नोव्हेंबर २०१६ च्या आसपास गिरीश कर्नाड यांचे खेळता खेळता आयुष्य हे पुस्तक वाचण्यात आले आणि मी खुप प्रभावित झालो. त्याच वेळी त्या पुस्तकाबाबत फेसबुकवर एक छोटी पोस्ट देखिल मी लिहिली होती. खुप गोष्टी त्यांच्या आयुष्यातील व करीअर मधील माहिती नव्हत्या त्या या पुस्तकामुळ समजल्या. त्याचप्रमाने एखादी व्यक्ति एकाच आयुष्यात किती जीवन जगुन घेते हे कर्नाड सरांकडे पाहून कळले. साहित्य अकादमी,संगीत अकादमी,ज्ञानपीठला गवसणी घालन्यासह अनेक नाटक व चित्रपट यात आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या या व्यक्तीचं आयुष्य कळण्यास या पुस्तकाने मोठी मदत केली.
२०१२ मध्ये आलेल्या व सब कुछ सलमान असलेल्या "एक था टायगर" मधील त्यांची भूमिका ही सुखद धक्का देणारी होती. कदाचित त्या वेळी त्या चित्रपटात कोण कोण आहे याबाबत फार माहिती नसतांना तो पहायला मित्रासोबत गेलो होतो आणि समोर एकदम गिरीश कर्नाडांकड़े पाहून उडालोच, त्याला म्हटले, 'अरे हां माणूस इकडे कस काय बुवा?' पण एकुणच त्यांनी तितक्याच ताकदीने ती छोटी भूमिका निभावली होती.
पुढे २०१७ ला आलेल्या 'टायगर जिंदा है' मध्ये मात्र त्यांची ती नाकात असलेली नळी बिलकुलच आवडली नव्हती. भूमिकेची गरज असती तरी काही वेळाने ती काढता आली असती. पण हे असे नळीसह अभिनय करतांना त्यांना पाहण नक्कीच सुखद नव्ह्त. पुढे एका मित्राने अंदाज केला होता की, कदाचित ते स्वत आजारी असतील व् त्यामुळ देखील डॉक्टरांनी त्यांना तसेच अभिनय करण्यास सांगितले असावे. ते खरेही असू शकते.
मला गिरीश कर्नाडांना फार जवळून ऐकायला व पाहायला मिळाले ते नाशिकला. त्या वर्षाचा जनस्थान पुरस्कार स्विकारताना त्यांनी केलेले भाषण आजदेखील आठवते. मराठी हिंदी इंग्रजी बोलत बोलत व मध्येच मातृभाषा कन्नड़ चे एखादे वाक्य फेकत चिंतनाचा व अभ्यासाचा भक्कम पाया असलेल्या त्यांच्या अत्यन्त सखोल भाषनाचे शब्द बरेच दिवस कानात तसेच ऐकू येत होते.
त्याही आधी भूमिका चित्रपट पाहत असतांना जेव्हा कळल की याची पटकथा कर्नाडाची आहे तेव्हा हे काहीतरी वेगळे आहे असे लक्षात आले होते. पुढे निशांत, मंथन व उंबरठा मध्ये असलेल्या त्यांच्या भूमिका आवडल्या होत्या.
उंबरठा मधील स्मिता पाटिल च्या पतीच्या भूमिकेत ते ठळक पणे मनावर उमटूण गेले ते आजतागायत. त्यामुळे नंतर कधी हा चित्रपट पाहण्याचा योग आला कि, स्मिताचा संघर्ष, धावपळ व मानसिक तगमग समजून घेता घेता तिचा नवरा म्हणून गिरीशच्या प्रतिक्रियेकडे पाहणे तितकेच महत्वाचे वाटायला लागले. अभिनेता ते ज्ञानपीठकार अस विविधांगी व तितकंच सखोल आयुष्य जगलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रदांजली.

मोजक्या शब्दात कर्नाड सरांचे आयुष्य सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
ReplyDeletethanx sir
ReplyDelete