एकटेपणा हवाहवासा वाटतो जेव्हा आपण गर्दीत कुटुंबात कार्यालयात अस कुठंतरी असतो. आपल्याला सारख वाटत राहत एकट असतो तर हे केले असते, ते केले असते , लिहिलं असत, वाचलं असत, अनेक अपूर्ण प्रकल्प आठवू लागतात व जितकं जास्त व्यस्त आपन होत जातो तितके जास्त एकांतपणाची ओढ वाढत जाते,
पण खरच एकांत मिळाल्यावर ठरवलेले सर्व होते का तर बिलकुल नाही, हा एकांत मारक पण ठरतो, तो धड काहीच करू देत नाही सर्व केओस तयार होतो डोक्यात मग मोबाईल व नेट हातात पडलं कि त्यात किती वेळ निघून जातो कळत नाही, मग परत माणूस स्वतःच मन खायला निघतो किती वेळ वाया गेला म्हणून .........एकांत हि फार भयानक दुधारी तलवार आहे तिचा छान व योग्य वापर करणाराच मनुष्य जीवनात यशस्वी होतो.
- समाधान महाजन
