नाळ हा तसा ठीकठाक श्रेनीत मोडनारा चित्रपट आहे. तो फार अप्रतिम किंवा दर्जेदार असा नाही. चित्रपटाशी नागराजचे नाव व झी टॉकीज चे आक्रमक प्रचारतंत्र जोडले गेले नसते तर कदाचित हा चित्रपट केव्हा येवून गेला असता कळले पण नसते. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात संपूर्ण समाजमन जोडले गेले तर त्याने नंतर जे काही केले असेल ते अप्रतिमच असेल हे डोळे झाकून बघणे म्हणजे नाळ हा अप्रतिम चित्रपट आहे असे वाटने होय.
एक किंवा फार फार तर दोन सीन ( तेहि अवघ्या काही तिन- चार मिनिटांचे) चित्रपटातुन काढून टाकले तर एक निसर्गरम्य खेड्यामध्ये राहणारे एक कुटुंब व त्यातील लहान मुलाच्या नजरेतून केलेले चित्रण, अप्रतिम एरिअल शूटिंग, सिनेमेटोग्राफी व नैसर्गिक संवाद इतकच हाती लागत.
तशी तुलनाच करायची असेल तर किल्ला या चित्रपटाशी करावी लागेल. की ज्यातही लहान मुलाच भावविश्व दिग्दर्शकाने त्या तुलनेत बर्यापैक्की दाखवलय. अर्थात किल्ला पण तसा सो सो च आहे. पण कमीत कमी मुलांच्या मनात जी भावनिक आंदोलने, उलाढाल चालतात ती शब्द-संवादासोबतच निसर्गाच्या विविध प्रतिमा वापरून उलगडून दाखावने हे त्या दिग्दर्शकाला खुप छान जमलय. त्या बाबतीत नाळ मध्ये हे जमले नाहीय.
चैत्या व त्याची आई यांचा व बच्चन चा अभिनय व त्यांच्यातील केमिस्ट्री खासच आहे. बाकी नागराज चा अभिनय त्याच्या वलयामुळेच ठीक आहे. फारस काही हाती लागत नाही व तशी अपेक्षा पण भविष्यात वाटेल अस काही तो जाणवू देत नाही. फॅन्ड्री मध्ये इंटर्नली तो स्वतः involved असल्याने स्वतःच्या अभिनयासाठीची जागा त्याने राखीव ठेवलीय पण इथे त्याच्या ऐवजी कोणीही असते तरी चालले असते इतक्या सपक चेहऱ्याने संपूर्ण चित्रपटभर तो वावरतो.

नागराज च्या आतापर्यंतच्या कलाकृति (कवितासंग्रहासह) कौतुकास्पद व लोकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्या तितक्या उंचीच्या नक्कीच होत्या. पिस्तुल्या व फॅन्ड्री पासून नागराज च्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शकाने माझ्यासाहित लाखो लोकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे सैराट सुसाट सूटल्यानंतर नागराज कुठल्या मैलाच्या दगडावर थांबतो ही उत्सुकता सर्वांमध्ये होती. अर्थात प्रत्येक वेळी यश मिळने शक्य नाही हे खरे असले तरी अस्सल दिग्दर्शकाचा स्वतःचा असा काही मिडास टच उमटतोच (जरी तो स्वतः दिग्दर्शक नसून निर्माता वा सहनिर्माता असला तरी) पण इथे त्याही पाउलखुणा दिसत नाहीत.
हिंदी मध्ये एके काळी राम गोपाल वर्मा हे नाव वेगळ्या व दर्जेदार चित्रपटासाठी घेतले जायचे पण कालांतराने तो स्वतःच्याच चौकटीत अडकत गेला व तेच तेच फॉर्मुले वापरून कालांतराने संपून गेला. दुसरा अनुराग कश्यप सतत वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा दर्जा कायम ठेवत अस्सल प्रेक्षकांना त्याने कधी नाराज केले नाही त्यामुळे कमर्शियली काही वेळा त्याचे चित्रपट चालले नाहीत तरी रसिकांना मात्र त्याने नाराज केले नाही.
महाराष्ट्रातील एकूणच सामाजिक व राजकीय वीण ज्या मोजक्या दिग्दर्शकांना कळलीय अस वाटतेय त्यात नागराज आहे त्यामुळे नवनवीन विषयांना हात घालून, प्रेक्षकांचे व अपेक्षांचे दडपण न घेता नागराज येत्या कालावधीत मराठीतील राम गोपाल वर्मा बनतो कि अनुराग कश्यप बनतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- समाधान महाजन