रेल्वेमेन हि त्यातलीच एक सिरीज आहे. ‘रेल्वेमेन द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाल 1984’ या नावाने आलेली सिरीज अगदीच पाहण्यासारखी आहे. खूप अभ्यासपूर्ण व वास्तव अशी ती बनवलेली आहे. रेल्वेचा पसारा खूप मोठा आहे. भारतभर आहे. ब्रिटीशांची लीगेसी म्हणून हि सेवा आपल्याकडे राहिली आणि विस्तारत गेली. या रेल्वेच्या अनेक क्षमता आहेत. त्यावर फारसे लक्ष दिले जात नाहीत किंवा त्याला बाहेर तितके ग्लॅमर नाही. अदरवाईज अगदी कोरोना काळात देखील पार ऑक्सिजन सप्लाय पासून तर पेशंट ट्रान्स्फर पर्यंत अनेक बाबी रेल्वेला सोपवल्या असत्या तर बराच वेळ व जीव वाचवता आले असते.
तर असो, १९८४ ची भोपाळ वायू दुर्घटना सर्वांना माहिती होती. पण त्याचवेळी इंडिअन रेल्वे व रेल्वेमेनने केलेले कार्य मात्र जगाच्या समोर पहिल्यांदाच या सिरीज मधून बाहेर येत आहे. केके, आर.माधवन, जुही चावला, आपला तो संदीप भैया सहित सर्वांनी अगदी मनापसून काम केलेलं आहे.
