वेब सिरीजचे विश्व अफाट विस्तारलय... एका मित्राने दोन तीन वर्षांपूर्वी ठरवले होते की जे जे OTT वर येईल ते ते पाहावे... तो हरला...नाही शक्य झाले... या सर्व फिल्म्स सिरीजची लांबी मानवी कक्षेच्या पलीकडे विस्तारली गेलीय...
सो फायनली उपाय काय...
Selective... recommended बघणे...त्यातही जॉनर..चॉईस वेगवेगळ्या....मग माऊथ पब्लिसिटी...गप्पा...पोस्ट्स..लिंक...थ्रेड..असे कुठून तरी धागे उपलब्ध होतात... हजारो ख्वाईशे ऐसी...सारखे खंडीभर सिरीज मधून नेमका कोणाला वेळ द्यावा याचे selection केले जाते....
अशीच काहींनी रेकमेंड केलेली मेड इन हेवन होती. मला त्या विषयी समजल तेव्हा तिचा दुसरा सिझन आलेला होता म्हणजे झक मारून पहिला पाहण्याची गरज होती...
शक्यतो मला वाटल कंटेंट चांगला असेल तर आधी मी कोणतेच स्पॉइलर, आर्टिकल वाचत नाही.. आधी बघतो मग वाचतो.... ते बरं असत.
मेड इन हेवनचा ट्रेलर पहिला तेव्हा वाटल हे आपल जग नाही...उगाच का डोक्याला त्रास करून घ्यायचा...पण ते तस नव्हत...
क्लास कोणताही असो, मनुष्य मात्र सर्व भाव भावनांसह तसाच असतो. आदिम प्रेरणा घेऊन जगणारा...क्लास नुसार बदलत काय....अंगावरचे कपडे...बोलण्याची भाषा... खान पान...राहण्याच्या जागा...गाड्या...मित्र मैत्रिणी.... सर्कमफरंस पण बाकी मानवी मनाला लागू असणारे गुण अवगुण तेच असतात.
मेड इन हेवन मध्ये तेच आहे ...
हे नाव आहे एका लग्न अरेंज करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे ..
त्यातील तारा, करण..झाज.. सारखे character...त्यांचे स्वतःचे पर्सनल जीवन व ते जे लग्न अरेंज करतात त्यांच्या जीवनातील काही क्षण अशी एक मल्टी डायमेंशनल मल्टी कलर स्क्रिप्ट असलेली सिरीज आहे...तिचा अजून पुढचा भाग देखील येऊ शकतो...
या सेकंड सिझन मधील राधिका आपटेने साकारलेली भूमिका..जर फेरेच होत असतील तर त्यासोबत बुद्धीस्ट पद्धतीच्या लग्नाची तिने आग्रहाने केलेली मागणी...आडनाव व जात तसेच समता व संधीची समानता या अशा viral झालेल्या काही सिनमुळे अनेकांना माहिती नसलेली ही सिरीज बाऊन्स बॅक होऊन फर्स्ट सिझन पासून काहींनी पाहण्यास सुरुवात केली...
पण आधी म्हटले तसे या सिरीजला अनेक कंगोरे आहेत... सर्वात महत्वाचे म्हणजे जगात इतके बदल होऊनही टिकून राहिलेली विवाह संस्था व त्यातील पुरुष प्रधान पद्धतीचे वर्चस्व....यातील अनेक भागांमध्ये याची पद्धतशीर चिरफाड केलेली आहे ..अती श्रीमंत असो वा गरीब ...patriotric पद्धतीच्या आड किंवा त्याचा फायदा घेत स्री ला दुय्यम ठरवण्याचे हक्क नाकारण्याचा प्रकार सर्वच क्लास मध्ये असतो. म्हणून ते एका ठिकाणी म्हणतात...Whether princes or pauper
Every women has to turn worrier in order to survive....
पण म्हणून नेमकी अशीच एक साईड न दाखवता... तारा सारखी मह्त्वाकांक्षी स्री याच व्यवस्थेच्या पायऱ्यांचा वापर करत स्वतः साठीच विश्व तयार करण्याच्या मागे असते...
आदिल... तारा.. कल्की कोचलीन हा traingle पुन्हा मानवी भावना...त्यांचा सोयीनुसार वापर...स्वार्थ...पैसा ..शरीर..या चक्रव्यूहातून फिरत राहतो...
शरीर आणि मनाच्या आत बाहेर कुठे तरी प्रेम असते....नक्की असते का...बदलत जाते का....ते पर्मनंट नसते का...
एकाच वेळी प्रेम सेक्स पण पाहिजे attachment pan पाहिजे आणि पैसे पण पाहिजे....they failed many time to complet and fulfil it...but again they run behind it... हे unended आहे.
But there is always space for true love... unconditional.... otherwise सर्व मिळून व सर्व असूनही हे लोक unsatisfied नसते.
इथे प्रत्येक जण स्वतः चा फायदा पाहतो. इथे उभे आडवे आदिम दुःख पसरलेले आहे... हसऱ्या चेहऱ्यानमागे ... ते संपत नाही कोणत्याही रुपात. हाडा मांसाचा माणूस किती विविध रूपात जगतो...
समाजाचे जुने थ्रेडस अजूनही जात नाहीत. जात, लग्न, पुरुषी अहंकार..अजून खूप काही अंडर करंट आहेत...
यात मुस्लिम, खन्ना, बौद्ध, जोहरी, राजघराणे व फिल्म इंडस्ट्रीपासून तर चाळी पर्यंत सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या संबंधांचा आयाम दाखवला आहे..
LGBT, transgender यांचे मुद्दे दाखवताना सबंधित सीन वारंवार दाखवण्याची गरज नव्हती..पण अलीकडे दिग्दर्शकांना याशिवाय वेब सिरीज चालणार नाहीत की काय याची धास्ती वाटते की काय असे वाटते....
त्यामुळे सिरीज ची चर्चा वेगळ्या. पद्धतीने होते...अर्थात हाही मार्केटिंग चा फंडा असावा...
असो other than it मेन कंटेंट चांगलाच आहे...
त्यात एका ठिकाणी म्हटलंय..
I don't believe marriage are made in heaven
But there are some bride's and grooms hand picked for each other.
Their roamance will go down as legendry
Epic love stories that we mesmeriz forever...
It doesn't matter that it true or not...it's ideal the world needs...
may be they exist so
we can strive for better...
so that we can hope for our dream comes true..
Maybe they exist so that
we don't stop believing in love..
- समाधान महाजन
.jpeg)
No comments:
Post a Comment