कोबाड गांधी यांच्या जीवनावर काही चित्रपटात भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. प्रकाश झा यांच्या चक्रव्यूह मधील ओम पुरीची भूमिका. मणीरत्नम यांच्या रावण मधील अभिषेक बच्चनची भूमिका तसेच रेड अलर्ट चित्रपटात विनोद खन्ना याने केलेली भूमिका.
१७ सप्टेंबर २००९ रोजी कोबाड गांधी यांना UAPA खाली अटक करण्यात आली होती. नक्षलवादी आणि अतिरेकी कारवायांच्या संदर्भात त्यांच्यावर जे आरोप होते, त्यातून त्यांची सुटका करण्यात आली आहे. दहा वर्ष व एक महिना तुरुंगात राहून कोबाड गांधी यांची १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सुटका झाली. या काळात भारतातील वेगवेगळ्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. त्यातील अनुभव व एकूण त्यांचे अभ्यासू चिंतन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. जे बोजड भाषेत नाही तर सोप्या भाषेत आहे. या पुस्तकात त्यांनी खर तर नक्षलवादावर टीका केलेली आहे.
मला काय वाटल .... हे पुस्तक वाचतांना
आपण विदेशातील लंडन, स्विस, न्यूयॉर्क, आदी देश व शहरांना पाहतो चित्रपटात. पडद्यावर. ते आपल्याला जाणवते पण जेव्हा आपण प्रत्यक्ष जर बघू तर ते फिलिंग वेगळे असेल. तसे काहीसे हे पुस्तक वाचतांना मला काही ठिकाणी जाणवले. विशेषतः आपण प्रकाश झा किंवा रामगोपाल वर्मा किंवा अनुराग कश्यप च्या चित्रपटात आपण उत्तरेतील बाहुबली नेते. गुन्हेगार व राजकारणी व जेल यांच्यातील पुसट झालेली सीमारेषा पाहतो. तेव्हा तिकडे असेच काहीसे असेल अशी आपली एक प्रतिमा मनात तयार झालेली असते.
पण कोबाड गांधी या सर्व लोकांमध्ये जेलमध्ये राहिलेत. तिहार पासून तामिळनाडू, सुरत आदी विविध ठिकाणच्या जेल मधील जीवन त्यांनी जवळून पाहिले. उत्तरेतील बाहुबली नेते, गुंड, समांतर व्यवस्था हि प्रत्यक्षात कसे काम करते ते त्यांनी अनुभवले. गरिबाला बाहेर त्रास आहेच पण जेल मध्ये देखील भेदभाव आहे. साध्या मुलभूत बाबी मिळवण्यासाठी देखील पैसे लागतात किंवा अनेक दिवस वाट पहावी लागते. कदाचित पाहिजे असलेली वस्तू मिळेपर्यंत सबंधित कैदीचा जीव जाईल किंवा त्याची सुटका होईल किवा त्याची बदली होईल दुसऱ्या जेल मध्ये. यावर गांधी यांनी सविस्तर लिहिले आहे.
या पुस्तकातील त्यांची काही मते उल्लेखनीय वाटतात.
जसे-
चक्रधर स्वामी व भक्ती परंपरा ते फुले शाहू आंबेडकर पेरियार या सर्वांनी जातीयता संपवण्याचा त्या त्या काळात प्रयत्न केला. पण आजच्या भारतात हि परंपरा गायब झाल्याचे मत गांधी एका ठिकाणी नोंदवितात आणि ते खरेच आहे.
कम्युनिस्ट चळवळ देखील कुंठीतअवस्थेत आलीआहे. पुढे तिला रस्ता सापडत नाहीय.
पंचतंत्र सारख्या गोष्टी मुलांना सांगितल्या तर त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्याची ताकद या कथांमध्ये आहे. सहाव्या शतकातील जातक कथा देखील अशाच आहेत. आपल्या सांस्कृतिक इतिहासात इतक्या चांगल्या रचना असतांना आपल्या देशात आणि काम्युनिस्टामध्ये देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
ते एका ठिकाणी म्हणतात, तुरुंगाच्या आत एक विश्व असते त्या विश्वात एकच देव असतो आणि तो म्हणजे पैसा. पैसा हि एक अशी शक्ती आहे जी सर्व प्रकारच्या स्वतान्र्याचा विध्वंस करते. अर्थात यावर त्यांनी सविस्तर लिहिलेले वाचले तरच खरा अर्थ त्यातून लक्षात येईल.
कोबाड गांधी यांचे शिक्षण मुंबई आणि देहरादून च्या डून स्कूल मध्ये झालेले आहे. मुंबई ला रसायनशास्त्रमधील पदवी घेतल्यानंतर सीए होण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. तेथील वर्णद्वेष बघून ते डावीकडे झुकले. तेथील चळवळीत शामिल झाल्यामुळे तीन महिने लंडनच्या तुरुंगात त्यांना काढावे लागले. सी ए करणे सोडून १९७२ मध्ये भारतात येऊन इथल्या शोषित समूहांमध्ये काम करण्याचे त्यांनी ठरवले. १९८२ पासून २००२ पर्यंत ते नागपूर येथे होते.

No comments:
Post a Comment