शाहरुख चा बहुचर्चित रइस पाहिला, अन होत्या नव्हत्या त्या अपेक्षा पण धुळीस मिळवल्या गेल्याच याची देही याची डोळा पहाव लागल. मुळात आपली ताकद ओळखून त्यात सर्वोच्च स्थान गाठन हा अभिनेत्याचा प्रवास असावा लागतो.तो तसा असावा अस त्याच्या चाहत्यांना देखील वाटत असत.शाहरुखच्या बाबतीत अस होतांना दिसत नाही.
मुळात नव्वदच्या दशकात देशातील आर्थिक,राजकीय व जवळपास एकूणच जबरदस्त स्थित्यंतर जगभर सुरु असतांना चित्रपटसृष्टी त्याला अपवाद नसावी. तत्कालीन अमिताभ चा पडता काळ, खान बंधुपैक्की अजून उर्वरित दोन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे वेगवेगळ्या भूमिका साकारत असतांना व त्यातही आपल काही वेगळ देण्याच्या प्रयत्नात असतांना फौजी व सर्कस च्या दूरदर्शन सीरिअल च्या माध्यमातून स्वतःला सिध्द करत असतांना शाहरुख दिवाना चित्रपटातून भारतीय सिनेमात एक पाउल टाकतो व अवघ्या काही वर्षातच तरुनाईच्या गळ्यातील ताईत बनतो, त्यातही कुटुंबातून कुठलीही चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमी नसतांना हे कौतुकास्पद होत.
जागतिकीकरण भारताने स्वीकारल्यानंतरच्या लगतच्याच वर्षात दिवाना,बाजीगर,डर,अंजाम यासारखे एक पाठोपाठ एक चित्रपट तरुणांनी डोक्यावर घेतले त्यात बदलत गेलेली एकूणच सर्व परीस्थिती कारणीभूत असावी.
१९७५ हे वर्ष आणीबाणी व भारतातील एकूणच असंतोष पूर्ण स्थितीतील वातावरनात angree yong man अमिताभ चा दिवार मधील उदय हा योगायोग निश्चितच नव्हता.तत्कालीन तरुणांची चीड संताप हा सलीम जावेदच्या वाक्यातून व अमिताभच्या अभिनयातून बाहेर येत होता व नव्या नायकाची सुरुवात होत होती.
१९९१ नंतरच्या अस्थिर काळात अशीच काहीशी आठवण क..क..क..किरण करत नायिकेच्या मागे “तू हा कर या ना कर ...तू है मेरी किरण” म्हणत प्रेमाने जबरदस्त पछाडलेला नायक म्हणून शाहरुख खान कडे बघतांना होते. जो पुढे अंजाम मध्ये हि कायम होता..
एक पूर्ण एनर्जीटिक व्यक्तिमत्व, सळसळता उत्साह, हातांच्या मनगटापासून तर मानेपर्यंत ताईट झालेल्या नसा, डोळ्यात भडकलेली आग, उच्चारातून व देहबोलीतून जाणवनारी प्रचंड महत्वकांक्षा, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही भयानक मार्गाचा वापर करण्याइतका बिनधास्तपणा व त्याच मोहक डोळ्यांनी प्रियसिला घातलेली साद व प्रेम करण्याचा आपला स्वतंत्र अंदाज हि ताकद घेऊन तो पुढील अनेक चित्रपटातून सक्सेस होत गेला.
त्याच्या कारकीर्दीच तिसर दशक तो अशा पद्धतीने निभावत नेत असतांनाच त्याच्या सोबतच्या दोन खान बंधूंनी आपआपला मार्ग काळाप्रमाणे बदलण्यास सुरुवात केली होती. चोकलेट बॉय आमिरखान आपल्या गुडीगुडी भूमिका सोडून अधिकच चोखंदळ भूमिका स्वीकारत स्वतःमध्ये अधिकच पूर्णत्व आणण्याच्या प्रयत्नात होता तर सलमान खान आपली बिनधास्त शैली कायम ठेवत wanted, दबंग,सारख्या स्वतःच्या रफटफ व्यक्तित्वाला साजेशा व लोकांच्या पसंतीस उतरणारे चित्रपट करत असतांना शाहरुख मात्र या काळात चाचपडत असतानाचे दृश्य दिसत आहे. यावर्षीचा सलमानचा सुलतान व आमिरचा दंगल त्या दोघांनी आपापले वय, एनर्जी, व क्षमता कामाला लाऊन क्लास व मास प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे दिसत असतांनाच
आपला romantik पना वयाला शोभणार नाही हे समजून तेही न करणारा, हाणामारीच्या प्रसंगातही पूर्वीइतकी एनर्जी नसलेला, पूर्वीचा सळसळता उत्साह हरवलेला शाहरुख रइस मध्ये भलताच केविलवाणा दिसतोय. मुळात रइस पाहतांना once upon time in Mumbai सारख्या सश्क्त चित्रपटाची वारंवार आठवण येते हे रइसच्या पटकथेचे अपयश आहे. gangstar, टोळीयुद्ध, एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचा सत्तासंगर्ष हा आजवर अनेक चित्रपटातून मुंबईच्या पार्श्वभूमीवर दाखवलेला असतांना यात गुजरातचा प्लॉट निवडल्याने वेगळे काहीतरी दाखवण्याची संधी दिग्दर्शकाने चुकवली आहे. ज्या नवाजुद्दिन सिद्दिकीला सलमान ने त्याच्या किक व बजरंगी भाईजान मध्ये वापरून त्यालाही एक वेगळ्या भूमिकेला उंचीवर नेण्याची संधी दिली त्याच नवाजुद्दींनची भूमिका सुरुवातीला ताकदीची दाखऊन नंतर फक्त फरफटत नेण्याचा दिग्दर्शकीय मूर्खपणा अनाकलनीय आहे.
रइसच्याच सोबत प्रदर्शित झालेल्या कबिल ने मात्र फार अपेक्षा नसतांना चांगलाच धक्का दिला आहे. प्रमोज बघून सुरुवातीला black किंवा तत्सम अपंग व्यक्तींवरील मनाला हात घालून डोळ्यातून पाणी काढणारा तद्दन मसाला चित्रपट असावा अस वाटत असतांनाच मनासोबत डोक्यालाही चांगल समाधान देणारा हा चित्रपट वाटतो.एकीकडे केव्हाही संपला तरी चालेल असा रइस व एकीकडे संपूच नये अस वाटत असणारा कबिल. संपूर्ण चित्रपटात कसलीही उत्सुकता वाटत नसणारा रइस व उत्कनटा कायम ठेवणारा काबील या लढाईत प्रेक्षकांनी काही दिवसातच कबिल ला पसंती दिल्याचे दिसत आहे.
एकूणच शाहरुख ने काळाची पावले ओळखणे आवश्यक आहे.