सुरुवातीचे काही दिवस आपला नम्बर आला कि काही मुले absent राहत व परत चाळीस दिवसांनी त्यातही मध्ये सुट्ट्या आल्या कि जवळपास दीड दोन महिन्यानीं परत नम्बर यायचा परत तसेच करायचे. पण कालांतराने पाटील मॅडमच्या लक्षात हि गोष्ट आल्याने नम्बर आलेल्या दिवशी absent असलं तर त्या मुलाने दुसऱ्या दिवशी ते काम करायचे असा फतवाच काढला. त्यामुळे आता या प्रकारातून सुटका होणे दुरापास्तच होते. आता तर परमेश्वर पण वाचवू शकत नव्हता. एकच व्यक्ती वाचवू शकत होती खुद पाटील मॅडम.... पण तिथे जाऊन याचना करणे हा प्रकार माझ्या स्वाभिमानी स्वभावात बिल्कूलच बसत नव्हता अस काही मी म्हणेल अस तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. प्रामाणिक पणे सांगायचे म्हणजे तिथे जाऊन काहीच उपयोग होणार नव्हता हे धडधडीत सत्य कळत असतांना मी असा महामूर्ख पणा का करावा.? हा खरा सवाल होता.
काय करायचे? , काय करायचे ?
काहीच कळत नव्हतं , स्टेज वर जाऊन उभे राहणे म्हणजे पार एव्हरेस्ट चा कळस तरी सोपा असेल ब्वॉ पण हे काय उगीच असा प्रश्न पडायचाच नाही तर चक्क दरदरून घाम फुटेस्तवर माझ्यापुढे उभा राहायचा.
आता मी हजारो लोकांच्या संख्येपुढे कितीही वेळ बोलू शकतो पण तेव्हा हि 80 संख्या खूप वाटायची. नवीन जागेत आल्यावर प्रार्थनेला उभे राहण्याचा प्रकार पण बदलला दोन्ही बॅचेस एकत्र करून एका बाजूला मुलं दुसऱ्या बाजूला मुली व मधल्या जागेवर शिक्षक मंडळी उभी राहत तिथे येऊन बोलावे लागत असे. हि जागा अक्षरशः मला battlefield वाटायची.
हि अशी युद्धभूमी वाटायची कि प्रार्थना संपल्यावर त्या जागेकडे सुद्धा मी बघायचो नाही जिथे उभे राहून स्पीच द्यावे लागते ( साल इतकी दहशत तर अमेरिकेला लादेनची पण वाटली नसेल, अर्थात यातून बाहेर यायला मी स्वतः वर प्रचंड मेहनत घेतलीय, एक अर्थाने ती साधना होती, तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. मी आधीच्या लेखात म्हटलं तस डी एड ला असलेला समाधान 180 डिग्रीत फिरून बदलला आहे. Point to be noted Milord😉)
तर सांगायचा मुद्दा असा कि हा स्टेज फोबिया इतका भयानक होता कि माझा नंबर जवळ यायला लागला कि, मला वाटायचं या पृथ्वीच्या पोटात मी गडप होऊन जावो, त्या दिवशी भूकंप पूर अस काहीतरी व्हावं व किमान प्रार्थना तरी टळावी. संस्थेत कोना तरी मोठया माणसाचा मृत्यू व्हावा मग कॉलेजला सुट्टी मिळावी. ( बघा ना माणूस किती भयानक असतो स्वतः वर वेळ आली कि कस काय काय भन्नाट सुचतं.... हस्ताय काय ? मी कबूल तरी करतोय😊)
मग एकदा जस जसा माझा दिवस जवळ येऊ लागला व यातून आता कोणत्याही परिस्थिती सुटका नाही अस कळू लागलं तस त्यापासून वाचण्याचे माझे प्रयत्न सुरु झाले. माझ्या डोक्यात एकच कि काहीही करायला सांगा बाबांनो पण हे स्टेज चे मॅटर मिटवा. आमची निमझिरी नाक्याकडे रूम होती. चौधरी सरांची पण रुम तिकडेच होती. संध्याकाळी जेवण करून परत जात असतांना योगायोगाने सर दिसले ... सरांना काय सांगावं हा हि प्रश्नच होता शब्द शोधत शोधत असच काहीतरी सुरु केलं,
एक खात्री होती, काहीही झालं तरी कमीत कमी सर ऐकून तरी घेतील. म्हणून मग काय वाटत होत ते सांगितलं , सरांनी अपेक्षेप्रमाणे ऐकून घेतलं, कदाचित समजवल असावं पण त्यांना एक म्हटलेलं आठवत कि, सर मला दुसर काहीही सांगा पण हे नका सांगू करायला . अर्थात तेही त्यात काय करणार होते म्हणा. हाही मार्ग बंद झाला. आमच्या रूम च्या पुढच्याच बाजूला सोनवणे मॅडम राहायच्या पण तिथे जाऊन त्यांना सांगण ये भी अपने बस कि बात नही थी. मॅडम स्वभावाने कडक वाटायच्या, हुशार तर त्या होत्याच. त्यामुळे एक तर सरळ त्यांनी कानावर हात ठेवले असते किंवा ते किती महत्वाचं असत हे तरी सांगितलं असत. पण ये बाळ या वेळी मी तुझा नम्बर कॅन्सल करते अस काही स्टेटमेंट त्यांच्याकडून expect करण चुकीचे होते.
मग आता शेवटचा आधार होता सूर्यवंशी मॅडमचा. त्या आमच्या मायक्रो ग्रुपच्या हेड होत्या. मॅडम कडे पाहिले कि का कोण जाणे एकदम मावशी, मोठी बहीण , घरातील एखादी मायाळू स्त्री असते न तसा भास व्हायचा. त्यामुळे त्यांचे लेक्चर सुरु असल तरी फार ताण जाणवायचा नाही. का कोण जाणे मला वाटलं त्या काही उपाय सुचवतील किंवा मला वाचवतील. एक संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो व अत्यंत नाराज होऊन परत आलो ( या ठिकाणी कोणीही असते तरी असेच वागले असते, कारण नियम सर्वांना सारखा असतो. मी शिक्षक असतो व माझ्याकडे अस excuse मागायला कोणी आले असते तर मी पण दिले नसते, पण हे जे लिहिलंय ते तेव्हाच्या अनुभवावर व आकलनावरआधारित आहे).
काही वेळा झालेला अपमान, मानहानी , एखादा अपशब्द मनात घर करून जातो, तो प्रसंग ती आठवण माणूस विसरत नाही मग प्रतिशोध म्हणून माणूस स्वतः ला घडवू लागतो आकार द्यायला लागतो. व बाहेर पडू पाहतो समाजाने आखून दिलेल्या साच्यातून. त्या दिवशी तसेच झाले. मॅडम म्हटल्या ' मी तर तुला चांगला समजत होती, तू तर माटीखावऱ्या साप निघालास ' अर्थात त्या सहज म्हटल्या होत्या व त्यांच्या म्हणायचा अर्थ होता कि तुझ्या कडून भरपूर अपेक्षा असतांना त्या अपेक्षांना तू पुरा करत नाहीयेस इतकंच फक्त त्यांनी ते express करत असतांना Lehman language मध्ये केल्याने थोडं वेगळं वाटलं इतकंच.
पण तेव्हा ते फारच भयंकर वाटलं त्यानंतर अनेक दिवस माझे वाईट गेले. तुमच्या मनात ज्वालामुखी खदखदत असतांना त्याला बाहेर पडायला मार्ग सापडू नये हे अन्याय कारीच असते.
त्या काळात एक शिकलो कि तुम्हाला ज्ञान असणे व ते तुम्हाला योग्य वेळी लोकांपुढे मांडता येणे या दोन्ही वेगवेगळ्या कला आहेत. काही लोक तुटपुंज्या ज्ञानावर भयंकरच जोरदार प्रेझेंटेशन करतात इतकं जोरदार कि कधी कधी त्यांनी ज्यांच्याकडून ppt तयार करवून घेतली असते त्याला प्रश्न पडतो "मायला, हे केव्हा दिले मी याला!!"
अशा वेळी अंधारातील फुले दिसत नाहीत सर्वांच्या डोळ्यांना व वास येईपर्यंत वेळ आहे कोणाकडे. याच भावनेवर लिहिलेली माझ्या 'अस्वस्थ क्षणांचे पाश' या काव्यसंग्रहातील 'गाभारा' नावाची कविता या ठिकाणी मला आठवते.
गाभारा
गाभाऱ्याचा तळ
वर्तमानाच्या पावलागणिक
डोक्यावर उचललेला
आता एकाच वेळी पडणार आहेत फुले अन
धारदार पात्यांचे घाव.
फुले गडप होतील गाभाऱ्याच्या खोल अंधारात
अन पाते न पाते लख लखून जाईल
आवराच्या लख लखत्या रोषणाईत.
त्या धारदार पात्यांचे आगमना अगोदरच्या
अस्तित्वाची चाहुलच अनामिक भयाने वेढलेली.
आतला अंधार फुला फुलांनी बहरलेला
गाभाऱ्यातील देवाची डोळे पात्यांच्या उजेडात दिपतील
अन अंधारातील फुले मात्र जागच्या जागी कण्हतील.
- समाधान महाजन

Good explanation with good sense of humour
ReplyDeleteThanx dear
Deleteखरंच म्हणतोय का सॅम !!
ReplyDeleteUnbelievable
Yes...its true.
Deleteआपलं नाव कळत नाहीय या मेल वरून सांगाल का प्लिज