विद्यार्थ्यांशी संवाद

इथे सर्व क्लास मधील विद्यार्थी व त्यांचे पालक आहेत. त्यांच्याशी आज संवाद साधण्याची संधी मिळत आहे. खरे तर मी कधी अशा raw घटकाशी बोललेलो नाही. मी बोलतो पण आमचे जे विद्यार्थी mpsc upsc करत असतात त्यांच्याशी  जास्त बोलण्याची माझी सवय आहे. मी प्रथमच इतक्या लहान मुलांशी बोलत आहे. काय बोलावे हा प्रश्न होता माझ्यापुढे .. मग मी विचार केला कि जर मुले व त्यांचे पालक समोर असतील तर मी पालकाच्या भूमिकेतून बोलले पाहिजे.

आधी मी दहा वर्ष शिक्षक होतो... त्यामुळे मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास माझा भरपूर झाला आहे....  

तुम्हाला सांगतो आज ज्या काळात आपण जगत आहोत ना हा मानवी इतिहासातील सर्वात जास्त संक्रमणाचा बदलांचा विज्ञान तंत्रज्ञानाचा व अत्यंत वेगाचा काळ आहे..... आपले नशीब कि आपण या काळात आपण जगत आहोत. 

आठवा आपले बालपण ... तरुणपण ... आईवडील व त्यांचे स्वप्न 

कसे जगायचो आपण 

antinna ...टीव्ही.... दूरदर्शन एकच चनेल रामायण महाभारत..हम लोग चित्रहार...छायागीत...रांगोली......पोस्टकार्ड... मनीऑर्डर... landline...std बूथ ....कॉल रेट रात्री कमी.... पेजर...चिक्कार वेळ ...सुट्टीत काय करावे कळायचे नाही.... 

आता काय आहे.. 

अन्न, वस्र, निवारा नंतर आपली सर्वात मोठी गरज मोबाईल आहे.... एक वेळेस या पहिल्या तीन बाबी  थोड्या उशिरा मिळाल्या तर चालतील पण मोबाईल....

आताची पिढी fast आहे... आपल्याला बोलू देत नाही... sorted आहे... त्यांना काय पाहिजे हे त्यांना चांगले कळते... 

मोठ्या गाड्या, मोटारसायकली, बुलेट, महाग वस्तू...हॉटेलचे जेवण त्यांना सहज वाटते... 

पूर्वी रिटायरमेंटला घर असायचे आता नोकरी लागताच सर्व...लाग्नाधी सर्व सेटल... 

पैशांची किंमत फारशी नाही. 

तुलना असते. त्याच्च्याकडे आहे मग माझ्याकडे देखील असले पाहिजे.. 

एकमेकांना समजून घेतले पाहिजे.. मुलांनी पालकांना व पालकांनी मुलांना .... 

१) त्यांना सर्व द्या पण संवाद साधा ...बोलत राहा... त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याशी संवाद साधा ... शाळेत काय झाले? काय शिकविले?.. कुठे बसला होता?... ..काय होमवर्अक दिला होता?... या प्रश्नांपुढे  आपली गाडी सरकत नाही...  

२) असे कसे प्रश्न  विचारता ? ... तुम्हाला जर विचारले ... आज काय झाले ऑफिसमध्ये?... सांगा ... एकदम काही सांगता येईल का आपल्याला... मग ते कसे सांगतील?... 

३) दिवसभरात आपण स्वतःकडे लक्ष द्या आपण मुलांशी बोलतांना कोणकोणते शब्द वापरतो?..... गाढव, मूर्ख...बावळट....नालायक...बेअक्कल....वेडा...येडा... 

त्यांना काय वाटेल हे ऐकून ... या शब्दांवर ते विचार करतात. 

४) त्यांच्या भावविश्वात आपण जोपर्यंत प्रवेश करत नाहीत. ते आपल्याशी संवाद साधत नाहीत. ते आपल मानत नाहीत. 

५) मुलांना काय आवडते ते बघा. चित्र, संगीत, वाचन यात रस आहे का शोध घ्या. 

६) त्यांना आवडेल त्यात करियर करू द्या. हे अर्धवट ज्ञान आहे. मुलांना वेगवेगळे क्षेत्र माहीतच नसतील तर ते कसे सांगतील त्यांना काय आवडते. 

७) upsc सारख्या बाबी मुलांना आतापासून सांगू नका. त्यांच्या शाळेतला अभ्यास पूर्ण करून घ्या. त्या त्या वयातील परीक्षा त्यांना देऊ द्या त्यात चांगला अभ्यास करायला सांगा. 

८) सारख सारख तेच तेच सांगू नका... त्यांना करू द्या..... वेळ द्या... श्वास घ्यायला.... शब्द निवडून वापरा ...मोठे झाले कि तेच शब्द ते वापरतात... मुले आपण काय शिकवतो त्यातून शिकत नाहीत... आपण काय करतो त्यातून शिकतात. अनुकरण करतात. 

९) मुलांनी मोबाईल बघू नये यासाठी आपण स्वतः देखील बघू नये... घरात नेटचे कनेक्शन घेणे टाळा... त्याशिवाय देखील अभ्यास करता येतो.... कोणताच गेम मोबाईल मध्ये ठेऊ नका... वेळेवर स्वतः झोपा ...मुलांना झोपायची सवय लावा. 

१०) वस्तू जागेवर न ठेवणे, कपडे फेकून देणे, वेळेवर अंघोळ न करणे किंवा अंघोळच न करणे... कलर करून ठेवणे, भिंती खराब करणे, मोठ्याने ओरडणे, हे सगळीकडे आहे. तुमचा मुलगा जगावेगळा काही करत आहे असे नाही... आमचे पण तेच करतात. करू द्या ... लक्ष ठेवा.. 


मुलांनी काय केले पाहिजे 

  1. पालकांना समजून घेतले पाहिजे. विशेषतः मम्मीला ... त्या बिचाऱ्या खरेच खूप काम करत असतात. तुमच्यासाठी... त्यामुळे थोड त्यांच्याकडून चुकून एखादा शब्द इकडचा तिकडचा निघून गेला तर त्यांना माफ करा... त्यांची मनापासून इच्चा असते आपल्या मुलाने चांगल काहीतरी कराव. 
  2. ओन्लाईन असणे टाळा...स्क्रीन कमीत कमी किंवा नकोच... त्याचा जेव्हढा कमी वापर कराल तितक यश जास्त भेटेल. स्क्रीन,,गेम्स हे तुमचे लक्ष वेधून गेतात मेंदूचा तांबा स्वतःकडे घेतात... सर्जनशीलता कमी करतात. 
  3.  विवध कार्यक्रमात भाग घ्या.. 
  4. भरपूर वाचा... वाचल्याने अनेक बाबी साध्य होतात... 
  5. ओरडू नका......मोठ्यांना समजून घ्या... यांना काही कळत नाही.... बिचारे अडाणी आहेत असे समजून तरी हळू बोला. 
  6. खूप खेळत असाल तर अभ्यास करा... खूप पुस्तकात असाल तर थोडे खेळा देखील 
  7. जेवणाकडे लक्ष द्या हे वाढीचे वय असते... शरीर याच काळात निरोगी व सुद्रुड तयार होत असते. इन्स्टा वर आकर्षक फोटो टाकून फार फार तर लैक्स व फॉलोअर्स वाढतील पण तब्येत खराब होऊ शकते. 
( नाशिक येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील पाल्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमात बोलतांना केलेल्या भाषणातील काही मुद्दे. दिनांक १८/०९/२०२२)