त्या लहान मुलीवर लिहिण्याचे पुन्हा एकदा राहून गेले. तिचे फोटो बघितले की तिचे करपून गेलेले बालपण मनाला वेदना देते. तिच्या निरागस आयुष्याने काय पाप केले.? तिला कळत तरी असेल का की तिच्या पुढे उगवणारा दिवस नॉर्मल नाही. किंबहुना नॉर्मल मम्मी व पप्पा यांच्या सोबत हसता-खेळता दिवस पण असतो हे तिला माहीतच नाही. ती खूप एकसूरी, संथ व रटाळ आयुष्य जगतेय. तिचे बालपण अकाली प्रौढ झालेय आणि तिला ते अगदीच माहीतही नाही हे भयंकर आहे आणि हे त्याहून भयंकर आहे की तिच्या आजूबाजूच्यांना त्याचे काहीही वाटत नाही. एकाच छताखाली राहून पराकोटीचा द्वेष कसं काय करू शकतात लोक?
तिच्या डोळ्यात पाहिले की मला तिच्या आईचे डोळे आठवतात. तो राग, तो दाह, तो करपलेला संसार व फक्त चार भिंतीत राहतेय म्हणून घर म्हणनारी, सकाळ पासून रात्री पर्यंत अखा दिवस एकटीच ओढत नेणारी व तरीही मनात संघर्षाची धुगधुगी ठेऊन परिस्थितिवर मात करण्याची इच्छा आत ठेऊन मनाला एका दिवसातून अनेकदा समजूत घालणारी. इतकी एकाकी की माणसांनी गच्च भरलेल्या या जगात तिचे दोन शब्द कोणी ऐकणारे पण नाही.
त्या छोट्या मुलीचा चेहरा अगदी सेम तिच्यासारखा. बाहुली घेऊन असलेला तिचा फोटो पाहिला तेव्हा वाटल, आईच्या मनातील दुखा:च्या लोट तीच्या इवल्याशा डोळ्यातून वाहत जातील की काय इतके बोलके ....... नको असले बोलके डोळे
A Casino With Roulette in New Jersey - DrMCD
ReplyDeleteA Casino With 성남 출장샵 Roulette 동두천 출장샵 in New Jersey. 당진 출장샵 DrMcd's casino 천안 출장마사지 has you covered with everything you need to know about online slots, table 속초 출장샵 games, and the best