाचला होता तो या माणसामुळे...यामुळे दलाल, ब्रोकर, बुल, बिअर, सेन्सेक्स अशा शब्द संपत्तीची भर कारण व गरज नसतांना शालेय वयात झाली......अजूनही वृत्तपत्राची ती हेडिंग आठवते जेव्हा..." हर्षद मेहता ने PM ला एक कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता"...... मेहताचा तोच फोटो पेपरला पाहून  काही वर्गमित्रांना मेहता व दाऊद सारखे दिसतात ते दोघे भाऊ असून त्यांनी भारताला बुडवायचा कट केला आहे असा प्रचंड मोठा गौप्य स्फोट एक दिवस  प्रार्थनेच्या आधी आमच्या कंपूत केला.....सुदैवाने आमच्या पैकी ही बातमी कोणीही न फोडल्यामुळे .....त्याचे पुढे काही झाले नाही.....

असो तर मुळ मुद्दा असा की त्याचं हर्षद मेहतावर नुकतीच आलेली "scam 1992  द हर्षद मेहता स्टोरी"  नावाची वेब सिरीज पाहिली आणि हे सर्व आठवलं इतकंच......

कोणतेही मर्डर, सेक्स सीन, हॉरार नसतांना देखील एखादी सिरीज इतकी छान ग्रीप घेऊ शकते.... economic, finance, taxation वाल्यांनी पाहायला हवी....अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आहे.... सिरीज पाहताना मध्येच  एकदा गुरु चित्रपटाची आठवण आली.....साम.. दाम...दंड ...भेद... पण crises mode आल्यावर मात्र भिन्न  टार्गेट नुसार रस्ते बदलतात..

बर्‍याच प्रसंगात संधी असतांना देखील दिग्दर्शकाने राखलेला संयम विशेष आहे. बरेच संवाद कॅची आहेत. अगदी वास्तविक असणारे सीन दाखवले आहेत. विशेषतः जेव्हा राम जेटमलानी व हर्षद मेहता पत्रकार परिषद घेत असता तेव्हा मुळची पत्रकार परिषद व सिरिज मधील यांचे मिक्सिंग छान आहे. अजून एक महत्वाच म्हणजे यातील पात्र निवड उत्कृष्ट आहे. 

अर्थात हर्षद म्हणजे त्या काळातील सर्व कायद्यांतील पळवाटांचा आधार घेऊन जन्मलेल scam चे अपत्य होते. ज्यातून Sbi, RBI, SEBI कुणालाही न जुमानता राजरोस हा प्रकार सुरू राहतो. ...एकेकाळी मुंबईतील चाळीत राहणारा हा इसम वयाच्या चाळीशीत वरळी सी फेस 15000 sq.ft च्या पेंटहाऊस मध्ये राहतो. 

आपल्या चेक वरील सहीची एक रेषा जरी बदलली तरी जागतिक भूकंप झाल्यासारखे आपल्याला भेदक व खुनशी नजरेने  अपदमस्तक न्याहळणारे व अत्यंत " विनम्रपने सदोदित आपल्याला  मदत करणारे", sbi च्या अख्या व्यवस्थेला  हा मेहता दरदरून घाम फोडतो.... तब्बल 500 कोटी रुपये विना original BR व security मेहताभाईंच्या अकाऊंटला टाकले जातात, ही बातमी लिक होते व सुरू होतो पुढचा सर्व खेळ.  नंतर हर्षदवर 70 च्या आसपास क्रिमिनल व 500 च्या आसपास सिविल केसेस टाकल्या जातात. या सगळ्यांना तोंड देत वयाच्या 47 व्या वर्षी हार्ट अटॅक ने त्याचा मृत्यू होतो. हे सर्व त्याच्या वयाच्या 38 ते 44 या टप्प्यात होते. 

हा सर्व scam झाल्यानंतर आलेली नरसिंह कमिटी, सेबी व rbi चे कडक झालेले नियम..... हे सर्व आपल्या भारतातील प्रथेनुसार नंतरचे disaster management होते. 

गुन्हेगारपट आपल्याकडील म्हटले तर शूटआऊट अॅट वडाला अँड लोखंडवाला वाले मन्या सुर्वे, माया डोळस यांच्यावर असलेल्या फिल्म पासून डी, वन्स अपोन टाइम ही दाऊद वर असलेली फिल्म पर्यन्त तसेच दगडी चाळ व कित्येक सत्या सारख्या बेस्ड ऑन चा लेबल लाऊन आलेल्या फिल्म्स होत्या...... अनुराग ची ब्लॅक फ्रायडे अल्टिमेट फिल्म होती....पण या सर्वांमधील एक बाब कॉमन होती ती म्हणजे या सर्व गॅंगस्टर मूवीज होत्या.... खून, फायरिंग....हफ्ते...हे सर्व कॉमन होते....

scam 1992 ही बॉलीवूड मधील व्हाइट क्रिमीनल मागील सायकोलोजी दाखवणारी पहिली अभ्यासपूर्ण सिरिज आहे... वास्तवता व रंजकता यातील बॅलेन्स बेमालूम पणे सांभाळण्याचे कौशल्य दिग्दर्शकाने दाखवले आहे. दिग्दर्शक  अर्थात मेहता च आहे........ हे विशेष 😊 

(courtsy- अर्थातच सर्वश्री सुशीलकुमार अहिरराव)

- समाधान महाजन




पितळखोरा लेणी व पाटणादेवी


पाटणादेवी व पितळखोरा ही दोन्ही ठिकाणे ऐतिहासिक महत्वाची आहेत. अजंठा सातमाळ डोंगर रांगेतील आम्ही भेट दिलेले हे चौथे ठिकाण होते. अजंठा लेणी, गोद्रि येथील धबधबा, अन्तुरचा किल्ला हे आधीचे तीन ठिकाणे होती. पैकी पाटणादेवी हे चाळीसगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यात  येते तर त्याच्या एक्झॅक्टवर असलेल्या डोंगरावरील पितळखोरा लेणी ह्या कन्नड तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यात  येतात.
आज आम्ही परत तीन जण होतो. नेहमीप्रमाणे आज देखील माझ्या सोबत इतिहासातील रसिक व्यक्तिमत्व सर्वश्री सुशीलकुमार अहिरराव 😋(हा खरा तर एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.....and i promised him when he got his post...i will write on him thoroughly) व राहुल नावाचा एक भावी अधिकारी आमच्या सोबत होता.   

चाळीसगाव पासून साधारण वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर पाटणादेवी हे ठिकाण आहे. नावावरून आपल्या लक्षात आले असेलच की हे एक देवीचे मंदिर आहे.  पण महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वाभिमुख करण्यात आली आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरात हे देखणे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. 

आपण ज्या गावातून पाटनादेवी मंदिराकडे जातो ते गाव म्हणजे पाटण.  या गावाला देखील ऐतिहासिक व पौराणिक असे महत्त्व आहे. गणितातील प्रसिद्ध भास्कराचार्य हे या पाटण या गावामध्ये राहत असत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ लीलावती लिहिला असे म्हटले जाते. भास्कराचार्य यांचे विज्जलबीड म्हणजे पाटणा हेच असावे, असा तर्क येथील एका शिलालेखावरून लावला जातो.

ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनासाठी त्यांनी या ठिकाणी एका मठाची स्थापन केली होती. त्यांचा नातू चांगदेव यानेही अध्ययनाची प्रथा याच मठाच्या माध्यातून सुरू ठेवली होती. आजही काही शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतात. देवी मंदिराच्या परिसरात वनविभागाची अनेक केंद्र भास्कराचार्य यांच्या नावावरून देण्यात आलेले आहेत.

पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर, सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे.


देवीच्या मंदिराचा परिसर आपले लक्ष वेधून घेतो........पाठीमागे काही अंतरावरील सातमाळा डोंगररांगेतून कोसळणारा धबधबा नयन रम्य दिसतो.....आम्ही पोहचलो तेव्हा मंदिर परिसरात चिटपाखरू देखील नव्हते मंदिराच्या शेजारीच वाहत असलेल्या एका नदीला ओलांडून पलीकडे गेल्यानंतर जंगलात थोडावेळ चालल्यावर उजव्या बाजूला एका धबधब्याकडे जाण्याचा रस्ता लागतो.  मध्ये दोन तीन वेळा पाण्याचा प्रवाह ओलांडून जावे  लागते. ऐन पावसाळ्यात गेल्यास ती जोखीम घेऊ नये कारण पावसाळ्यात अशा नद्यांना वर पडलेल्या पाण्यामुळे अचानक पूर येऊ शकतो. आम्ही ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात गेल्यामुळे वातावरण छान होते. त्यातच या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे सर्व वातावरण हिरवगार होतं. नद्यांना देखील पानी कमी होत.  त्यामुळे त्यांना ओलांडून जाणं शक्य होतं. धबधब्याच्या परिसरात जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा फक्त पाण्याचा आवाज येत होता व जंगलभर शांतता पसरलेली होती.  धबधब्याची मुख्य धारा ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी एक डोह तयार झालेला होता व त्यातून पाण्याचा प्रवाह नदीच्या रूपात  ज्या मार्गाने आम्ही आलो त्या मार्गाने  खाली जात होता.  डोहाच्या  परिसरातील शांतता ही इतकी वेधक व आकर्षक होती की,  आपल्या आतल्या  आवाजाला ती आवाज देत होती.  त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास आम्ही त्या शांततेचा,  पाण्याच्या आवाजाचा आणि निसर्गाचा आनंद घेतला.

परत निघतांना सोबत आणलेला नाश्ता केला व आम्ही पितळखोऱ्याच्या रस्त्याला लागलो. थोडे सपाटीचे पण जंगलातील अंतर पार केल्यावर वन विभागाचे छत्री बांधकाम सुरू होते. मागील अनुभवावरून तेथे काम करणाऱ्या मजुरांना वरती जाण्याचा रस्ता  विचारला त्यांनी जवळपास अर्धा तास वर चढायला लागेल असे सांगितले व हाच रस्ता पुढे जातो त्याला सोडू नका असे देखील त्यांनी आम्हाला सांगितलं. आतापर्यंत गाडी वाटेचा असलेला रस्ता आता छोटा झालेला होता व जंगलातली पाऊलवाट ज्याला आपण म्हणतो त्याची सुरुवात झाली होती अर्थात ही पाऊलवाट म्हणजे डोंगर  चढण्याची वाट.  मध्येच लागत असलेल्या  पायर्‍या  तर कधी निव्वळ डोंगर , दगड व मातीचा रस्ता चढत जावे लागत होते.  अंतुर किल्ल्यासारखी मध्येच चढ नंतर परत सपाट अशी परिस्थिती येते नव्हती.  तर सरळ असा वर चढत जाणारा मार्ग असल्यामुळे प्रचंड दमछाक झाल्यासारखे वाटत होते पण आता ट्रेकिंग हा विषय नेहमीचा  झाल्यामुळे या थकण्याचाही आनंद घेता येत होता. मध्येच मागे फिरून पाहिले असता उंचावरून दिसणारा संपूर्ण परिसर  हिरवागार दिसत होता.... हा ऑक्टोबर महिना होता ...अजून काही दिवसात पानझड सुरू झाली की हे सुंदर दृश्य दिसणार नाही. 


एका टप्प्यावर पानी पिण्यास थांबलो तेव्हा खाली पाहिले असता दाट झाडीत देवीचे मंदिर अगदीच चिमुकले दिसत होते. दूरवरील वनविभागाचे रेस्ट हाऊस व टेहळणी मनोरे देखील दिसत होते. कदाचित आता अगदी जवळ राहिले असावे पण सोबत असणारा मित्र म्हटला, 'अजून बरेच अंतर आहे आपण अशा टप्प्यावर जाऊ तेथून हा खालील परिसर देवीचे मंदिर काहीच दिसणार नाही. 

आता हा शेवटचा टप्पा थोडा त्रासदायक  जरी जाणवत असला तरी दाट झाडी व गवतामुळे उन्हाचा त्रास नव्हता.....हुश.. आणि ते सर्वोच्च टोक आले जिथे आमचे चढणे पूर्ण थांबले. त्या ठिकाणी असलेल्या झाडाखाली थोडावेळ थांबून आम्ही परत चालण्यास सुरुवात केली. आता डोंगराच्या पोटाला कडेकडेने बनलेल्या सपाट रस्त्यावर अजून काही अंतर चालत जायचे होते. मध्येच एक नदी आली. कदाचित ही तीच नदी असावी जिच्यावरचा धबधबा आम्ही खाली पाहिला. आता दोन डोंगर ज्या ठिकाणी भेटता त्या मीटिंग पॉइंटकडे रस्ता जातांना दिसत होता. 

एक क्षण असा आला की, समोर रस्ता आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडला.  कारण तो रस्ता दाट झाडी व उंच गवताने पूर्ण झाकून गेला होता.आमच्या उजव्या बाजूला नदी वाहत होती.... ती गवत, झाडी व जाळींमुळे दिसत नव्हती फक्त पाण्याचा आवाज येत होता. तसेच दोन तीन पावले टाकले असता ....... पलिकडच्या बाजूला एक बांधलेला सरळ कठडा दिसला जो कदाचित पुरातत्व खात्याने बांधला असावा.... मी पार पूर्वी कॉलेजला असतांना कधीतरी आलो होतो पण त्या स्मृती पुसट झाल्या होत्या. 

मग आम्ही त्या जवळपास बंद झालेल्या पाऊलवाटेने तसेच चालत गेलो. आणि एकदम आम्हाला  थेट लेणीचे दर्शन झाले. बाजूलाच वाहत असलेल्या नदीच्या किनारी पाण्याचा आवाज यीत असतांना ही दोन अडीच हजार वर्षांपूर्वीची लेणी पाहत असतांना लईच भारी वाटत होते.    

पितळखोरे येथील बौद्ध लेणी औरंगाबाद जिल्ह्यातील सातमाळा पर्वतरांगांत कन्नड तालुक्यात येतात. एकूण १४ लेण्यांचा हा समूह प्राचीन भारतातील लेण्यांच्या निर्मितीतील  पहिल्या टप्प्यातील आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील इतर लेणी समूहांप्रमाणे या लेण्यादेखील पश्चिमेकडील सोपारा (शुर्पारक), कल्याण  व भडोच (भरूकच्छ) सारखी प्राचीन बंदरांना देशांतर्गत असणार्‍या पैठण व तगर (तेर)  आणि उत्तरेकडील उज्जैन सारख्या नगरांना जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर निर्माण केल्या असाव्यात. पितळखोरे हे टॉलेमीने वर्णन केलेले ‘पेट्रीगल’ आणि ‘महामायुरी सूत्र’ या बौद्ध ग्रंथात वर्ण केलेले ‘पितंगलय’ हे शंकरी नावाच्या यक्षाचे स्थान असावे.


येथील लेण्यात ‘भारवाहक यक्ष, द्वारपालांची जोडी, पंख असलेल्या अश्वांची जोडी, बाह्यभागावरील हत्तींची मालिका या विशेष मूर्ती आहेत.

येथे एकूण 14  बौद्ध लेण्या आहेत. ज्यांचा समावेश महाराष्ट्रातील आद्य मठांमध्ये केला जातो. सर्व लेण्या हिणयानकालीन असून महायानकालीन स्थापत्य रचनेचा कोणताही पुरावा येथे दिसून येत नाही. लेणी क्रमांक 3 मधील केवळ चित्रांमुळे महायान कालखंडाचे अस्तित्व दिसून येते. लेणी दोन समुहांमध्ये विभाजित असून दरीच्या उजव्या बाजूस असणाऱ्या प्रथम तर डाव्या बाजूस द्वितीय समूह आहे. त्यापैकी सहा चैत्यगृह आणि इतर विहार आहेत. विहारांचे विधान अत्यंत साधे असून यात आयताकृती खोलीत आतल्या बाजूच्या व मागील भिंतीत कक्ष खोदलेला आहे. यात दगडातच खोदलेल्या पलंगाची व कोनड्यांची व्यवस्था आहे. विहारांमध्ये लेणे 4 विशेष उल्लेखनीय आहे. या लेण्यांचा मंडप विशाल असून पाठी मागच्या भिंतीत सात कक्ष खोदलेले असून त्याचे छत घुमटाकार आहे. दर्शनी भागावर शिलाकृतींनी अलंकरण केलेले आहे. या लेण्याच्या समोर थोडे खालच्या बाजूस असणारे विस्तृत अंगण लेणी क्रमांक एक दोन व तीन यातही विभागलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस खर्‍या मनुष्याकृती एवढे द्वारपाल असून  द्वारशीर्षावर गजलक्ष्मी आणि द्वारशाखेवर पुष्पाकृती कोरलेल्या आहेत. सहा चैत्यगृहपैकी लेने 3 स्थापत्याचा योजनेसाठी उल्लेखनीय आहे. ज्यात गजपृष्टाकार  प्रार्थनागृहांचे विभाजन भिंतीत समांतर असणाऱ्या  खांबामुळे मध्यभाग व प्रदक्षिणा पथात झालेले दिसून येते. यातील उजव्या बाजूच्या रांगेतील दहाव्या व अकराव्या खांबांवर शिलालेख आहेत. त्यात हा स्तंभ गंधिक(अत्तर बनवणारे) कुळातील मितदेवाचे दान आहे व दुसऱ्या खांबावर हे संघकाच्या पुत्राचे दान आहे, असा उल्लेख आहे. हे सर्व दाते प्रतिष्ठान म्हणजे आजच्या पैठणचे रहिवाशी होते. पितळखोरा पश्चिम भारतातील शैलस्थापत्याच्या अध्याय केंद्रांपैकी एक असून यातील स्थापत्यरचना व कलात्मकतेच्या दृष्टीने नव्हे तर धार्मिक सामाजिक व आर्थिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

प्रस्तुत लेण्यांमध्ये एकूण ११ कोरीव लेख आहेत. पैकी ७ लेखांची नोंद बर्जेस व इंद्रजी  यांनी केली आहे आणि १९५९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या उत्खनन अहवालात एम एन देशपांडे यांनी ४ नवीन लेखांची नोंद केली आहे. सर्व लेख ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये कोरलेले आहेत. एकाही लेखामध्ये कालनिर्देश नाही. परंतु अक्षरवाटिकेच्या आधारे हे लेख इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे पहिले शतक या काळात कोरलेले असावेत.
लयनस्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झालेल्या इतर लेण्यांत सातवाहन आणि शक राजवंशाचे लेख दिसून येतात. पितळखोरे येथे या राजांचे लेख नाहीत. मात्र याच लेण्यामधील विविध लहान खोल्यांच्या भिंतींवर कोरलेले चार लेख राजवैद्य मगिल आणि त्याच्या कुटुंबियांचे आहेत. मगिल हा वच्छि याचा पुत्र होता. स्वत:स राजवैद्य म्हणवणारा मगिल हा तत्कालीन महत्वाच्या राजघराण्याच्या सेवेत असावा. अशाच प्रकारे नण्ण वैद्य याने कान्हेरी येथे आणि वैद्य इसिरखित आणि त्याचा पुत्र वैद्य सोमदेव यांनी कुडा येथे दान दिल्याचे ब्राह्मी शिलालेखांत नोंद केले आहे. मात्र मगिल प्रमाणे हे वैद्य स्वत:स राजवैद्य म्हणवत नाहीत.
चैत्यगृहाच्या शेजारील क्र. ४ च्या लेण्यातील छोट्या खोल्यांच्या भिंतींवर हे चार शिलालेख कोरलेले आहेत. एम. एन. देशपांडे यांनी नव्याने केलेल्या उत्खननात चार नवीन शिलालेख प्रकाशात आले. अक्षरवाटिकेच्या आधारे हे लेख इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावेत. यातील दोन लेख गुंफा क्र. ४ मध्ये आहेत. 

याच गुंफेमध्ये पंख असलेल्या घोड्याच्या शिल्पावर एक लेख आहे.हे दा कण्ह या समस याच्या पुत्राने दिले आहे. या लेखात देखील दानकर्त्याविषयीची अधिक माहिती नाही मात्र आवर्जून केलेला त्याच्या धेनुकाकट या गावाचा उल्लेख विशेष आहे. या गावाचा निश्चित ठावठिकाणा समजत नाही. मात्र धेनुकाकट हे इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र असावे. कार्ले येथील चैत्यगृहातील स्तंभांवर धेनुकाकटच्या पंधरा दानकर्त्यांची नावे कोरलेली आहेत. त्यातील सहा यवन आहेत. शेलारवाडी येथे धेनुकाकटच्या (धेनुकाकडे) नंद याचे दान नोंदले आहे.

गुंफा क्र. ५ समोर पडलेल्या एका दगडावर एक खंडित लेख आहे त्यानून फारसा अर्थबोध होत नाही. 

ठिसूळ दगडामुळे पितळखोरे येथील लेण्यांची बांधणीपश्चातच पडझड सुरु झाली होती हे येथील प्राचीन काळातील जीर्णोद्धारावरून दिसून येते. तशातच चैत्य लेणे क्र. ३ आणि लेणे क्र. ४ येथील स्तंभांची बरीच पडझड झाली आहे. त्यामुळे अजूनही काही शिलालेख नष्ट झाल्याची शक्यता आहे.

या लेण्यांकडे जाण्यासाठी कन्नड घाट चढून वर गेल्यास सोपा रस्ता लागतो ज्याला ट्रेकिंग ची गरज नाही. असे त्या मार्गाने आलेले लोक दिसत होते. 

लेण्या पाहून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. उतरतांना साहजिकच वेळ कमी लागला. खाली आलो तेव्हा नदीच्या पाण्यात हात पाय धुतांना खूपच मस्त वाटत होत....आज एकाच वेळी नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्याचा आनंद सोबत घेऊन आम्ही चाळीसगाव च्या  रस्त्याला लागलो. 

- समाधान महाजन 


संदर्भ - १) लेणीजवळ पुरातत्व खात्याने लावलेली माहिती.

 २)डॉ   रुपाली मोकाशी यांचे पितळखोरा लेनीबाबतचे आर्टिकल

.३)मराठी  विश्वकोश मधील लेणी 

४) मटा व दिव्य मराठीतील लेख


अंतुर किल्ला


अंतुर किल्ल्यावर जायचा विचार अनेक  दिवसांपासून सुरू होता. अजंठा सातमाळ डोंगर रांगेतील कन्नड तालुक्यात (जिल्हा - औरंगाबाद) हा किल्ला येतो. अखेर  काल त्याला मुहूर्त मिळाला. खर तर जवळचा रस्ता कन्नड - पिशोर - नागापूर मार्गे होता पण आम्ही जळगाव वरून जात असल्यामुळे पाचोरा - भडगाव - नगरदेवळा - नागद मार्ग आम्ही निवडला. 
किल्ला बघणे व ट्रेकिंग करणे या दोन्ही बाबींचा आनंद या प्रवासात घेता येतो. बेसिकली एक छोटी चूक आमच्याकडून अशी झाली की मुळात जळगाववरुन निघतांना आम्हाला थोडा उशीर झाला त्यामुळे किल्ल्याच्या रस्त्याला लागलो तेव्हा ऑक्टोबर हीटचे भर दुपारचे बारा वाजलेले होते. (सकाळी आठ किंवा नऊ वाजता जर सुरुवात केली तर ते छान राहील, शिवाय ज्यांना कुटुंबासह किल्ला पाहायचा असल्यास त्यांनी नागापूर मार्ग निवडल्यास उत्तम जो जरा जवळ आहे व सोपा आहे.)
आम्ही सर्व मिळून सात जन होतो. नागदच्या पुढे एका गावाजवळ दोन्ही गाड्या लावल्या व पुढील पायी प्रवासास आम्ही सुरुवात केली. ग्रुप असला की अशा ट्रेकिंगला मजा येते. अनेक गमती जमती सुरू असतात. चालायला लागलो तेव्हा किल्ला नजरेच्या अगदी टप्प्यात होता. पण पायांना काय माहीत  तो टप्पा गाठण्यासाठी आज त्यांचा बळी जाणार होता. त्यानंतर जे आठवते ते इतकेच की आम्ही फक्त चालत होतो. काही अंतराने बसत होतो. भरपूर पाणी पीत होतो.  सतत लागणाऱ्या चढावांमूळे त्यातल्या त्यात एक  घायाळ झालेल्या जवानाला धीर देत होतो की," बस आलाच किल्ला. इथून आता तिरपा रस्ता आहे व थोडे पुढे गेले की किल्ल्याचा दरवाजा लागतो" 

या इतक्या मानसिक आधारावर (की अत्याचारावर?😜)  विश्वास ठेऊन   (दुसरं ते करणार तरी काय?...अब सफर इस मुकाम तक पहुंच गया था जहा से जिंदगी के मायने भी धुंधले लगने लगे थे 🤩)  त्यो गडी बी मग असल नसल ती ताकद एकवटून अखेर चढून च गेला....अन नंतर त्याच्या पायांनी टप टप उतरून बी गेला.... पण ते मानसिक आधार देण्याचे क्षण इतक्या उन्हात बी सावली सारखे अनेक वर्ष टिकून राहतील हे नक्की. 



यातला आमचा एक जवान हा किल्ला चौथ्यांदा चढत होता. पण मायला गम्मत अशी की, दरवेळी तो वेगवेगळ्या मार्गाने चढल्यामुळे एकाच किल्ल्याकडे जाण्याच्या चार आठ  वाटा तो एकच वेळी सांगत होता व दरवेळी, समोर दिसणाऱ्या किल्ल्याकडे बोट दाखवून "हा काय किल्ला.... इथच तर हाये" ... अस सांगत असल्यामुळे......" आठशे खिडक्या नऊशे दार..." असा प्रकार वाटत होता. शाहिस्तेखानाच्या फौजेला पुण्यातून चकवून दुसऱ्या मार्गाने काढणाऱ्या महाराजांच्या सैन्यातील मोहिमेचे नेतृत्व याच जवानाने मागील जन्मी तर केले नव्हते ना असा विचार क्षणभर चमकुन गेला..... पण मग आमच्यातील एकाने ज्या पद्धतीने लाल भडक जंगली गोम एक झटक्यात त्यांच्या बॅगेवरून झटकून  दिली त्याच वेगाने मी देखील  तो विचार क्षणात झटकून काढला. 

आता आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की  किल्ला अगदी  आमच्या समोर होता व त्याच पतलात समोर आम्ही होतो....एक दगडांचे सपाट मैदान व एक दाट झाडीतून शेवटचा चढाव इतकेच राहिले होते.  पुन्हा एकदा  घायाळ झालेल्यांना, " हा काय किल्ला इथच.." अशी उभारी देवून चालायला सुरुवात केली.  
चालता चालता अजून एक बाब लक्षात आली की, आपण ट्रेकिंग करतांना स्थानिक लोक काय म्हणतात ते ऐकले पाहिजे किंबहुना आपणच त्यांना विचारले पाहिजे. कारण बरीच आपल्याला नसलेली माहिती ते सांगू शकतात. व ट्रेकिंग चा रस्ता  ठरवणे... स्पीड व टाइम यांचा अंदाज येतो व त्यानुसार आपण आपले नियोजन करू शकतो. आम्ही निघालो तेव्हा रस्त्याने भेटलेल्या एक दोन म्हातारबाबांनी आम्हाला डाव्या बाजूची टेकडी आधी चढून घ्या असे सुचवले होते पण आम्ही ते ऐकले नाही कारण किल्ला डाव्या बाजूला दिसत होता... त्यामुळे सरळ जाऊन मग वर चढू असा जो आम्ही अंदाज केला होता तो चुकीचा ठरला. त्यामुळे नाहक एक मोठी टेकडी आम्हाला चढावी लागली. ...पण मग असो...एकदा अस काही लक्षात आले की मनुष्य आयुष्यभर विसरू शकत नाही. 

प्रवेशद्वार

आता आम्ही ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलो होतो. इथून किल्ला जवळच दिसत होता. आजूबाजूला सागाचे दाट जंगल लागले होते. आत्तापर्यंत डोक्यावर सतत असलेले उन आता मात्र दाट झाडांमुळे पार दिसेनासे झाले होते. गाड्या लावल्या तेथून इंग्रजी C आकारासारखा  प्रवास आम्ही भर उन्हात केल्यामुळे हे घनदाट जंगल सुखद वाटत होत.. भर दुपारच्या उन्हाची तिरीपही त्या जंगलात येत नव्हती हे विशेष. सोबत आणलेले स्नॅक्स व पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होत चालल्याने बॅगांचे वजन ही कमी होत होते. 
पठार संपून शेवटच्या चढावला सुरुवात केली. पलीकडे काही अंतरावर असलेल्या  दरीच्या कडेकडेने आम्ही चालत होतो. मध्येच मोठ-मोठ्या दगडातून वाट जात होती.... तर कधी जंगलातील पाण्याच्या झर्‍यांमधील वाहणार्‍या पाण्यामुळे रस्ता  मध्येच निसटता झाला होता, अर्थात सावध चालत गेल्यास तो तितका रिसकी नव्हता. अचानक झाडींमधून पलीकडे पाहिले असता पलीकडच्या उंचच उंच डोंगरावर अगदी कडेला दोन छोट्या वस्त्या दिसल्या...लाल कौलारू छपर असलेली ती दहा पंधरा घरे टुमदार दिसत होती. .... या जंगलाच्या साम्राज्याची राजधानी असल्यासारखा त्यांचा दिमाख वाटत होता. 

समोर असे चालत असतांना अचानक एका ठिकाणी चक्क पायऱ्यांचे दर्शन झाले ... वाटले आला किल्ला पण त्या ठिकाणी खालून वर येणारी दुसरी एक वाट पाहायला मिळाली. पुढे उजव्या बाजूला किल्ल्याच्या तटबंदीची भिंत दिसू लागली व लगेच पुढे पक्क्या पायर्‍या दिसल्या... त्यावर चालत गेलो असता . "  महाद्वाराचे दर्शन झाले व  मनातच  "याजसाठी केला होता अट्टाहास...." अस म्हणून घेतल. 

इथे देवगिरि सारखे एक नंतर एक असे तीन मोठे दरवाजे लागतात. पूर्वी या तिन्ही ठिकाणी लाकडी दरवाजे होते असे म्हणतात. आता पहिल्या गेट ला लाकडी दरवाजा दिसतो पण तो जुना वाटत नाही. प्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६व्या शतकातील निझामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते. किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गाह व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरुजाला फेरी मारून आपण दरवाज्याकडे मार्गस्थ होतो त्या बुरुजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. दक्षिणेच्या ह्या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि एक पीराचा दर्गाह आहे. किल्ल्याचा दर्शनी बुरुज व महादरवाजा अजुन ही बऱ्या पैकी चांगल्या स्थितीत आहे... वरती असलेले भग्न अवशेष पाहून तत्कालीन किल्ल्याची स्थिती कशी असेल याची कल्पना येते. 

आम्ही निवडलेला दिवस होता 2 ऑक्टोबर ...ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होती....या वर्षी या भागात चांगलाच पाऊस झालेला असल्याने संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. मोठमोठे गवत वाढलेलं होते. त्यातून मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च पॉइंट वर पोहचलो  तेथून दिसणारे  दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे तर होतेच पण आतापर्यंत आलेला सर्व थकवा घालवणारे पण होते....वर येणारे थंडगार वारं उरली सुरली कसर भरून काढणारे होते. या ठिकाणाहून किल्ल्याच्या सर्व बाजूंनी परिसर दिसत होता. पश्चिमेकडील भागात भरपूर प्रमाणात तलाव व पाण्याचे साठे दिसत होते. पूर्वेकडे दुसऱ्या एका  डोंगरावरील सपाटीवर दिसणारे छोट्या वस्त्या होत्या.....चोहाबजूने निसर्गाने  उधळण केलेली होती. सर्व दृश्य मनात साठवून 

हळूहळू आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. सूर्य ज्या वेगाने मावळतीला चालला होता त्याच वेगाने आम्ही उतरतीचा प्रवास करत होतो ...मावळतीच्या रंगात सारे डोंगर न्हावून निघत असताना अंधार पडायच्या आत आम्हाला आमच्या वाहनांपर्यंत पोहचणे गरजेचे होते. ...अर्थात शेवटच्या टप्प्यात थोड्या अंधार प्रवासाचा देखील अनुभव आम्ही घेतला. ..


अखेर परतीच्या प्रवासात पाचोरा जवळ थोडा वेळ थांबून गांधी जयंती निम्मित शाश्री जयंती वर दोन शब्द बोलुन व  शुद्ध सात्विक आहार घेवून आम्ही परतीच्या प्रवासास लागलो...मध्यरात्री जळगाव पोहचलो तेव्हा निशब्द शांतता पसरली होती.... सहकाऱ्यांसोबत घालवलेला अख्खा एक दिवस एक नवीन ऊर्जा देणारा ठरला होता. 

............................................

या  किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती असे म्हणतात. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.

- समाधान महाजन 


असीरगड व बऱ्हाणपूर

 


बऱ्हाणपूर एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. 1602 ला अकबराने असिरगड व  बऱ्हाणपूर  ताब्यात घेतले तेव्हा त्याने म्हटले होते की , " आता मुघलांना दक्षिणेचे प्रवेशद्वार उघडले आहे".  बऱ्हाणपूर मुघलांचा महत्वाचा सुभा होता. तत्कालीन खान्देशची ती राजधानी होती. अनेक राजपुत्र तिथे वेगवेगळ्या कालावधीत सुभेदार म्हणून काम पाहत होते.  मुघलांची ती एक मोठी सैनिकी छावणी होती.  

हे शहर व परिसर कितीही महत्वाचा असला तरी पाहिजे ती प्रसिद्धी न मिळाल्याने पर्यटकांची संख्या अत्यंत कमी असते. याला कारणीभूत जस प्रॉप् र ब्रॅण्डिंग न करणं हे असतं तसच सर्वसामान्य लोकांमध्ये बऱ्हाणपूर बद्दल असलेला गैरसमज देखील असतो.  बरहाणपुर म्हटलं की पूर्वीच्या काळी येथे सुरू असणारा मुजरा आणि आता मिळत असलेली मिलन मिठाई मधील मावा जिलेबी यासाठीच बरीच मंडळींना बऱ्हाणपूर माहित असतं, त्यापलिकडे जाऊन हे शहर व परिसर समजून घेणे गरजेचे आहे. 

एकदा उज्जैन वरून ओंकारेश्वर मार्गे येत असताना वाटेत हा भला मोठा किल्ले वजा डोंगर पहिला होता. तेव्हा पासून खूप उत्सुकता लागून होती की कधी एकदा असीरगड व बऱ्हाणपूर पाहील असे झाले होते. upsc त ऑप्शनल विषय इतिहास होता तेव्हाच बऱ्हाणपूर वाचण्यात आलेलं. शिवाय  जळगाव हून अंतर फक्त 100 किलोमीटर च्या आसपास आहे... म्हणून कधीतरी जायचेच होते.

.....आणि तो दिवस उगवला. सोबत माझ्या इतकीच इतिहासाची आवड असणारा तसेच कधीकाळी माझा विद्यार्थी असलेला व सध्या SIAC सहित अनेक मान्यता प्राप्त संस्थांमध्ये इतिहास विषय शिकविणारा  सुशील अहिरराव माझ्यासोबत होता.  आम्ही भुसावळला गेल्यानंतर त्या ठिकाणी योगेश पाटील (IRTS)  यांच्या घरी आम्ही नाष्टा केला त्याला सोबत घेऊन आम्ही बरहाणपुर च्या दिशेने रवाना झालो.

 योगेश देखील  कधी काळी  आमच्या  नाशिक सेल्स टॅक्स ऑफिसला STI होता व त्याचा पण ऑप्शनल विषय इतिहासच होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजची ट्रीप ' ऐतिहासिक ' अशीच होती. 

बऱ्हाणपूर हे रेल्वे स्टेशन सध्या योगेशच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने आम्ही थेट रेल्वे स्टेशन गाठले. तेथील स्टेशन इनचार्ज आमची वाटच पाहत होते. त्यांनी अगत्याने खाऊ घातलेला नाश्ता चहा घेवून आम्ही असिर्गडकडे रवाना झालो. 

बऱ्हाणपूर पासून गड जवळपास 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता पुढे ओंकारेश्वर व इंदोर कडे जातो. मुख्य रस्त्यापासून उजव्या हाताला किल्ल्यावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो. तिथे असणाऱ्या गावात तपास केला असता त्यांनी सांगितले की गाडी थेट वर पर्यंत जाते. छोटा व वळणावळणाचा रस्ता होता. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने हळूहळू आम्ही वर पर्यंत पोहचलो. अत्यंत छोटा रस्ता असल्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. वर पोहचल्यावर किल्ल्याची भव्यता व विस्तार लक्षात येतो. 

*****

असिरगड किल्ला - 

अस मानले जाते की महाभारतामध्ये उल्लेख केलेला अश्वत्थामागिरी म्हणजेच हा किल्ला होय.उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवरून असे लक्षात येते की या किल्ल्यावर आठव्या ते बाराव्या शतकापर्यंत टकी राजपूतांचे  शासन होतं. 1295 मध्ये दक्खन मोहिमेवरून परत दिल्लीकडे जातांना अल्लाउद्दीन खिलजी याने या किल्ल्याचा ताबा मिळवला. त्याशिवाय अहीर शासक 'असा आहेर'  यांनी देखील या किल्ल्यावर राज्य केलं होतं.पंधराव्या शतकामध्ये या किल्ल्यावर फारुकी राजवंशाचा अधिकार होता. सम्राट अकबराने 1602 मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन  मुघलांसाठी दक्षिणेचा दरवाजा उघडून दिला असे म्हटले जाते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ फारसी मधील तीन चार तत्कालीन शिलालेख जतन करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अकबर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कालावधीतील शिलालेखांचा समावेश आहे. हे शिलालेख फारसी भाषेत आहेत.

अकबरकालीन शिलालेखानुसार 1601 मध्ये फारुखी राजवंश कडून अकबराने हा किल्ला हस्तगत केला व फारुखी राजवट समाप्त होऊन खानदेश मुघलांच्या ताब्यात गेले. अकबराने राजपुत्र दानियल ला खानदेश चा (बऱ्हाणपूर)सुभेदार म्हणून नियुक्त केले. 

1617 मध्ये राजपुत्र खुर्रम याला शहाजहान ही पदवी देऊन बऱ्हाणपूर सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु 1622 मध्ये शहाजहानला बऱ्हाणपूरच्या ऐवजी कंधार येथे सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले त्यावेळी त्याने जहांगीरच्या विरोधात विद्रोह पुकारला. मोगल सेनेने त्याला पराभूत करून आग्र्यावरून असिरगडावर पाठवले तेव्हा त्याने गोपाळदास गौड याच्याकडे किल्ला सोपवून तो दख्खन मध्ये गेला. पण मोगल सेनेने त्याला पुन्हा पराभूत केले. बरीच वर्ष चाललेल्या संघर्षानंतर  शेवटी 1626 मध्ये झालेल्या करारानुसार आपली दोन मुले दारा शिकोह आणि औरंगजेब, असिरगड किल्ला व 10 लाख रुपये मुघल  शासनाला द्यावे लागले. 1627 मधील जहांगीरच्या मृत्यूनंतर परिस्थिती शहाजहानला अनुकूल झाली व अखेर तो भारताचा मुगल सम्राट बनला.

असीरगडावरील औरंगजेबकालीन शिलालेखानुसार1658-59 मध्ये औरंगजेबाने आपले वडील शहाजहान यांच्या विरोधात विद्रोह पुकारून सत्ता आपल्या ताब्यात घेतली व औरंगजेब सम्राट बनला. या वेळी  औरंगजेबाने असीरगडावर सेनापती म्हणून अहमद नजम सानी याला नियुक्त केले होते.

मोगलांच्या पतनानंतर निजाम, पेशवे, शिंदे,  होळकर यांनी या किल्ल्यावर राज्य केले असे मानले जाते. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला.


महादेव मंदिर - गडाच्या पश्चिम बाजूला एक पुरातन शिव मंदिर आहे. असे मानले जाते की महाभारतातील गुरु द्रोणाचार्यचा मुलगा अश्वथामा  येथील मंदिरात रोज पुजा करायला येतो असे मानतात.  आता दिसत असलेल्या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात मराठ्यांच्या काळात झाली. मंदिराजवळ एक मोठी प्राचीन बावडी (विहीर) आहे. तिथे दगडांमध्ये काही खोल्या व मार्ग बनवण्यात आले आहेत. 

ब्रिटिश छावणी - किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम भागात ब्रिटिशांची छावणी होती. त्याकाळातील अनेक भवन, तळघर व कब्रस्थान तेथे आहेत. इंग्रजांनी पकडलेल्या कैद्यांना या ठिकाणी ठेवले जात होते. तत्कालीन किल्ला दुर्गम भागात असल्याने कैद्यांना पळून जाणे शक्य नसायचे. 

इतकेच नाही तर कुका चळवळीतील अनेक विद्रोहींना या किल्ल्यावर 1872 मध्ये  कैदेत ठेवण्यात आले होते. तिथे झालेल्या यातणांमुळे दोन क्रांतिकारी रूर सिंह व पहाड सिंह यांचा मृत्यू याच ठिकाणी झाला. तर मुलूक सिंह नावच्या क्रांतिकारीला शिक्षा पूर्ण झाल्यावर 1886 मध्ये  पंजाबमध्ये पाठवून दिले. 

हुतात्मा वीर सुरेंद्र सहाय-  ओरिसा राजघराण्यातील सदस्य वीर सुरेन्द्र सहाय्य व त्यांच्या साथीदारांना 1827 मध्ये इंग्रजांविरुद्ध केलेल्या बंडाबद्दल व 1857 च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल 1818 च्या कायद्यातील कलम 3 नुसार झालेल्या शिक्षेत असिरगड किल्ल्यावर बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. 28 फेब्रुवारी1884 रोजी याच किल्ल्यावर त्यांचे निधन झाले. त्यांच्या सोबत च्या पाच लोकांचा मृत्यू देखील इथेच झाला. 1जानेवारी 1877 रोजी ब्रिटिश ची महाराणी ला भारताचे महाराणी घोषित केल्यानंतर  धुरव व मित्र भानू या दोघा जणांना सोडण्यात आले होते. 1904 ला जनरल डफटन याने या किल्ल्याचे रुपांतर इंग्रज छावणीमध्ये केले.  


पाण्याची व्यवस्था - असीरगड किल्ल्यावर एक मामा भांजा तलाव आहे. यात एक चौकोनी कुंड व एक विहीर आहे.  पावसाचे पानी साठवून ते नंतर वापरण्यासाठी याचा उपयोग होत असे. किल्ल्यावर पाण्याची उत्तम व्यवस्था होती. इथे गंगा -जमुना व बदाम कुंड हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. त्याशिवाय इथे 6 तलाव व 14 विहीरि आहेत. राणी तलाव तसेच महादेव मंदीराजवळ असणारी बावडी हे पाण्याचे आजून काही स्रोत आहेत. किल्ल्याच्या खालच्या भागात एक मोठा तलाव आहे ज्यात किल्ल्यावरून वाहणारे पानी साठवून ठेवले जाई. 


*****

किल्ल्याचे हे सर्व भाग पाहण्यासारखे आहेत. प्रवेशद्वार, तटबंदी, मजीद व महादेव मंदिर या वास्तू बऱ्यापैकी टिकून आहेत. तलाव आहेत. पण ब्रिटिशांची वास्तू पूर्ण धसलेल्या अवस्थेत आहे. अजूनही किल्ल्याची भव्यता व विस्तार किती मोठा आहे हे जाणवते. जर किल्ल्यावर व्यवस्थापन डागडुजी योग्य प्रमाणात केली तर अजूनही किल्ल्याचे सौंदर्य ऊठून दिसेल. 

यानंतर आम्ही बऱ्हाणपूर गावातील बोहरा समाजाच्या प्रार्थना मंदिराकडे गेलो. पूर्ण संगमरवरात तयार केलेल्या पाच समाध्या अत्यंत आकर्षक आहे. पूर्ण परिसर प्रसन्न आहे. 

ते पाहून झाल्यावर आम्ही कुंडी भंडारा पाहण्यासाठी गेलो कुंडी भंडारा हे बराहणपुर मधील अत्यंत महत्त्वाचे व प्रसिद्ध असे ठिकाण आहे. नुकतीच आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली की युनेस्को हेरिटेज साईट मध्ये कुंडी भंडारा नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काय आहे हे कुंडी भंडारा - 



कुंडी भंडारा – सम्राट जहांगीर चा सुभेदार अब्दुल रहीम खान – ए –खान याने 1615 मध्ये या पानी पुरवठा करणार्‍या पद्धतीची निर्मिती केली.  त्या काळात अशी पद्धत  जगात फक्त इराक-इराण मध्ये अस्तीत्वात होती. तेथूनच या पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. सातपुडा पर्वत आणि तापी नदी यांच्या मध्ये वसलेल्या बरहाणपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी त्याने ही योजना कार्यान्वित केली

होती.  त्यासाठी सातपुडा पर्वतापरिसरात असलेल्या  भूमिगत जलस्रोतांचा शोध लावून पाण्याचा प्रवाह तापी नदीकडे जाण्यासाठी त्याने या जलस्रोतांना तीन ठिकाणी थांबवून त्यांना एक भूमिगत कालव्याने जोडून शहर व राजवाड्याकडे नेले होते.  कुंडी भंडारा ते किल्ल्या पर्यन्त जाण्यासाठी जवळपास 100 कुंड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व कुंड्या एका कालव्याद्वारे जोडण्यात आल्याआहेत. या विहीरींची खोली जवळपास 80 फुट आहे. पाणी पुरवठा करण्याची जगातील ही एकमेवद्वितीय पद्धत आहे. ज्यामुळे अगदी अंतरराष्ट्रीय पर्यटक देखील याकडे आकर्षिले जातात. यातील 83 नंबरची कुंडी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहे व ती रेल्वेने चांगली जतन करून ठेवली आहे. 

जे तीन जलाशय निर्माण करण्यात आले त्यांचे नाव होते 1)मूल भंडारा 2) सुखा भंडारा 3) चिंताहरण हे तिन्ही जलाशय शहरापासून दूर उत्तर पश्चिम दिशेला आहेत. त्यांची ऊंची शहरपेक्षा 100 फुट जास्तीची ठेवण्यात आली होती. जमिनीखाली वाहत असलेल्या त्या कालव्यावर ठिकठिकाणी हवा व प्रकाश येण्यासाठी कुंड्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्यांचे तोंड उघडे ठेवण्यात आले होते जेणेकरून आत हवा जाईल. कुंडीला वरच्या बाजूला बुरूजासारखा आकार देण्यात आला होता. त्यालाच कुंडी भंडारा असे नाव देण्यात आले होते. कुठल्याही मशीन वा यंत्राचा वापर न करता पानी पूर्ण शहरभर पुरवले जात असे. 

तिथे असणारे एमपीटीडीसी चे लोक सांगत होते की तीस चाळीस वर्षांपू्वी पर्यंत यातून पाणी पुरवठा होत होता. कालांतराने अतिक्रमणे वाढली काही कुंड्या रहिवाशी घराजवळ असल्याने त्यांची पाहिजे ती देखभाल झालेली नाही तरी देखील पर्यटन मंडळाने अनेक कुंड्या सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

मुख्य व पहिल्या कुंडिजवळ एक लिफ्ट आहे त्याद्वारे खाली उतरता येते व आत जाऊन कालवा तील जाणारे पाणी बघता येते. जमिनीत खोलवर जिथे तो कालवा आहे तिथे लिफ्ट ने  एकावेळी चार पाच लोकांना जातव्येते  मात्र सध्या लिफ्ट नादुरुस्त असून लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू आहे. 


पूर्ण बऱ्हाणपूर शहराला असलेली तटबंदी आजही अस्तित्वात आहे.  पूर्ण शहर हे या तटबंदीच्या मध्ये वसलेलं होतं.  शहरामध्ये आजही आपल्याला जुन्या काळातील अनेक दरवाजे बघायला मिळतात.  या तटबंदीच्या आत जुने बरहाणपुर शहर हे वसलेल आहे.  त्याच्यातून पुढे गेल्यानंतर आपल्याला तापी नदीच्या किनारी शाही महल बघायला मिळतो. अकबर ते aurngajeb सर्व मुघल सम्राट कधी ना कधी या ठिकाणी राहिलेले आहेत. मध्यप्रदेशच्या पर्यटन महामंडळाने हा किल्ला  व्यवस्थित ठेवलेला आहे. 


शाही महल(fort) -  तापी नदीच्या किनारी 80 फुट उंचावर  स्थित आहे. याची निर्मिती आदिल खान द्वितीय (1457 ते 1503) ने केली. या ठिकाणी सात मजली विशाल इमारत होती. त्यातील काहीच मजले आता शिल्लक आहेत. विटांनी तयार केलेले विशाल प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे जेथून तापी नदीचे दर्शन होते.

नदीच्या पलीकडे मुमताज महल ची कबर आहे. आग्रा येथे ताजमहाल बांधून पूर्ण होईपर्यंत तिचे शव येथेच ठेवण्यात आले होते नंतर ते काढून ताजमहाल येथे नेण्यात आले असे म्हणतात.  मुघल काळातील वैशिष्टय बनलेली चौरस बाग याही ठिकाणी आहे. आता शिल्लक असलेल्या प्रचंड मोठ्या अवशेषांवरून  लक्षात येते की त्या काळी या किल्ल्याला किती प्रचंड महत्त्व होत. 



मिर्झा राजे जयसिंग यांची समाधी - राजस्थानची स्थापत्य कला व मुघलकालीन शिल्प असणारी मिर्झा राजे जयसिंग यांची समाधी बरहानपुर गावपासुन साधारण 10-11 किलोमीटर दूर आहे. इथे या समाधीला छत्री असेही संबोधले जाते. हे स्थळ मोहना व तापी नदीच्या किनारी आहे. 32 खांबाची ही छत्री आहे ज्यावर चार मोठे व चार छोटे घुमट आहेत. या स्थळापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता माहिती करून  घेऊन जावा लागतो.  


एकूणच बऱ्हाणपूर व असिरगड ही भारताची एक वैभवशाली परंपरा व समृद्ध इतिहास आहे. हा वारसा जपला पाहिजे व किमान भेट तरी दिली पाहिजे. 

- समाधान महाजन