आज भेट झाली राजेश पाटील सरांची अर्थात ताई मी कलेक्टर व्हयनू या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक, जिल्हाधिकारी म्हणून ओरिसात कार्यरत असलेले, खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखों अभ्यासू विद्यार्थ्यांची प्रेरणास्थान असलेले व आम्हा सर्वांचे लाडके दादा अर्थात राजेश दादाचीं भेट झाली.
अर्थात आमचे फोनवरून बोलणे अनेकदा झालेले, माझ्या काही लिखाणाला त्यांनी मेसेजवरून दाद दिलेली पण भेट अशी पहिल्यांदाच झाली.
अभ्यासाच्या अनेक टप्प्यावर त्यांची मदत व सोबत मिळाली ती त्यांच्या "ताई मी कलेक्टर व्हयनू" या पुस्तकाच्या रुपाने. जेव्हा जेव्हा खूप निराश झालो असेल , काय करावे कळत नसेल तेव्हा तेव्हा मी हे पुस्तक घेऊन बसायचो अनेकदा वाचल्यावरही त्यात काय होते असे वाचण्यासारखे तर माझ्यासाठी ते पुस्तक नसायचे, ती एक कथा नसायची, ते पुस्तक हातात घेणे हीच एक प्रेरणा असायची. या पुस्तकातला एक खेड्यातील गरीब घरातील मुलगा प्रचंड संघर्षातून upsc देऊन कलेक्टर होतो हि एकच टॅगलाईन माझ्या मनाला उभारी देऊन जायची व मी पुन्हा अभ्यासाला लागायचो. अनेक रात्री ते पुस्तक तसच छातीवर ठेवून मी झोपी जायचो.
माझ्या upsc च्या मुलाखतीच्या टप्प्यावर तर सरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभलेच पण सर्वात जास्त वेळ त्यांनी मला दिला तो IRPS मिळाल्यानंतर joining बाबत असलेल्या डायलेमा मध्ये. तेव्हा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना हक्काने विचारून त्रास दिला आणि अगदी जवळच्या मित्राला सांगावे तस त्यांनी मला मार्गदर्शन केले.
अशा अत्यंत विनम्र, ज्याला आपण to the ground अस म्हणतो अन इतक्या वर्षाच्या सेवेनंतरही स्वतः मधील मृदूता, संयम व तरीही ध्येया प्रती कठोर असलेल्या व्यक्तित्वाला आज भेटणं हा माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा म्हणून मी जतन करेल.
या नंतर सर भेटतीलही अनेकदा पण आपल्या मनात उच्च स्थान असलेल्या व्यक्तीची प्रथम भेट संस्मरणीय असते अन म्हणून हे अस काही लिहिण्यास प्रेरित करणारी पण असते.
- समाधान महाजन
